धर्मापुरीकरांना दिलेला शब्द धनंजय मुंडेंनी केला पूर्ण, शादीखाना बांधकामास 1 कोटी रुपये निधी मंजूर


परळी वैद्यनाथ (दि. 13) - परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मतदारसंघातील धर्मापुरी येथील ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण केला असून, धर्मापुरी येथे शादीखाना उभारण्यास शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने मंजुरी दिली असून, मुंडेंच्या मागणीनुसार या कामासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. 


धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात दिलेले शब्द पूर्ण करण्यावर व पायाभूत सुविधांच्या निर्माणवर अगदी सुरुवातीपासूनच भर दिला आहे. 


मागील सुमारे पावणे पाच वर्षांच्या कार्यकाळात ग्रामीण भागात तीर्थक्षेत्र विकास, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पशु वैद्यकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध सुविधा, राष्ट्रीय महामार्गाचे नावन्यपूर्ण निर्माण, शहर बायपास यांसारखी अनेक कामे पूर्ण केली आहेत. त्यातच आता दिलेला शब्द पूर्ण करत धर्मापुरी येथील शादीखान्याचीही भर पडली आहे. 


याबद्दल धर्मापुरीचे ज्येष्ठ नेते ऍड.गोविंद फड व ग्रामस्थांनी धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार