बस अपघाताची घटना वेदनादायक ; आ. पंकजाताई मुंडे यांनी वाहिली मयत प्रवाशांना श्रध्दांजली
बस अपघाताची घटना वेदनादायक ; आ. पंकजाताई मुंडे यांनी वाहिली मयत प्रवाशांना श्रध्दांजली
बीड।दिनांक १९।
जालना ते वडीगोद्री मार्गावर मठतांडा (ता.अंबड) येथे झालेल्या बस व ट्रकच्या भीषण अपघाताची दुर्घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायक आहे, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी शोकाकुल भावना व्यक्त करत अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
हा अपघात अतिशय दुर्दैवी होता. यात आमचा अंत्यत धडाडीचा कार्यकर्ता आणि निकटवर्तीय बंडू बारगजे यांचं दुर्दैवी निधन झाल्याची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे.या अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समजले. दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. बंडू बारगजेंसह अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली !!
मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना व्यक्त करते.
तसेच जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं, अशी प्रार्थना करते असं आ. पंकजाताई म्हणाल्या.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा