वैद्यनाथ नगरीत शिवनामाचा एकच गजर...

वैद्यनाथ नगरीत शिवनामाचा एकच गजर...


संतश्रेष्ठ श्री गुरूलिंग स्वामींची परळीत निघाली पालखी; अखंड शिवनाम सप्ताहाची भक्तीपूर्ण वातावरणात सांगता


सदगुरू श्री सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांचे आशिर्वचन; वीरशैव लिंगायत समाज, परळीचा उपक्रम


परळी वैजनाथ/प्रतिनिधी


वीरशैव लिंगायत समाज परळी व श्री गुरूलिंग स्वामी देवस्थानच्या वतीने दि.7 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या संतश्रेष्ठ श्री गुरूलिंग स्वामी यांच्या 123 व्या पुण्यतिथी महोत्सव व अखंड शिवनाम सप्ताहाची शुक्रवार दि.13 सप्टेंबर रोजी भक्तीपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. यानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून पालखी काढण्यात आली. शिवनामाचा एकच गजर, जागोजागी भाविकांकडून श्रीं च्या पालखीवर करण्यात आलेली पुष्पवृष्टी हे या पालखी सोहळयाचे वैशिष्टय असून आजच्या पालखी सोहळयाला शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. सदगुरू श्री सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा पार पडला. सप्ताहात त्यांचे आशिर्वचन पार पडले. आपल्या आशिर्वचनातून महाराजांनी सामाजिक, सार्वजनिक शांततेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत व शरीर शुद्धीकरणासाठी शिवनाम जपावे असे सांगितले. यावेळी संतश्रेष्ठ गुरुलिंग स्वामी मठ बेलवाडी संस्थांचे अध्यक्ष दत्तापा ईटके गुरुजी वक्रेश्वर देवस्थान चे अध्यक्ष सोमनाथआप्पा हालगे यांनी यावेळी आपले विचार मांडले

यावेळी वक्रेश्वर  देवस्थानच्या विश्वस्त पदी श्री श्याम बुद्रे प्रकाश खोत श्रीमती प्रेमला वेरुळे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला,अन्नदाते श्री चंद्रकांत आप्पा बुरांडे, शिवप्रसाद चौधरी, नागेश सुगरे, अविनाश चौधरी, विजय नरवणे, सुभाष चौधरी तसेच गुरुलिंग स्वामी मठ मंदिर स जीर्णोदरासाठी भाविक श्री सोमनाथ कुरमुडे महादेव इटके रमाकांत गुजर, सौ रमाताई आलदे सोमेश्वर बयाळे  आदींचा गुरुवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी होते यावेळी श्री अँड गिरीश चौधरी, शंकर आप्पा उदगीरकर नारायणआप्पा खके  चंद्रकांत आप्पा समशेट्टी मंदार नरवणे अक्षय मेनकुदळे शिवकुमार व्यवहारे आधी विश्वस्त उपस्थित होते यावेळी वर्गणी संकलन करण्यासाठी श्री महादेव ईटके, विकास हालगे, महेश निर्मळे, चंद्रकांत उदगीरकर, दत्तात्रय गोपानपाळे, सोमनाथ गोपानपाळे राजेश साखरे सर, राहुल कोदरे सचिन काटकर योगेश मेनकुदळे शिवकुमार चौंडे आदींचे गुरुवर्यांनी कौतुक केले.

        वैद्यनाथनगरी परळी येथे बेलवाडी मंदिरात चालू असलेल्या श्री गुरूलिंग स्वामी यांचा 123 वा पुण्यतिथी सोहळा व अखंड शिवनाम सप्ताहाची मंगळवारी भक्तीपूर्ण व उत्साहात सांगता झाली. मागील सात दिवसांपासून येथे अखंडपणे शिवनाम सप्ताह व धार्मीक कार्यक्रम चालू होते. दरम्यान आज  सकाळी 9 वा. वैद्यनाथ मंदिर येथून संतश्रेष्ठ श्री गुरूलिंग स्वामी यांची पालखी काढण्यात आली. वक्रेश्वर मंदिर येथून पुढे शहरातील प्रमुख मार्गावरून शिवनामाचा गरज करीत पालखी मार्गस्थ होत गेली.श्री संत गुरुलिंग स्वामी महाराज पालखी सुरुवात वैजनाथ मंदिर, देशमुखपार, अंबेवेस, गणेशपार, नांदूरवेस, गोपनपाळे गल्ली, आंबेवेस, भोई गल्ली मार्गे बेलवाडी येथे प्रवचन, आरती व महाप्रसादाने सांगता झाली. जागोजागी भाविकांकडून पालखीतील श्रीं चे दर्शन करण्यासोबतच पुष्पवृष्टी केली जात होती. ओम नमः शिवायचा जप, मन्मथस्वामी व गुरूलिंग स्वामींचा जय जय जयकार जागोजागी केला जात होता. 

       वीरशैव लिंगायत समाज बांधवांचा आजच्या पालखी सोहळयात सक्रीय सहभाग होता. दोन वर्षांच्या कालखंडानंतर पालखी सोहळा झाल्याने सर्वांनाच हा सोहळा भव्य दिव्य व्हावा असे वाटत होते. त्याची प्रचितीही यावेळी ठिकठिकाणी पहायला मिळाली. मागील सात दिवस अखंड शिवनाम सप्ताहात विविध धार्मीक कार्यक्रम पार पडले. दररोजची आरती आणि महाप्रसादही अखंडपणे चालूच होता. आजच्या पालखी सोहळयात वीरशैव समाजातील सर्व महिला पुरुष व सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन स्वामी व आभार प्रदर्शन अँड गिरीश चौधरी यांनी केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार