श्री चिंतेश्वर विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित कार्यक्रम संपन्न
श्री चिंतेश्वर विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित कार्यक्रम संपन्न
गेवराई (प्रतिनिधी ):भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आज दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शालेय वाहतूक करणारे ज्येष्ठ चालक श्री महेशजी लाड यांच्या हस्ते प्रमुख ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून स्था.स.स.अध्यक्ष श्री प्रमोद कुलकर्णी,प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष डॉ श्री.राधेश्याम झंवर कार्यवाह श्री दत्तात्रय पत्की,श्री अनिल बोर्डे,श्रीम.मोरगांवकर ताई,श्री अमोल गोरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून श्रीम.मोरगांवकर ताई यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना उजाळा देत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.प्रमुख उपस्थित श्री महेश लाड यांनी विद्यालयाच्या प्रगती साठी आम्ही सर्व वाहन चालक बंधू सदैव तत्पर असू अश्या भावना व्यक्त केल्या.
अध्यक्षीय समारोपात श्री प्रमोद कुलकर्णी यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देत मराठवाडा विकासात स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या बाबत काम करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.प्रसंगी वाहन चालक सर्व श्री.प्रकाश
चव्हाण,संजय चौधरी,महेंद्र निसर्गंध उपस्थित होते.कार्यक्रमाचे
सूत्रसंचलन श्रीम.मोटे ताई यांनी केले तर श्री घोलप सर यांनी समरसता मंत्र घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा