कॉ सिताराम येचुरी यांना परळीत सर्वपक्षीय श्रद्धांजली
कॉ सिताराम येचुरी यांना परळीत सर्वपक्षीय श्रद्धांजली
परळी वै ता.१६ प्रतिनिधी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ सिताराम येचुरी यांना परळी येथे सोमवारी (ता.१६) शोकसभेत सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ सिताराम येचुरी यांचे गुरुवारी (ता.१२) दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. कॉ सिताराम येचुरी यांना परळी येथील माकप कार्यालयात सर्वपक्षीय नेत्यांनी सोमवारी (ता.१६) सायंकाळी शोकसभेत श्रद्धांजली वाहिली. माकपचे जेष्ठ नेते कॉ पी एस घाडगे, माकपचे जिल्हा सचिव कॉ अजय बुरांडे, सिटुचे जिल्हाध्यक्ष कॉ बी जी खाडे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ बहादुरभाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिवनराव देशमुख, मनसेचे शहराध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी शोकभावना व्यक्त करत कॉ सिताराम येचुरी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी माकपचे शहर सचिव, परमेश्वर गित्ते, शेतकरी संघटनेचे कालीदास आपेट, जेष्ठ नेते उत्तमराव माने, प्रभाकर वाघमोडे, प्रा. अतुल दुबे, कैलास सोळंके, शिवसेनेचे सचिन स्वामी, किसान सभेचे तालुकाध्यक्ष कॉ भगवान बडे, कॉ किरण सावजी, जालिंदर गिरी, सुवर्णा रेवले, अश्वीनी खेत्रे, यांच्यासह विविध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा