पोस्ट्स

डिसेंबर २२, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
मंत्रिमंडळात मुंडे व कदम परिवारातील दुसर्‍या पिढीचा  असाही एक योगायोग ! मुंबई- राजकारणामध्ये अनेक बाबींची पुनरावृत्ती होत असते किंवा एका घटनेची साधर्म्य  सांगणारी दुसरी घटना काळाच्या ओघात घडताना दिसते. काही योगायोग हे अधोरेखित होत असतात. एकाच मंत्रिमंडळात मुंडे बहिण भाऊ कॅबिनेट मंत्री असा एक योगायोग असताना मुंडे व कदम परिवारातील दुसर्‍या पिढीच्या बाबतीतही एक योगायोग बघायला मिळत आहे.        राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या विभागाचे राज्यमंत्री म्हणून योगेश रामदास कदम यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांनी आज धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. स्व. गोपीनाथराव मुंडे राज्याचे गृहमंत्री असताना रामदास भाई कदम हे त्याच खात्याचे राज्यमंत्री होते, आज धनंजय मुडे यांच्याकडे ज्या विभागाचा कार्यभार आहे त्याच खात्याचे राज्यमंत्रीपद योगायोगाने श्री. योगेश कदम यांना मिळालेले आहे. मुंडे आणि कदम कुटुंबातील हा योगायोग दुसऱ्या पिढीपर्यंत ही चालत आलेला दिसुन येत आहे. 
इमेज
सर्व कार्यक्रम रद्द करून पंकजा मुंडेंनी अत्यंत साधेपणाने घेतला पदभार मुंबई- राज्याच्या पर्यावरण व वातावरण बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मंत्रालयातील दालनात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे ठरलेले सर्व कार्यक्रम रद्द करून अत्यंत साधेपणाने पदभार स्वीकारून कामकाजाची सुरुवात केली. प्रथम गणेशाची पुजा करून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.          तत्पुर्वी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री, शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्री कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
इमेज
पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द! मुंबई, प्रतिनिधी...        देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाले आहे.या अनुषंगाने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत राज्याच्या पर्यावरण व वातावरण बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्रालयातील आपले आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.       माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, "माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचे  दुःखद निधन झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.त्यांचे योगदान देशवासियांना सदैव स्मरणात राहील. आदरांजली म्हणून माझे मंत्रालयाच्या दालनातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत याची नोंद घ्यावी. सर्वांनी सोमवार नंतर भेट घ्यावी ही विनंती." -पंकजा गोपीनाथ मुंडे.  मंत्री, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन -महाराष्ट्र राज्य.
इमेज
  परळीत गळफास लावून एका युवकाची आत्महत्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      आनंदनगर, पद्मावतीगल्ली भागात संत नरहरी महाराज मंदिर परिसरातील रहिवासी एका युवकाने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि.27 रोजी मध्यरात्रीनंतर 2 वा.घडली आहे.याप्रकरणी पो.स्टे. संभाजीनगर येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.      पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दि.27 रोजी मध्यरात्रीनंतर 2 वा. सुमारास मयत युवकाने घरातीलच लोखंडी हुकाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.मनोज मारोती काळे वय ४१ वर्षे असे मयताचे नाव आहे.दारुच्या नशेत त्याने ही आत्महत्या केली असल्याचे कारण पोलिसात दिलेल्या प्रथम खबरीत देण्यात आलेले आहे. याप्रकरणी पो.स्टे. संभाजीनगर येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सफौ सौंदनकर हे करीत आहेत.
इमेज
  अर्थव्यवस्थेचा 'सरदार' हरपला! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन नवी दिल्ली  :  देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्थेची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. मनमोहन सिंग हे साधे जीवन जगणारे नेते होते. त्यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली असा परिवार आहे. साहित्य, संगीत आणि अध्यात्मात त्यांना प्रचंड रस होता. मनमोहन सिंह यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरात शोककळा पसरली. सन 2004 साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉ.मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले. 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली. पण मनमोहन सिंहांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताह...

स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच व्हावी, पहिल्या दिवसापासून माझी मागणी - धनंजय मुंडे

इमेज
  स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच व्हावी, पहिल्या दिवसापासून माझी मागणी - धनंजय मुंडे या घटनेच्या आडून मला सामाजिक व राजकीय आयुष्यातून उठवायचा डाव - धनंजय मुंडे मुंबई (दि. 26) - मसाजोगचे तरुण सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना व त्यांचे जे कोणी सूत्रधार असतील त्यांना फाशीच दिली जावी, ही माझी पहिल्या दिवसापासून ची मागणी असून या प्रकरणातील तपास पूर्ण करून तातडीने याची चार्ज शीट दाखल करून हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवले जावे व देशमुख यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जावा ही माझी पहिल्या दिवसापासून ची मागणी आहे असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.  धनंजय मुंडे यांनी आज अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारत विभागाचा आढावा घेतला. सह्याद्री अतिथी गृह येथे संपन्न झालेल्या या आढावा बैठकीनंतर धनंजय मुंडे माध्यमंशी बोलत होते.  बीड जिल्ह्यातील एका तरुण सरपंचाची हत्या झाली, हे प्रकरण अत्यंत दुर्दैवी आणि तितकेच भयानक आहे, त्यामुळे यातील कुठल्याही आर...

संतोष देशमुख माझा बुथप्रमुख, लेकराला न्याय मिळेल

इमेज
  पदभार घेण्यापूर्वी ना. पंकजाताई मुंडे कोल्हापूर महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक विभागाचा घेतला आढावा ; कार्यकर्ते, उद्योजकांशी साधला संवाद नद्यांना प्रदुषण मुक्त करण्यासाठी पंतप्रधान, केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट घेणार कोल्हापूर ।दिनांक २६। राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे उद्या शुक्रवारी (ता. २७) आपल्या मंत्रालयीन दालनात पदभार घेऊन कामकाज सुरू करणार आहेत. पदभार घेण्यापूर्वी त्यांनी आज कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. मला जे खाते मिळाले आहे ते सृष्टीला वाचवण्यासाठीचे आहे, त्यामुळे जास्तीत जास्त चांगलं योगदान मी यात देणार आहे.  पर्यावरणाच्या माध्यमातून नद्यांना प्रदुषण मुक्त करण्यासाठी  पुढाकार घेणार आहे, यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.    ना. पंकजाताई मुंडे आज कोल्हापूर दौर्‍यावर होत्या. सकाळी त्यांनी श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. तत्पूर्वी विमानतळावर त्यांचं आ. अमल महाडिक व भा...
इमेज
हवेत फायरिंग प्रकरणी आरोपी अटकेत; रिव्हॉल्व्हर अन् जिवंत काडतूस जप्त  परळी : मागील वर्षी दिवाळी दरम्यान परळीच्या  बँक कॉलनीतील घराजवळ वाहन पूजा करत असताना एका तरुणाने रिव्हॉल्व्हरमधून हवेत फायरिंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी कैलास फड ( रा. कन्हेरवाडी .हल्ली मुक्काम बँक कॉलनी परळी) याच्या परळी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यास आज दुपारी पोलिसांनी अटक केली. यावेळी गुन्हयातील रिव्हॉल्व्हर, २३ जिवंत काडतूस व २ पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दरम्यान, आरोपीस परळी न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.        याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी  की, रिव्हॉल्व्हरमधून हवेत फायर होत असल्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओची पोलिसांनी पडताळणी केली त्यात मागील दिवाळीत परळी शहरातील बँक कॉलनी भागातील युवक कार्यकर्ते  कैलास फड यांनी 12 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी वाहनाची पूजा करत असताना त्यांच्या जवळील रिव्हॉल्व्हर वरच्या दिशेन...
इमेज
  कचरूलालजी राठी यांचे निधन प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगरमधील श्रेयनगर येथील ज्येष्ठ नागरिक कचरूलालजी मदनलालजी राठी (वय ८९, मूळ रा. परळी वैजनाथ, गणेशपार) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात अमेरिकास्थित राजकुमार व रामप्रसाद ही दोन मुले, कृष्णा, मंगल या विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.

स्मार्ट शिधापत्रिका आणि आधुनिक गोदाम व्यवस्थेला प्राथमिकता देणार

इमेज
  अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने पारदर्शकता आणि जबाबदारीने काम करावे - मंत्री धनंजय मुंडे स्मार्ट शिधापत्रिका आणि आधुनिक गोदाम व्यवस्थेला प्राथमिकता देणार पदभार स्वीकारत धनंजय मुंडेंनी घेतला विभागाचा आढावा मुंबई दि. २६ - अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे सेवा देण्याचे अत्यंत महत्वाचे काम आहे. प्रामाणिकता, पारदर्शकता आणि अकाउंटिबीलिटी या त्रिसूत्रीचा अवलंब करून विभागात चांगले करावे, सर्व सामान्य नागरिकांच्या रोजच्या जगन्याशी या विभागाचा संबंध आहे त्यामुळे अधिक पारदर्शकपणे आणि जास्त जबाबदारीने काम करावे अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या.  स्मार्ट शिधापत्रिका आणि आधुनिक गोदाम व्यवस्था याला प्राथमिकता देणार असल्याचेही धनंजय मुंडेंनी यावेळी सांगितले.  सह्याद्री अतिथीगृह येथे आज मंत्री श्री मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचा सविस्तर आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.   शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार करत असताना विभागाचे डीजीटायजेशन , आधुनिक गोदाम व्यवस्था याचा अंतर्भाव करण्याच...
इमेज
  ...तर मी पालकमंत्री म्हणून बीडलाही जाईल पण - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ? नागपूर :  काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण तापलं आहे. त्यानंतर आता बीडमधील गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणाची चौकशी आणि संपूर्ण तपास सुरू असतानाच फडणवीसांनी आज नागपुरात बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. बीडमध्ये आम्ही कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला आहे.  कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद फडणवीसांना हवं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, पालकमंत्र्याच्या संदर्भात आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल, त्यांनी मला बीडला जायला सांगितलं तर मी बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगि...

नवे एसपी येताच : कारवायांचा धडाका सुरु

इमेज
प्रतिबंधित अवैध तंबाखूजन्य पदार्थांवर परळीच्या गावभागात कारवाई:40 हजार रुपयांचा माल ताब्यात परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेले तंबाखू, पानमसाला, गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कारवाईत गावभागात किरायाने राहणाऱ्या एका व्यक्तीकडून बेकायदेशीर अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थ जवळ विक्रीच्या उद्देशाने बाळगले म्हणून चाळीस हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार जुन्या गावभागातील अंबेवेस परिसरात महेश मनोहर बलशेटवार हे किरायाने राहतात. त्यांच्याकडे राज्यामध्ये प्रतिबंधित असलेले तंबाखू, पान मसाला, गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थ अवैध विक्रीसाठी साठवलेला असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला.या कारवाईत संबंधित इसमाकडे एकूण 40652 रुपयांचा माल आढळून आला. हा माल पुरवठा करणारा क...

शस्त्रधारकांनी अटी व शर्तीचा भंग करू नये - पो.नि.नाचण

इमेज
हवेत गोळीबार: व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल  शस्त्रधारकांनी अटी व शर्तीचा भंग करू नये - पो.नि.नाचण परळी प्रतिनिधी.......             स्वतःच्या परवानाधारक रिव्हालवरमधून  हवेत गोळीबार केल्याप्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षकाच्या आदेशानुसार परळी शहर पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान परवानाधारक शस्त्र धारकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या अटी व नियमाचा भंग करू नये. असे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे आवाहन पोलीस निरीक्षक नाचन यांनी केले आहे.       याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सोशल मीडियावर रिवाल्वर मधून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली आणि याबाबत त्यांनी शहर पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्या. त्यानंतर परळी शहर पोलिसांच्या गुप्तचर विभागाने माहिती काढल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू फड यांच्या फिर्यादीवरून कैलास फड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 24, 527, 30 आर्म्स ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.    ...

पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देणार --------

इमेज
  ना.पंकजाताई मुंडे 'इज इन ॲक्शन'; मंत्रिपदाची जबाबदारी येताच विभागाच्या अधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक पर्यावरण व वातारणीय बदलाबांबतच्या योजना राबविण्याबाबत सुनियोजित आराखडा तयार करण्याचे दिले निर्देश  मुंबई,।दिनांक २४। पर्यावरण व वातारणीय बदल या विभागातील राबविण्यात येणा-या योजना,भविष्यातील ध्येय धोरणे,घनकचरा व्यवस्थापन,माझी वसुंधरा अभियान,पाणी,हवा प्रदुषण,नदी व तलाव संवर्धन, पर्यावरण जतन व संवर्धन जनजागृती उपक्रमां विषयी सुनियोजित आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी विभागांचा आढावा घेताना दिल्या.    खातेवाटप झाल्यानंतर मंत्रिपदाची जबाबदारी येताच ना. पंकजाताई मुंडे यांनी आज सहयाद्री अतिथीगृहात पर्यावरण आणि पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बोलतांना त्या  म्हणाल्या की,राज्यातील घनकचरा व्यवस्थापन,पाणी,हवा प्रदूषण नियंत्रण,नदी व तलाव संवर्धन,पर्यावरण जतन व  संवर्धन जनजागृतीपर उपक्रम,राज्यस्तरीय नदी संवर्धन योजना,सागर तटीय विशेष राखीव क्षेत्र नियमन,स्थ...
इमेज
 संगीत नाटकअकादमी, दिल्ली तर्फेकला प्रवाह महोत्सवाचे अंबाजोगाईत आयोजन ----------------------------------- दिग्गज कलावंतासह  संगीत अलंकार प्रा. शंकर सिनगारे  आणि भरतनाट्यम कलावंत  सौ.अनुराधा विनोद निकम यांचेही सादरीकरण ----------------------------------- (अंबाजोगाई प्रतिनिधी):-संगीत नाटक अकादमी, संस्कृति मंत्रालय,भारत सरकार,(दिल्ली) तहसील कार्यालय, अंबाजोगाई व श्री. योगेश्वरी देवल कमेटी आणि विश्वस्त मंडळ अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने मनोहर अंबानगरीत 2 दिवसीय "कला प्रवाह महोत्सव" आयोजित केला आहे. या महोत्सवा मध्ये सांप्रदायीक भजन, शास्त्रीय गायन,शास्त्रीय नृत्य व लोकनृत्य या कलेचा आविष्कार रसिकांना बघायला मिळणार आहे. देशभरातील नामवंत कलावंतांची हजेरी या महोत्सवात असणार आहे. भरतनाट्यम कलावंत  सौ.अनुराधा विनोद निकम या कार्यक्रमात आपला भरतनाट्यम आविष्कार सादर करणार आहेत.त्यांनी प्रख्यात भरतनाट्यम गुरू शारदापुत्र डॉ. विनोद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध महोत्सवात कला सादरीकरण केले आहे. तसेच प्रा. शंकर सिनगारे आपली संगीत सेवा सादर करणार आहेत.संगीत अलंकार प्...
इमेज
  कर्नाटकात घडली घटना: घटप्रभेत ऊसतोड मजुराचा मुकादमाकडून खून :दोघेही परळी तालुक्यातील रहिवासी गोकाक जि.बेळगाव(कर्नाटक). २३ :  गोकाक येथून जवळचअसणाऱ्या घटप्रभा येथे घटप्रभा- हुक्केरीदरम्यान असणाऱ्या प्रख्यात दवाखान्याच्या आवारात ऊसतोडणी कामगार विकास बालासाहेब जोगदंड (वय २८, रा. अस्वलंबा, ता. परळी, जि. बीड) याचा त्याच्याच गावाचा मुकादम श्रीकृष्ण विठ्ठल ढाकणे (वय ४७, रा. अस्वलंबा, ता. परळी, जि. बीड) याने झोपेत असताना डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे.             घटप्रभा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुकादम ढाकणे हा आजारी असल्याने त्यास विकास जोगदंड याने उपचारासाठी दवाखान्यात आणले होते. दवाखान्यात दाखल करून जोगदंड दवाखान्या बाहेर उभारण्यात आलेल्या जगद्गुरू गुरु सिद्धेश्वर मूर्ती जवळ रात्री साडेअकराच्या सुमारास झोपला होता. श्रीकृष्ण ढाकणे हा दवाखान्या बाहेर आला आणि काही कळायच्या आत विकास जोगदंड च्या  डोक्यात चाळीस किलो पैक्षा मोठा दगड घातला.व छातीवर बसून दगडणे तोंड डोके ठेचू लागला हे पाहून दवाखान्याच्या सुरक्षा रक्षकाने ताबोड तोब...

जाणून घ्या- पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया काय?| यापूर्वी कोणी कोणी भुषवलं हे मंत्रीपद ? |

इमेज
  पंकजा मुंडेंकडे महत्त्वाकांक्षी मंत्रालय ! पर्यावरण - हवामान बदल आणि पशुसंवर्धन खातं: पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया काय? मानवतेच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या पैलूंवर काम करण्याची एवढी मोठी संधी ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       नव्या मंत्रिमंडळात महायुतीच्या तिन्ही प्रमुखांनी वजनदार खाती आपल्याकडे राखली. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपद कायम ठेवलं आहे. तर एकनाथ शिंदेंनीही नगरविकास खाते आपल्याकडेच राखले आहे आणि यासोबतच गृहनिर्माण खातेही मिळाले आहे. तर अजित पवारांनीही अर्थखात्याची धुरा स्वत:कडेच ठेवली याव्यतिरिक्त त्यांना राज्य उत्पादन शुल्क खातंही मिळालं आहे. यावेळी प्रमुखांना नेत्यांना वगळता अन्य सर्व मंत्र्यांच्या खात्यांची अदलाबदल झाली आहे. यातच विधानपरिषदेच्या एकमेव मंत्री ठरलेल्या पंकजा मुंडेंच्या पारड्यात महत्त्वाकांक्षी असे पर्यावरण मंत्रालय पडले आहे.         पंकजा मुंडे यांनी यापूर्वी मंत्री म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. सर्वंकष जनहिताचे नवनवीन उपक्रम व नवनव्या संकल्पना राबवून त्या यशस्वी करुन दाखवणार्‍या मंत्...
इमेज
विना परवाना जनावरांची वाहतूक करणाऱ्या व जनावरांच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल;एकुण ४ लाख ७० हजाराची कारवाई  परळी वैजनाथ दि.२२ (प्रतिनिधी)         महिंद्रा बोलरो पिकअप मधून जनावरांची विना परवाना वाहतूक व जनावरांचा छळ केल्याप्रकरणी येथील एका व्यक्ती विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      येथील ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील अनंत केशव गित्ते याने आपल्या महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच ०४ एचडी ७९३२ मधून तीन बैल व एक गोरा असे एकुण ४ लाख ७० हजाराची जनावरे व एक पीकअप खरेदी विक्रीचा परवाना न बाळगता जनावरांना वेदणा होतील अशारितीने गाडीत एका जागेवरून दुस-या जागेवर गैरवाजवी पणे आखुड जागेत दोरीने बांधुन चारापाणी न करता जनावरांना क्रूर वागणुक देवुन छळ करुन विनापरमीट घेवुन जात असल्या कारणाने ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पो.हे. रमेश तोटेवाड करत आहेत.
इमेज
  विना परवाना जनावरांच्या वाहतूक केल्याबद्दल दोघावर गुन्हा दाखल :4 लाखाची कारवाई  परळी वैजनाथ ,प्रतिनिधी.......         परळी गंगाखेड रस्त्यावर उक्कडगाव कॅनाॅलजवळ एका बोलरो पिकअप मध्ये जनावरांची विना परवाना वाहतूक होत होती, पोलीसांना माहिती मिळताच या गाडीची तपासणी केली असता जनावरे आढळून आली, या प्रकरणी दोघावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         परळी गंगाखेड रस्त्यावर उक्कडगाव कॅनाॅलजवळ ताजिदिन हनिफ पठाण (रा. पानगाव, रेणापूर), मोहिन शेख पि काळु शेख (परळी) हे दोघे महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच २४ बी ६६७५ मध्ये जनावरे खरेदी विक्रीचा परवाना न बाळगता जनावरांना वेदना होतील अशा रितीने गाडीत एका जागेवरुन दुस-या जागेवर गैरवाजवी पणे आखुड जागेत दोरीने बांधुन चारापाणी न करता जनावरांना क्रूर वागणुक देवुन छळ करुन विनापरवाना घेवुन जात असताना आढळून आला. या प्रकरणात एकूण 4,01,000/-  याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण जाधव यांच्या फिर्यादिवरुन येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्री त...