पोस्ट्स

डिसेंबर १५, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बीड मधील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान

इमेज
  नवे एसपी  नवनीत कॉवत यांनी रात्री पावणे अकरा वाजता स्वीकारला पदभार  बीड मधील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान  बीड, एमबी न्यूज वृत्तसेवा : बीडच्या मसाजोग येथील संतोष देशमुख अपहरण व खून प्रकरणाच्या तपासात कुचराई केल्याचा ठपका ठेवत अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली होती.त्यांच्या जागी छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस उपायुक्त नवनीत कॉवत यांची नियुक्ती झाल्याचे आदेश दुपारी प्राप्त झाले होते.       यानंतर कॉवत यांनी तातडीने बीडमध्ये दाखल होत रात्री पावने अकरा  वाजता बीडच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.  बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान कॉवत यांच्यासमोर असून ते हे कशा पद्धतीने पेलतात याकडे सबंध राज्याचे लक्ष लागले आहे.बीडमध्ये आज नव्या एसपींची नियुक्ती करण्यात आली आहे.टॉपर आयपीएस अधिकारी असलेले नवनीत कॉंवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत. नवनीत कावत हे बीडचे नवीन पोलीस अधीक्षक राहणार असून ते यापूर्वी पोलीस उपायुक्त छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी कार्यरत होते.आता बीड मधील कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याचे आवाहन...

संपूर्ण यादी - मंत्रिमंडळ खातेवाटप

इमेज
  अखेर खातेवाटप झालं : बघा - कोणाला मिळालं कोणतं खातं ? ना.धनंजय मुंडे यांचेकडे अन्न व नागरी पुरवठा तर पंकजा मुंडे पर्यावरण विभागाची जबाबदारी बीड, प्रतिनिधी.. बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या बहिण-भावाचा राज्यमंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर त्यांच्याकडे कोणती खाती दिली जातात याची उत्सुकता होती ती आता संपुष्टात आली आहे. मंत्रीमंडळात ना.धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा तर ना. पंकजा मुंडे यांच्या कडे पर्यावरण विभाग, पशुसंवर्धन चा कार्यभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपवला आहे. राज्य मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पर्यावरण मंत्री या दोन्ही महत्वपूर्ण विभागाचा कार्यभार आता मुंडे बहिण भाऊ स्वतंत्र पुणे सांभाळणार आहेत. आता उत्सुकता आहे ती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा कार्यभार कोणाकडे जातो याची. कॅबिनेट मंत्री 1.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल 2.राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास) 3.हसन मुश्रीफ -  वैद्यकीय शिक्षण 4.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री 5.गिरीश महाजन - ...

संतोष देशमुख खून प्रकरणात अविनाश बारगळ यांची झाली होती बदली

इमेज
  टॉपर आयपीएस अधिकारी  नवनीत कॉंवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक संतोष देशमुख खून प्रकरणात अविनाश बारगळ यांची झाली होती बदली बीड,  एमबी न्यूज वृत्तसेवा: संतोष देशमुख हत्याप्रकरणात तपासात कुचराई केल्याच्या ठपका ठेवत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली केल्यानंतरबीडमध्ये आज नव्या एसपींची नियुक्ती करण्यात आली आहे. टॉपर आयपीएस अधिकारी असलेले  नवनीत कॉंवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक  असणार आहेत. नवनीत कावत हे बीडचे नवीन पोलीस अधीक्षक राहणार असून ते यापूर्वी पोलीस उपायुक्त छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी कार्यरत होते.आता बीड मधील कायदा सुव्यवस्था  सुरळीत करण्याचे आवाहन..कावत यांच्यासमोर आहे . काँवत हे 2017 सालच्या बँचचे टॉपर आयपीएस अधिकारी आहेत .अतिशय कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे. सैनिकी शाळेतून शिक्षण पूर्ण झालेल्या नवनीत कॉवत यांनी आयआयटी मधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे नवनीत कॉवत हे तीन वेळेस युपीएससी उत्तीर्ण झाले आहेत. नवनीत कॉवत सुरुवातीला ते आयईएस, नंतर आयआरएस आणि त्यानंतर आयपीएस झाले आहेत. स...
इमेज
  श्रीमती सागरबाई सोळंके यांचे निधन ;प्रकाश सोळंके यांना मातृशोक परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील तुळजाजाई नगरमधील प्रतिष्ठित नागरिक प्रकाश शंकरराव सोळंके यांच्या मातोश्री श्रीमती सागरबाई सोळंके यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्षे होते.      वडगाव दादाहरी येथील हॉटेल रायगडचे मालक प्रकाश सोळंके यांच्या मातोश्री श्रीमती सागरबाई सोळंके यांचे आज शुक्रवार दि. 20 डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या अतिशय धार्मिक आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आजच सायंकाळी धारूर तालुक्यातील मौजे आमला या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.       कै. सागरबाई सोळंके यांच्या पश्चात चार मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा भरगच्च परिवार आहे. सोळंके परिवाराच्या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.  उद्या राख सावडण्याचा कार्यक्रम      दरम्यान कै. सागरबाई सोळंके यांच्या राख सावडण्याचा कार्यक्रम उद्या रविवार दि. 22 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता आमला येथे होणार आहे.
इमेज
  गौरव मल यांना पितृशोक; गिरधारीलाल मल यांचे निधन परळी/ प्रतिनिधी- विवेकानंद नगर येथील रहिवासी गौरव आणि मनोज मल यांचे वडील गिरधरीलाल मल यांचे आज (दि.२०) सकाळी औरंगाबाद येथे उपचार घेत असताना  निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे  वय 70 वर्षे होते. स्व. गिरधरलालज मल यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, चार बहिणी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.        स्व. गिरधरलाल मल ह्यांचा धार्मिक कार्यात विशेष सहभाग होता. संयमी आणि शांत वृत्तीचे म्हणून ते सर्व परिचित होते. मल परिवारावर पडलेल्या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे. अंत्यसंस्कार दरम्यान, आज शनिवार दि. 21 डिसेंबर रोजी  परळीतील राजस्थानी स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.सकाळी 10 वा. त्याचे राहते घर स्वामी विवेकानंद नगर येथून अंत्ययात्रा निघेल.
इमेज
 न.प. परळी वैजनाथ: जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण व शासकीय कामात अडथळा आणला; माजी नगरसेवकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी... परळी नगर परिषद कार्यालयात घरकुल विभागातील एक करमचारी शासकीय कामकाज करत असताना एका माजी नगरसेवकासह अन्य तीन जणांनी येऊन त्यांच्याशी हुज्जत घातली. या कर्मचाऱ्यांस जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली अशा प्रकारची फिर्याद या न प कर्मचाऱ्याने दिली असुन याप्रकरणी तीन जण व अन्य अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, न प कर्मचारी फिर्यादी सिद्धार्थ भारत गायकवाड वय 30 वर्ष, व्यवसाय- नौकरी (MIS स्पेशालीस्ट) नगर परीषद परळी हे शासकीय कामकाज करित असताना यातील आरोपी यांनी संगणमत करुन फिर्यादीस कामकाजा बाबत विचारणा केली व जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच हाताबुक्काने मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणला म्हणुन आरोपी- 1) अन्वर मीश्कीन शेख 2) शेख अजीज इस्माईल 3) शहबाज सज्जाद बेग व इतर अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुरन - 194/2024 कलम 132,121 (1), 352, 351 (2),351(3),...

मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर !

इमेज
  मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण: बीडच्या एसपींची तडकाफडकी बदली ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     मस्साजोग प्रकरणात एसपी अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.  मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून विधिमंडळ अधिवेशनात हे संपूर्ण प्रकरण चर्चेत आले. बीड जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था व पोलीस प्रशासनाची कामकाजाची पद्धत यावरही प्रचंड प्रमाणात टीका झाली. बीडचे बिहार झाल्याच्या टीका विरोधकांनी केल्या. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर आज सभागृहात सविस्तर उत्तर दिले. या प्रकरणातील दोषीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, कोणीही असला तरी त्याला पाठीशी घातले जाणार नाही असे आश्वासन सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचबरोबर या घटनेतील दोषी पोलीस अधिकारी,  कर्मचाऱ्यांवर यापूर्वीही कारवाया केलेल्या आहेत. याचअनुषंगाने बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांचीही तडकाफडकी बदली करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहा...
इमेज
  राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवड मुंबई: भाजप नेते राम शिंदे  यांची विधान परिषदेच्या  सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीची घोषणा आज गुरुवारी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी सभागृहात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे यांची सभापतीपदी निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन केले. अडीच वर्षांहून अधिक काळ रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीपदी अखेर भाजपचे राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी बुधवारी अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीने उमेदवार दिला नाही. शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची कालच निवड निश्चित झाली होती. आज, गुरुवारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची ७ जुलै, २०२२ रोजी सदस्यत्वाची मुदत संपुष्टात आल्यापासून सभापतिपद रिक्त होते. मंत्रिमंडळातील खातेवाटपाप्रमाणे महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये सभापतिपदासाठी चढाओढ सुरू होती.उपसभापती डॉ. नीलम गो-हे  यांच्या नावाची सभापतिपदासाठी चर्चा होती. तसे प्रयत्नही ...
इमेज
  कुटूंब गेले नाशिक त्र्यंबकेश्वरला; तीन लाख 45 हजाराची घरफोडी परळी वैजनाथ, प्रतिनिधी....  परळी शहरातील शास्त्रीनगर भागातील रहिवासी असलेल्या घराचे कुलूप तोडून घरातून सोन्या चांदीचे दागिने व रोग रक्कम असा तीन  लाख 45 हजार रुपयांचा ऐवज घरपोडी करून लंपास केल्याची घटना घडली आहे दरम्यान हे कुटुंब नाशिक त्रिंबकेश्वर त्र्यंबकेश्वरला गेले होते या कालावधीत घरपोडीची ही घटना घडली आहे           याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार फिर्यादी अनिल श्रीधरराव मुंडे रा. शास्त्रीनगर हे पत्नी मुलाबाळासह नाशिक त्र्यंबकेश्वर येथे गेले असता दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीचे बंद घराचे कुलूप कोड्यासह तोडुन घरात प्रवेश केला. बंदरुम मधील कपाट तोडुन कपाटाचे लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिणे व दोन लाख तीन हजार रुपये रोख रक्क्म असा एकूण 3,45,000 रुपयाचा ऐवज अज्ञात दोन इसमांनी चोरून घेऊन गेले. याप्रकरणी  गुरनं.- 193/2024 कलम 305 (a), 331(4) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास  सपोनि गट्टावार  हे करीत आहेत.
इमेज
मंजुश्री सुरेश घोणे यांची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड         मंजुश्री घोणे यांची दि. २७ ते ३० डिसेंबर २०२४ रोजी भारतातील तमिळनाडू राज्यातील मदुराई येथे होणाऱ्या अथेन्स ऑफ द ईस्ट ४ थी इंटरनॅशनल ओपन FIDE रेटेड बुद्धिबळ स्पर्धा-2024 (श्रेणी-C, 1800 च्या खाली) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बुद्धिबळपटूंसाठी प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील सहभागी FIDE रेटिंग मिळवण्यासाठी स्पर्धा करतील.           बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रहिवासी, मंजुश्रीची निवड ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे, जी त्याच्या खेळाप्रती असलेले त्यांचे समर्पण प्रतिबिंबित करते. अथेन्स ऑफ द ईस्ट टूर्नामेंट उदयोन्मुख आणि महत्त्वाकांक्षी बुद्धिबळपटूंना आंतरराष्ट्रीय वातावरणात त्यांची कौशल्ये, रणनीती आणि मानसिक लवचिकता तपासण्यासाठी एक स्पर्धात्मक व्यासपीठ प्रदान करते.       मंजूश्री चा सहभाग बीड जिल्हासोबत परळी साठी एक अभिमानाचा क्षण आहे. अथेन्स ऑफ द ईस्ट टूर्नामेंट विविध श्रेणींमध्ये कुशल खेळाडू तयार करण्य...

भाविकांनी लाॅकरचा उपयोग करावा

इमेज
मंदिर अलर्ट : वैद्यनाथ मंदिर परिसरातील बॅग चोराला अर्ध्या तासात पकडले!  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल होत असतात. मंदिर व परिसरात सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक ती सर्व व्यवस्था लावण्यात आलेली आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीत असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी स्वतंत्र पोलीस चौकीही नेमण्यात आलेली आहे. परंतु तरीही या परिसरात चोरी करण्याचा प्रयत्न अनेक वेळा होतो. मात्र या ठिकाणची पोलीस चौकी व मंदिर अलर्ट असल्याने गुन्हेगारांना व चोरट्यांना या ठिकाणी यश प्राप्त होत नाही.          अशाच प्रकारची एक घटना आज (दि.१८) सकाळीच बघायला मिळाली. नांदेड जिल्ह्यातील दोन महाविद्यालयीन तरुणी परीक्षेसाठी परळी येथे आल्या होत्या. परीक्षेला जाण्यापूर्वी वैद्यनाथ मंदिरात त्या दर्शनासाठी आल्या मात्र त्यांनी आपल्या बॅगा लॉकरमध्ये न ठेवता मंदिर परिसरात बाहेरच एका दुकानासमोर ठेवल्या. ही संधी साधून गंगाखेड येथील रहिवासी असलेल्या एका भुरट्या चोर तरुणाने या...
इमेज
  मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट: आणखी एक आरोपी अटक केज-:  राज्यात गाजत असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख  हत्या प्रकरणात मोठी अपडेट असुन या प्रकरणात आणखी एका आरोपीस अटक करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे.    केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आहे. पोलिसांनी आणखी एका आरोपीस पकडलं आहे. या हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता चार वर गेली आहे.  संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांची गाडी अडवली. सहा ते सात जणांनी त्यांचं अपहरण केलं. त्यांना बेदम मारहाण करुन नंतर त्यांची हत्या करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली होती, आता विष्णू चाटे या चौथ्या आरोपीला अटक करण्यात आले आहे.
इमेज
  संस्कृती विसरल्यामुळे विकृती वाढते - प्रशांत महाराज खानापूरकर अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)        सद्यःस्थितीत  तरुण पिढी आणि समाजातील अनेक घटक संस्कृती विसरत आहे आणि संस्कृती विसरल्यामुळे विकृती वाढत आहे .असे प्रतिपादन प्रशांत महाराज खानापूरकर यांनी केले.  बिड जिल्ह्यातील व अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव येथे दक्षिण मुखी दत्त मंदिर संस्थान द्वारा आयोजित केलेल्या  भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याच्या कीर्तनात श्री संत तुकाराम महाराज यांच्या *दीन  आणि दुर्बलासी / सुखरासी हरी कथा* //  या अभंगावर त्यांनी निरूपण केले. पुढे बोलताना ते म्हणाले की ,समाजामध्ये तरुण पिढी ही अतिशय वाम मार्गाला जात आहे. व्यसनाच्या अहारी गेलेली पिढी समाजात विकृत कृत्य  करत आहेत. या तरुण पिढीला आवरणे अवरून त्यांना सावरणे आणि त्यांचे प्रबोधन करणे अत्यंत आवश्यक आहे . सध्या तरुण पिढीमध्ये गुन्हेगारी खूप प्रमाणात वाढत आहे याला कारण फिल्मी इंडस्ट्री मध्ये होणारे विकृत दर्शन आणि समाजाने विकृतीला दिलेला आश्रय यामुळे ही तरुण पिढी बर्बाद होत आहे. विकृती पेक्षा संस्क...
इमेज
  परभणी:  आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेतृत्व विजय वाकोडे यांचं निधन  परभणी,(प्रतिनिधी) :  भारतीय रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेतृत्व विजय वाकोडे यांचे सोमवारी (दि.16) रात्री र्‍हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 63 वर्षांचे होते. या घटनेने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.               येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीच्या काचेची तोडफोड करीत संविधानाचा अवमान केल्याची घटना 10 डिसेंबर रोजी घडली. घटना घडल्या बरोबर ज्येष्ठ नेते वाकोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली व तेथील स्फोटक परिस्थिती तात्काळ ओळखून  तातडीने अत्यंत संयमाची भूमिका घेतली. दुसर्‍या दिवशीसुद्धा या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदच्या आंदोलनात दरम्यान वाकोडे यांनी संपूर्ण बंद शांततेत आणि सुरळीतपणे पार पडावा या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. अति उत्साही कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला.  दरम्यान या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस ...
इमेज
  गेवराई येथे 16 डिसेंबर 1971 विजय दिन साजरा गेवराई ,प्रतिनिधी.....       आज दिनांक 16 डिसेंबर 2024 सोमवार रोजी सकाळी ठीक अकरा वाजता वीर जवान तुझे सलाम माजी सैनिक संघटना गेवराई यांच्या वतीने 1971 चा विजय दिवस जुनी नगरपरिषद गेवराई या ठिकाणी अगदी आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आ. कॅप्टन सुभेदार मेजर राम कृष्ण चेडे साहेब यांनी केले सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तदनंतर उपस्थित सर्व माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण केले नंतर सर्वांनी उभे राहून 1971 च्या शहिदासाठी दोन मिनिट मोहन ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. श्री चिडे साहेबांनी 1971 च्या युद्धाबद्दल सविस्तर माहिती सांगितली 1971 प्रत्यक्ष सहभागी असलेले कॅप्टन अर्जुनराव ढाकणे साहेब यांनी युद्धातील सत्य घटना सांगितली अध्यक्ष श्री बळीराम डोंगरे यांनी 1971 यांचा बद्दल थोडक्यात माहिती दिली कार्यक्रमासाठी खालील माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.  कॅप्टन अर्जुन राव ढाकणे सा...
इमेज
  अंबाजोगाई शहराच्या जवळ बुटेनाथ दरिमथ्ये बनावट दारूच्या कारखान्यावर छापा, ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या धाडीने शहरात खळबळ अंबाजोगाई (वसुदेव शिंदे) :- राज्य उत्पादन शुल्क च्या पथकाने अंबाजोगाई शहरातील बुट्टेनाथ दरी मध्ये असलेल्या बनावट दारू  कारखान्यावर धाड टाकून ३६ लाख रुपयांचा  मुद्देमाल जप्त केल्या मुळे शहरात खळबळ उडाली आहे. मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड विश्वजीत ए. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.१६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे मौ. बुट्टेनाथ दरी येथे काटवन झाडीत असलेल्या गोडावून शेडमध्ये  छापा टाकत, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रं. ०२ बीड, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई,  निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माजलगाव, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड  यांच्या पथकाने कारवाई करत छापा टाकला असता सदरील गोडावून पत्री शेडमध्ये खालील प्रमाणे मुद्येमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.              या मध्ये १) बनावट देशी दारु रॉकेट मद्याच्या १०५०० बॉटल (१०५ बॉक्स) त्याची...
इमेज
चौथ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे नांदेडमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विमोचन  चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे मूल्य संवर्धन व्हावे- बाळासाहेब पांडे नांदेड : दिनांक 14 डिसेंबर प्रतिनिधी अजिंठा फिल्म सोसायटी व देवगिरी चित्रसाधना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि.८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी जळगाव येथे राज्यस्तरीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे ४ थे संस्करण होणार असून, या फेस्टिव्हलच्या पोस्टरचे अनावरण नांदेड येथे दिनांक 13 डिसेंबर रोजी अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे, सचिव ॲड. सौ. वनिता जोशी, क्रिएटिव्ह कोचिंग अकॅडमीचे  संचालक प्रा. रमाकांत जोशी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नांदेड जिल्ह्याचे कार्यवाह प्राचार्य हेमंत इंगळे,  मुक्ताई प्रतिषठानचे सचिव राजेश महाराज देगलूरकर, सुयोग इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका डॉ. अमन जयेंद्र बरारा , प्राचार्य आबासाहेब कल्याणकर, एन एस बी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी, सनतकुमार महाजन, संघाचे जिल्हा प्रचारप्रमुख संकेत कुलकर्णी, शहर प्रचार प्रमुख विजय राठोड, संतोष कुलकर्णी, धनं...

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

इमेज
  परळीतील बहुचर्चित व्यापारी अपहरण प्रकरणातील आरोपी मुद्देमालासह परळी पोलिसांनी पकडले- जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा.....            परळी शहरातील युवा व्यावसायिक अमोल विकासराव दुबे यांचे अपहरण करून त्यांच्याकडून काही रक्कम घेऊन त्यांना सोडून देण्यात आले होते. या प्रकरणाची संपूर्ण राज्यात मोठी चर्चा व खळबळ झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या प्रकरणातील अपहरणकर्त्या आरोपींना मुद्देमाला सह पकडले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी परळीत पत्रकार परिषद घेऊन दिली. या आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी, एक रिवाल्वर सह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.     याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले की, पोलीस ठाणे परळी शहर गुरनं. 192/2024 कलम 126 (2),140(2),308(3),(4)(5), 351(2), (3),3 (5) बी.एन. एस. सहकलम 3/25 शस्त्र अधिनियम मधील फिर्यादी नामे अमोल विकासराव डुबे रा. टेलर लाईन परळी बे.ता. परळी जि. बीड, यांनी फिर्याद द...
इमेज
Proud of you Maa : पंकजा मुंडे मंत्री झाल्यानंतरची 'ही'भावूक पोस्ट चर्चेत!         ●  परळी वैजनाथ ●   Proud of you Maa  असे म्हणत पंकजा मुंडे मंत्री झाल्यानंतरची 'ही'भावूक पोस्ट चर्चेत आली आहे.ही पोस्ट सोशल मीडियातून केली आहे बीडच्या विक्रमादित्य माजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांची. या अभिनंदनाच्या पोस्ट सह त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.     लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात भाजप नेत्या प्रितम मुंडे यांचं तिकीट कापून त्यांची बहीण पंकजा मुंडे यांना उमदवारी देण्यात आली होती. मात्र बीडमधील सामाजिक आणि राजकीय परस्थितीचा फटका बसल्याने पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. मात्र, प्रितम मुंडे यांची जागा पंकजा मुंडे यांना देण्यात आल्यामुळे त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार का? अशी चर्चा सुरु होती. प्रितम मुंडे यांचे लोकसभेचे तिकीट कापले गेले, त्यानंतर त्यांना आमदारकी किंवा राज्यसभेवर संधी मिळणार का, असा प्रश्न निर्माण होत होता. मात्र, विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना संधी देण्यात आली नाही. मात्र प्रीतमताई मुंडे यांनी कधीही अशा प्रकारची आकांक्षा जाहीरपणाने...

समाधीस्थळी 'आशिर्वादाची' पुष्पपुजा !!!!!

इमेज
  मुंडे बंधु -भगिनीचा मंत्री म्हणून होणार शपथविधी: गोपीनाथगडावरुन 'आशिर्वाद' ! समाधीस्थळी 'आशिर्वादाची' पुष्पपुजा ( पुष्पसजावट:विठ्ठल मुंडे,गोपीनाथगड ) परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          नागपूर येथे आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून या मंत्रिमंडळात ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण म्हणजे मुंडे बहीण भाऊ कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे राष्ट्रवादीकडून तर पंकजा मुंडे भाजप कडून मंत्रीपदी विराजमान होत आहेत. चार वाजता राजभवनात हा शपथविधी सोहळा होणार आहे. तत्पूर्वी गोपीनाथ गडावर दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळावरून 'आशिर्वाद' अशी पुष्प सजावट करून समाधीची पूजा करण्यात आली आहे.              दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा वसा आणि वारसा समर्थपणे चालवणाऱ्या भाजपा राष्ट्रीय सचिव आ. पंकजा मुंडे या पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. सकाळीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन करून...
इमेज
  ऐतिहासिक क्षण: बहिण पंकजा मुंडे सह भाऊ धनंजय मुंडेही घेणार मंत्री पदाची शपथ  परळी वैजनाथ प्रतिनिधी भाजपाच्या कोट्यातून बहीण पंकजा मुंडे यांना मंत्रीपदासाठी शपथ घेण्याचा निरोप सकाळीच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदा बाबतची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असताना आता पक्षाच्या वतीने अधिकृतपणाने धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी तयार राहा असा फोन आलेला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याला दुग्ध शर्करा योग आला असून मुंडे बंधू भगिनी दोघेही कॅबिनेट मंत्री म्हणून आज दुपारी चार वाजता नागपुरातील राजभवनात शपथ घेणार आहेत. सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने धनंजय मुंडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात होते. पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेते असल्याने त्यांची भाजपाकडून मंत्रिमंडळात वर्णी लागणार हेही निश्चित मानले जात होते. अपेक्षेप्रमाणे आता मुंडे बंधू-भगिनींचा दोघांचाही मंत्रिमंडळात समावेश होत असून बीड जिल्ह्यात आनंद व्यक्त केला जात आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबतचा अधिकृत फो...
इमेज
  अधिकृत माहिती: पंकजाताई मुंडे घेणार आज मंत्रिपदाची शपथ मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा आज (15 डिसेंबर) नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. आज दुपारी 4 वा.राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा आज नागपूर येथे शपथविधी सोहळा होणार असून या मंत्रिमंडळ विस्तारात भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजाताई मुंडे यांची वर्णी लागली आहे. अधिकृत रित्या पक्षाच्यावतीने पंकजा मुंडे यांच्या नावाची घोषणा झाली असून मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचा संदेश अधिकृतरित्या त्यांना आलेला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकृत फोन करून  शपथ घेण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत संदेश दिला आहे.  सुरुवातीपासूनच पंकजा मुंडे यांची मंत्रीपदी वर्णी लागणार हे निश्चित होते मात्र शेवटच्या क्षणापर्यंतही शपथविधीत कोण कोण मंत्री होणार याबाबत मोठा सस्पेन्स ठेवण्यात आला होता. आता आज सकाळी संबंध...

33 वर्षानंतर नागपुरात होणार मंत्र्यांचा शपथविधी......!

इमेज
  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार: कोणकोण होणार मंत्री ? :  1991 नंतर प्रथमच होणार नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी ! मुंबई:  राज्य मंत्रिमंडळाचा उद्या (15 डिसेंबर) नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. उद्या दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत अशी खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी कोकण-  1. रविंद्र चव्हाण  2. नितेश राणे  मुंबई   1. मंगलप्रभात लोढा  2. आशिष शेलार  3. अतुल भातखळकर  पश्चिम महाराष्ट्र  1. शिवेंद्रसिंहराजे भोसले  2. गोपीचंद पडळकर  3. माधुरी मिसाळ  4. राधाकृष्ण विखे पाटील  विदर्भ  1. चंद्रशेखर बावनकुळे  2. संजय कुटे  उत्तर  महाराष्ट्र   1. गिरीश महाजन  2. जयकुमार रावल  मराठवाडा  1. पंकजा मुंडे 2. अतुल सावे राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 मंत्र...