पोस्ट्स

इमेज
शिक्षण व क्रीडा या एका नाण्याच्या दोन बाजू-जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर गेवराई, प्रतिनिधी....      भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,गेवराई येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्था कार्यवाह डॉ.हेमंतजी वैद्य, रा.स्व.सं.पश्चिम क्षेत्र कार्य, सदस्य श्री हरीशजी कुलकर्णी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर तालुका क्रीडा अधिकारी श्री कालिदास होसूरकर  तालुका क्रीडा सहाय्यक श्री राठोड  माजी उपनगराध्यक्ष श्री राजेंद्रजी राक्षसभुवनकर भजन सम्राट ह.भ.प.तुळशीराम महाराज आतकरे स्था.नि.मं.अध्यक्ष प्रमोदजी कुलकर्णी उपाध्यक्ष राधेश्यामजी झंवर शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अक्षयजी कुलकर्णी अर्थ समिती अध्यक्ष नितीनजी डोळे प्राथमिक मुख्याध्यापक श्री प्रदीप जोशी माध्यमिक मुख्याध्यापक श्री अमोल गोरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.            प्रसंगी प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक...
इमेज
सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली होती, तर त्यांना मदत करणाऱ्या आणखी एका आरोपीला देखील अटक करण्यात आली. दरम्यान या आरोपींना पोलिसांकडून केज न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टानं या घटनेतील तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोर्टात नेमकं काय घडलं? कोर्टात युक्तिवाद करताना डीवायएसपी अनिल गुजर यांनी म्हटलं की, सुदर्शन घुले याने हत्येआधी अवादा कंपनीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन दमदाटी केली होती. त्यानंतर त्याला मारहाण झाली होती. संतोष देशमुख आणि मस्साजोग मधील लोकांनी त्याला मारहाण केली होती. त्यानंतर संतोष देशमुख यांना रस्त्यात अडवून एके दिवशी आरोपींनी जबरदस्त मारहाण केली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी यावेळी सीआयडीच्या एसआयटी टीमकडून कोर्टात करण्यात आली. हे टोळीने गुन्हे करणारे आरोपी आहेत. संघटित गुन्हे करून दहशत निर्माण करणे...

बीड पोलिसांच्या विशेष पथकाने पुण्यातून उचलले

इमेज
  संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे पोलिसांच्या ताब्यात  बीड पोलिसांच्या विशेष पथकाने पुण्यातून उचलले  बीड  : केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे याला पुण्यातून बीड पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली होती त्यानंतर 26 दिवस हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते अखेर त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोषी देशमुख यांची हत्या करणाऱ्या प्रमुख आरोपींपैकी सुदर्शन घुले सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे हे फरार होते यातील सुदर्शन घुले व सुधीर सांगळे याला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गेले 26 दिवस ते फरार होते.. त्यांच्या मागावर बीड पोलिसांचे पथक होते परंतु ते हाती येत नसल्याने पोलिसांवरील दबाव वाढतच होता यादरम्यान रात्री एका डॉक्टरची तीन ते चार तास कसून चौकशी करण्यात आली..  त्यानंतर या दोघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे थोड्याच वेळात त्यांना कोर्ट...

मुस्लिम बांधवांशी संवाद साधत दिल्या शुभेच्छा

इमेज
  अंबाजोगाई येथील इस्तेमाच्या समारोप दुवा प्रसंगी धनंजय मुंडेंची उपस्थिती मुस्लिम बांधवांशी संवाद साधत दिल्या शुभेच्छा अंबाजोगाई (प्रतिनिधी) - अंबाजोगाई येथे मुस्लिम समाजाच्या इस्तेमाच्या समारोपाच्या दुवाप्रसंगी आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली.  यावेळी धनंजय मुंडे यांनी समारोपाच्या दुवाप्रसंगी उपस्थित मुस्लिम समाज बांधवांशी तसेच विविध धर्मगुरूंशी संवाद साधत इस्तेमाच्या समारोप प्रसंगाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व मुस्लिम समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे यांचे केले सांत्वन दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबाजोगाई चे तालुकाध्यक्ष राजेभाऊ औताडे यांच्या वडिलांचे नुकतेच दुःखद निधन झाले असून धनंजय मुंडे यांनी सेलू आंबा येथील राजाभाऊ अवताडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन औताडे कुटुंबीयांचे सांत्वन केले.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशम...
इमेज
  निष्काळजीपणामुळे बसस्थानकात बसचा धक्का बसून महिला जखमी परळी वैजनाथ               येथील बसस्थानकात बस लावत असताना वाहकाने बस गतीने चालवल्यामुळे प्रवाशी महिलेला धक्का लागून ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला बोलावून डॉ अमोल चाटे यांनी महिलेला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.      सध्या बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी आहे. बसमध्ये बसण्यासाठी,जागा पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ होत आहे. गुरुवारी (ता.०२) सायंकाळी सहाच्या सुमारास सावित्री बोंडगे व संजय बोंडगे पती पत्नी बीडला जाण्यासाठी बसस्थानकात बीडकडे जाणाऱ्या बससची वाट पाहत असताना परळी- लातूर ही बस सहाच्या सुमारास बसस्थानकात आली, बस स्थानकात लावत असताना वाहकाने प्रवाशांची गर्दी पाहता बसचा वेग कमी करणे आवश्यक असताना वाहकाने बस वेगाने आणली यावेळी सावित्री बोंडगे यांंना बसचा जोराचा धक्का लागुन बसचे चाक पायाला घासून गंभीर दुखापत झाली. याचवेळी पती संजय बोंडगे पत्नीला वाचवण्यासाठी जात असताना तेही जखमी झाले आहेत. येथील प्रवाशांनी तात्काळ १०८ रुग...

पायऱ्या पूर्ववत कराव्यात : अश्विन मोगरकर

इमेज
नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे पुरातन वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांची तोडफोड  पायऱ्या पूर्ववत कराव्यात : अश्विन मोगरकर परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत होणाऱ्या कामात पुरातन वैद्यनाथ मंदिराच्या दक्षिण पायऱ्याचे होणारे पाडकाम त्वरित बंद करावे, व पायऱ्या पूर्ववत कराव्यात अशी मागणी अश्विन मोगरकर यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरासाठी व भाविकांना सुविधा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र सरकारने 2019 साली तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांनी तिर्थक्षेत्र विकास योजनेतून 133 कोटी 58 लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर करून आणला होता. या योजनेअंतर्गत मंदिराच्या पुर्वेस हरिहर तिर्थाजवळ दर्शन मंडप,दक्षिणमुखी गणेश मंदिराच्या पाठिमागे 40 खोल्यांचे यात्री निवास,शनि मंदिराच्या पाठिमागे 20 खोल्यांचे यात्री निवास,मेरुगिरी पर्वतावर 8 खोल्यांचे कॉटेजेस व उपहारगृह,उद्यान विकसित करणे,वैद्यनाथ मंदिर भोवताली दगडी फरशी बसवणे,नगरपालिकेजवळ वास्तुशिल्प प्रवेशद्वार बांधणे,मेरुगिरी पर्वताभोवती सि...
इमेज
पोलीसांनी नकाबंदी करत पकडला गुटखा; ८लाख ८९ हजारांचा मुद्देमालासह एकाची धरपकड परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      नविन पोलीस अधीक्षक रुजू झाल्यापासून पोलीस चांगलेच ॲक्शन मोडवर आले असल्याचेच दिसून येत आहे. काल दि.३० रोजी धर्मापुरी रस्त्यावर सिमेन्ट फॅक्ट्रीसमोर  पोलीसांनी नाकाबंदी करत गुटखा व अन्य बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थ यांची अवैध वाहतूक होत असलेले वाहन पकडले आहे.या कारवाईत पोलीसांनी ८लाख 89 हजारांच्या मुद्देमालासह एकाची ग्रामीण पोलीसांकडून धरपकड करण्यात आली आहे.       याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दि. 30/12/2024 रोजी 21.45 वा. परळी ते धर्मापुरी जाणारे रोडवर सिमेन्ट फॅक्ट्रीसमोर ईनोव्हा गाडी जिचा पार्सीग क्रमांक MH-24/P-9009 आहे. गाडीमध्ये ईसम  लक्ष्मीकांत गोविंदलाल पल्लोड वय 29 वर्ष रा. पदमावतीगल्ली ता. परळी वै. हा आपले स्वताचे फायद्या करीता विनापरवाना बेकायदेशीररित्या महाराष्ट्र राज्यात नागरीकांच्या आरोग्याचे दृष्टीने बंदी घातलेली असतानाही रजणनीगंधा पान मसाला, गुटख्याचा माल व सुंगधी तबांखुचे पोते हे ईनोव्ह...