सिरसाळ्यातील शादीखान्याचे लोकार्पण व महिला सभागृहाचे भूमिपूजनही धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न
शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी शेतीबरोबरच पशुपालन या जोडधंद्याकडेही वळावे - धनंजय मुंडे
परळी तालुक्यातील मोहा व सिरसाळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण
सिरसाळ्यातील शादीखान्याचे लोकार्पण व महिला सभागृहाचे भूमिपूजनही धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न
परळी वैद्यनाथ (दि. 15) - परळी मतदारसंघात शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी आपण मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी या सर्वाधिक मंजूर केलेल्या आहेत. त्याचबरोबर शेतीच्या सोबतीने उत्पन्न वाढीसाठी पशुपालनाकडेही जोडधंदा म्हणून बघणे व पशुपालन करणे गरजेचे असल्याचे मत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील मोहा येथे पशु वैद्यकीय दवाखान्याच्या लोकार्पण प्रसंगी बोलताना व्यक्त केले आहे.
बीड जिल्ह्यात लंपी आजारावर नियंत्रण असेल किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यांना सुविधा मिळवून देण्याचा विषय असेल आपण 25 कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिलेला असून परळी तालुक्यात सुद्धा सुमारे सहा कोटी पाच लक्ष रुपये इतका निधी आतापर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे. जनावरांच्या सोनोग्राफी व एक्स-रे साठी पशुपालकांना पूर्वी इतर जिल्ह्यांमध्ये जावे लागायचे मात्र आता परळीमध्ये सुद्धा तीन अध्याय सोनोग्राफी मशीन व एक्स-रे मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.
यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळणार असून परळी विधानसभा मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस घालायची देखील अडचण भासू देणार नाही असा शब्द यावेळी धनंजय मुंडे यांनी बोलताना दिला.
यावेळी माजी आमदार आर. टी. देशमुख, परळी पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत देशमुख, माऊली तात्या गडदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुशांत पवार, मोहाच्या सरपंच सौ रुक्मिणी शेप, शैलेंद्र पोटभरे, माणिक सातभाई, प्रकाश कावळे, सरपंच दराडे त्याचबरोबर जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ.विजय देशमुख, डॉ.कदम, डॉ.प्रकाश आघाव, गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांसह मोहा व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
आर टी जिजांनी सांगितले पंडित अण्णा मुंडे व धनंजय मुंडेंच्या कामातील साधर्म्य
यावेळी बोलताना माजी आमदार आर टी देशमुख यांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे व स्वर्गीय पंडितांना मुंडे यांच्या कामाच्या पद्धतीवरून धनंजय मुंडे यांच्या कामाच्या पद्धतीशी त्यांचे कसे साधर्म्य आहे याबाबतच्या आठवणी जागे केल्या.
मोहा गावातील जिल्हा परिषद शाळा व अन्य काही विकास कामांचे पंडित अण्णांच्या हस्ते काही वर्षांपूर्वी भूमिपूजन झाले व पुढील काही महिन्यात पंडित अण्णांच्या हस्ते त्यांचे लोकार्पणही झाले. त्याच्यात शेजारच्या जागेमध्ये पंडित अण्णांचे सुपुत्र धनंजय मुंडे यांच्या हाताने पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन झाले व काही महिन्यातच त्याचे लोकार्पणही झाले. या भागात जी काही विकास कामे झाली ती स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे तसेच पुढच्या पिढीत धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून झाली, असे आर टी देशमुख यावेळी बोलताना म्हणाले.
सिरसाळ्यातील पशु वैद्यकीय दवाखाना, शादीखान्याचे लोकार्पण व महिला सभागृहाचे भूमिपूजन
सिरसाळा येथे धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण श्री मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच त्यानंतर सिरसाळ्यात उभारण्यात आलेल्या शादी खान्याचे ही लोकार्पण श्री मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी शादी खान्याच्या शेजारी उभारण्यात येत असलेल्या महिला भवनाचेही भूमिपूजन करण्यात आले, तसेच हे काम दर्जेदार पद्धतीने निर्धारित वेळेत पूर्ण करून घेण्याच्या सूचना धनंजय मुंडे यांनी संबंधितांना केल्या आहेत.
याप्रसंगी वैद्यनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत कराड, राजाभाऊ पौळ, जानेमिया कुरेशी, राम किरवले, माणिकराव पौळ, माधवराव नायबळ, वसंत राठोड, फेरोज पठाण, संतोष पांडे, अक्रम पठाण, देवराव काळे, सतिश काळे, नदीम शेख, रफिक बागवान, निहाल मणियार, कल्याण काळे, श्रीराम बडे, अक्षय दळवी, विठ्ठल गित्ते, नय्युम शेख, गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, श्री काळे, डॉ.कदम, डॉ.आघाव आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा