अखिल भारतीय ग्राहक पंचायत परळी वैजनाथचे कार्य कौतुकास्पद - डाॅ.किरण पारगावकर ग्राहक पंधरवाडा निमित्त गाठीभेटी परळी वैजनाथ, प्रतिनिधी.. अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा परळी वैजनाथ च्या वतीने ग्राहक पंधरवाडा निमित्त परळी शाखेतील जुने दिवंगत कार्यकर्ते कै. शशिकला विशंभरराव पारगावकरयांच्या कुटुंबांची भेट घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्या मध्ये तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचा सहभाग किती मोलाचा होता. त्यांनी कार्य कशाप्रकारे केले.आजही आम्हाला त्यांच्या आठवणी येतात. चित्राताई त्यावेळी त्यांच्या सोबत होत्या.म्हणून त्यांना त्यांचे कार्य बद्दल, चर्चा करताना. प्रत्येक गोष्ट आठवत होती.त्यांचे कार्य किती मोलाचे ठरले याबद्दल दिवंगत कार्यकर्त्याचा मुलगा डॉक्टर किरण पारगावकर यांच्याशी चर्चा आमच्या संघटनेच्या अध्यक्षा चित्र देशपांडे व संघटन मंत्री विजयाताई दहिवाळ आणि सल्लागार अशोक शहाणे यांनी चर्चा करून त्यांना दिवंगत सौ शशिकला विश्वंभरराव पारगावकर यांच्या नांवे कृतज्ञता पत्र देऊन आभार व्यक्त केले. यावेळी डॉ. किरण पारगावकर यांनीह...
पोस्ट्स
जानेवारी ५, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
प्रदूषण नियंत्रणात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी ॲप तयार करण्याच्या दिल्या सूचना
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील हवेची गुणवत्ता उत्तम करण्यासाठी प्रयत्न करा - पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडे प्रदूषण नियंत्रणात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी ॲप तयार करण्याच्या दिल्या सूचना मुंबई, दि. ७ - मुंबईतील हवेची गुणवत्ता सध्या असलेल्या पातळीपेक्षा चांगली असणे अपेक्षित आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीची हवा गुणवत्ता पातळी चांगली असली तरीदेखील ही गुणवत्ता पातळी फेब्रुवारीमध्ये उत्तम दर्जापर्यंत सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या. मंत्रालयात आज मुंबईतील हवा प्रदूषण विषयक प्रश्नाबाबत व ते प्रदूषण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाय योजना याविषयी बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. मुंबईमध्ये सध्या हवेतील कणांचे प्रमाण (PM 2.5 आणि PM 10) या प्रदूषणात वाढ झाली असल्याचे सांगून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, हवेतील हे धुली कणांचे प्रमाण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांचे अथवा इमारतींचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्प्रिंकलर चा वापर बंधनकारक आहे. बांधकामाच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन...
MB NEWS IMPACT:मिळाला न्याय
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
MB NEWS मुळे मिळाला न्याय: 'ती' जाचक अट रद्द- महानिर्मितीने काढले शुद्धिपत्रक; वंचित शेकडो शिकाऊ उमेदवारांना मिळणार संधी ! परळी वैजनाथ,प्रतिनिधी.... महानिर्मिती मध्ये तंत्रज्ञ तीन या पदासाठी सरळ सेवा भरतीच्या जाहिरातीत असलेल्या एका जाचक अटीमुळे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेकडो शिकाऊ उमेदवारांवर या भरती पासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. प्रशिक्षण कालावधी पूर्ण होण्याच्या पाच दिवस अगोदरची तारीख वैध म्हणून गृहीत धरण्यात येणार असल्याने एक वर्षाचे शिकावू (अप्रेंटिसशिप) प्रशिक्षण पूर्ण केलेले परळीतील सव्वाशे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार नाहीत. हा एक प्रकारे अन्याय असून याबाबत महानिर्मितीने तातडीने शुद्धिपत्र काढून या उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.अशा प्रकारची बातमी MB NEWS ने सर्वप्रथम प्रकाशित केली होती.महानिर्मितीने आता शुद्धिपत्रक काढले असुन यामुळे वंचित शेकडो शिकाऊ उमेदवारांना नौकरीसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने जाहिरात क्र. ०४/२०२४ नुसार महाराष्ट्र राज्...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अरोही स्टाईल स्टुडीओच्या वतिने मकरसंक्रांत निमित्त शॉपिंग स्टॉल महोत्सव बालाजी मंदिर अंबेवेस येथे ८ व ९ जानेवारी रोजी आयोजन परळी (प्रतिनिधी) मकरसंक्रांत निमित्त महिलांना आवश्यक असलेल्या वस्तुंची एकाच ठिकाणी खरेदी करता यावी, महिलांच्या व्यवसायाची वृध्दी व्हावी यासाठी परळी शहरातील अरोही स्टाईल स्टुडीओ च्या संचालिका,सामाजीक कार्यकर्त्या सौ.श्रध्दा गजानन हालगे- फुलारी यांच्या वतिने परळी शहरात मकरसंक्रांतीनिमीत्त नारीशक्ती शॉपिंग स्टॉल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या या महहोत्सवास परळी व परिसरातील महिलांनी भेट देवुन माफक दरातील वस्तू खरेदीचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ.हालगे यांनी केले आहे. परळी शहरातील अंबेवेस भागात असलेल्या बालाजी मंदिर येथे बुधवार दि.८ व गुरुवार दि.९ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ६ या वेळेत या स्टॉलमधुन महिलांना मकरसंक्रांतीसाठी लागणारे वाण,गृहपयोगी साहित्याची खरेदी करता येणार आहे.यामध्ये महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू,बाजारपेठेत मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे वाण, चप्पल,साड्या,ज्वेलरी,कटलरी अशा सर्व वस्तू व तिळगुळ स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत.मकरसंक्रा...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दर्पण दिनानिमित्त मनसेच्या वतीने परळीतील पत्रकारांचा सत्कार परळी प्रतिनिधी..... दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका परळी वैजनाथच्या वतीने शहरातील पत्रकारांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मनसेचे परळी तालुका प्रमुख श्रीकांत पाथरकर यांच्या गणेश पार रोड येथील संपर्क कार्यालयात दिनांक 6 जानेवारी दर्पण दिनी या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम ज्येष्ठ पत्रकार जी. एस.सौंदळे व पत्रकार धनंजय अरबुने यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित ज्येष्ठ पत्रकार जी .एस. सौंदळे, पत्रकार रानबा गायकवाड, पत्रकार प्रा.रवींद्र जोशी, पत्रकार धनंजय अरबुने, पत्रकार भगवान साकसमुद्रे, पत्रकार विकास वाघमारे, पत्रकार सचिन मुंडे, पत्रकार श्रीराम लांडगे यांचा पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार रानबा गायकवाड, प्राध्यापक रवींद्र जोशी, भगवान साकसमुद्रे, धनंजय अरबुने यांनी आपले विचार मांडले. का...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
केज मधून गावठी कट्टा व काडतुस जप्त : दोन आरोपी केले जेरबंद केज (दि.६) :- जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या सूचने नुसार जिल्ह्यात अवैध धंदे करणारांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. तसेच अवैध शस्त्र बाळगणारे रडारवर आहेत. त्याच अनुषंगाने अंबाजोगाई नंतर केज तालुक्यातही गावठी कट्टा बाळगणाऱ्यास जेरबंद केले आहे. दि. ६ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार जफर पठाण यांना गुप्त बातमी मिळाली की, केज तालुक्यातील लव्हुरी येथील सोमनाथ राजाभाऊ चाळक याचेकडे एक गावठी कट्टा असून तो लव्हुरी येथे जिल्हा परिषद शाळे जवळ थांबला आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळताच सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांना दिली. त्या संदर्भात पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस हवालदार जफर पठाण यांना दिले. आदेश मिळताच जफर पठाण यांनी सोबत.स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील सहकाऱ्यांनी घेवुन लव्हुरी येथे सापळा लावला. या सापळ्यात त्यांनी लव्हुरी येथुन सोमनाथ राजाभाऊ चाळक यास ताब्यात घेतले. ताब्यात घेताच पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्...
पंकजाताईंना मिळाले भरभरून आशीर्वाद !
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची ना.पंकजा मुंडेंनी घेतली भेट उत्तम कामगिरीसाठी दोन्ही नेत्यांनी ना. पंकजाताईंना दिले भरभरून आशीर्वाद मुंबई।दिनांक ०६। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची आज नवी दिल्लीत राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी भेट घेऊन आभार मानले. यावेळी दोन्ही नेत्यांनी ना. पंकजाताईंना भविष्यातील उत्तम कामगिरीसाठी भरभरून आशीर्वाद दिले. अमित शाह व राजनाथसिंह यांची आज पंकजा मुंडे यांनी भेट घेतली. आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल पंकजा मुंडेंनी आभार मानले, आभार म्हणून पंकजाताई यांनी महाराष्ट्राची आण-बाण व शान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पुस्तक 'श्रीमान योगी' तसेच राष्ट्रसंत भगवान बाबा यांची मूर्ती भेट स्वरूपात दिली. याप्रसंगी अमित शाह व राजनाथसिंह यांनी पंकजाताईंना उत्तम काम करण्यासाठी आशीर्वाद दिले. ••••
संजय खाकरे यांना बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा दर्पण पुरस्कार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकमतचे संजय खाकरे यांना बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा दर्पण पुरस्कार परळी वैजनाथ: प्रतिनिधी... बीड जिल्हा मराठी पत्रकारसंघाच्या वतीने दर्पण पुरस्कार जाहीर करण्यात आले असुन परळीतून लोकमतचे संजय खाकरे यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.लवकरच एका समारंभात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. दरवर्षी देण्यात येणारे पत्रकारितेतील दर्पण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात लोकमतचे परळी वैजनाथ येथील प्रतिनिधी संजय खाकरे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने दर्पण दिनानिमित्त जिल्ह्यातील ११ पत्रकारांना तसेच एका वृत्तपत्र विक्रेत्यांना यावर्षीचा दर्पण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराची घोषणा पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि संस्थापक संतोष मानूरकर यांनी केली आहे. संजय खाकरे हे परळीतील प्रतिथयश पत्रकार आहेत. लोकमत ला १९९६ पासून परळी प्रतिनिधी म्हणू...
महाराष्ट्रातील सर्व विषयांवर संपूर्ण सहकार्य करण्याचा पर्यावरण मंत्र्यांनी दिला शब्द
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ना.पंकजा मुंडेंनी नवी दिल्लीत घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट महाराष्ट्रातील सर्व विषयांवर संपूर्ण सहकार्य करण्याचा पर्यावरण मंत्र्यांनी दिला शब्द मुंबई।दिनांक ०६। राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र असलेले 'श्रीमानयोगी' पुस्तक यावेळी ना. पंकजाताईंनी त्यांना भेट स्वरूपात दिले. ना. पंकजाताई मुंडे आज दिल्ली दौर्यावर होत्या. दुपारी त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या कार्यालयास जाऊन त्यांची भेट घेतली, त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांना 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचे जीवन चरित्र 'श्रीमानयोगी' भेट स्वरूपात दिले. अर्थात, छत्रपती शिवराय आपल्यासाठी आपला अभिमान आहेत आणि आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचे मार्गदर्शकही आहेत असं त्यांनी म्हटलं. यावेळी सन्माननीय मंत्री महोदयांनी महाराष्ट्रामधील सर्व विषयांवर संपूर्ण सहयोग करण्...
बीड जिल्हा सचिव पदी कॉ.एड. अजय बुरांडे यांची फेरनिवड
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सामाजिक सलोखा व कष्टकऱ्यांच्या लढाईसाठी लाल झेंडा तेवत ठेवू - कॉ.अजित नवले माकपचे मोठ्या उत्साहात जिल्हा अधिवेशन बीड जिल्हा सचिव पदी कॉ.एड. अजय बुरांडे यांची फेरनिवड परळी / प्रतिनिधी भांडवलदारी दलदलीत कमळ खुलवण्यासाठी सर्वत्र जाती आणि धार्मिक द्वेषाचा चिखल उडवून अस्मितेच्या राजकारणातून शोषणाचा पाया पक्का केला जात असताना सर्वसामान्य सर्वहारा जनतेचे मूलभूत प्रश्न राजकीय पटावर सातत्याने तेवत ठेवत समाजात विर्जन घालणाऱ्या जातीवादी व धर्मांध ताकतीचे प्रस्त वाढत आहे. ते थोपवणे व पक्ष सभासदांनी जनमानसाला हतबलता न येऊ देण्यासाठी आपापसात प्रेमभाव वाढवून सर्व कल्याणाचा विचार पेरून लाल झेंडा तळपत ठेऊ असा विश्वास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी सदस्य कॉ.डॉ.अजित नवले यांनी व्यक्त केला. क्रांतिकारी पक्ष म्हणून ओळख असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्ह्यात मोठा इतिहास असून स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीसह देशातील शेतकऱ्यांना पहिली कर्जमुक्ती मिळवून देणारे बीड जिल्ह्याचे माजी खासदार क्रांतीसिंह नाना पाटील, आपली सबंध हयात सर्वहरा वर्गाच्या उत्कर्षासाठी घालवणारे माजी ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
गोविंद कांदे यांना मातृशोक; श्रीमती कमलबाई कांदे यांचे निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः- परळी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गोविंद बाबुराव कांदे यांच्या मातोश्री श्रीमती कमलबाई बाबुराव कांदे यांचे शुक्रवार, ३ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने देशपांडे गल्लीतील राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७५ वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी परळीतील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा गोविंद कांदे, सून, नातू, नात असा परिवार आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांची बदनामी केल्याची होती तक्रार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आपहरणाचा बनाव करणाऱ्या ज्ञानेश्वर इंगळे यांच्यावर गुन्हा दाखल मंत्री पंकजा मुंडे यांची बदनामी केल्याची होती तक्रार केज :- प्रतिनिधी....अपहरणाचा बनाव करून पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल वक्तव्य करीत त्यांची बदनामी आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा बातम्या प्रसारित केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर इंगळे (रा. कळमअंबा, ता. केज) याच्याविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. कळमअंबा (ता. केज) येथील ज्ञानेश्वर इंगळे याने १ जानेवारीला पहाटे ५ वाजेच्या सुमारास पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून २० लाख रुपयांचे पत्र आणायचे आहे, त्यासाठी पंकजा मुंडे यांना १० टक्क्याने २ लाख रुपये द्यायचे आहेत, असे सांगून दत्ता तांदळे यांनी मला मुंबईला जायचे म्हणून गाडीत बसवून नेले. अपहरण व मारहाण करून जवळील दोन लाख रुपये व मोबाइल काढून घेतल्याचे आणि लाख रुपये व मोबाइल काढून घेतल्याचे आणि पंकजा मुंडे यांना १० टक्क्याने २ लाख रुपये द्यायचे होते, असा उल्लेख करीत अपहरण केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांवर दिल्या. व्यवहारातून आपले अपहरण झाल्याचा बनाव करणाऱ्या...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
धनंजय मुंडेंच्या विरोधातील 'ते' वक्तव्य मनोज जरांगेंना भोवले; परळीत गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी परभणी येथे झालेल्या मूक मोर्चात मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध एकेरी भाषेचा उल्लेख करत दोन समाजात तेढ निर्माण होईल असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. "मुंड्या फिंड्या, हरामखोर अवलादी" अशा प्रकारचे असंवैधानिक व गैर असे शब्दप्रयोग संवैधानिक पदावरील व्यक्तीबाबत वापरले होते. त्यामुळे बदनामीकारक वक्तव्य व सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाच्या अनुषंगाने परळी पोलीस ठाण्यात मनोज जरांगे यांच्याविरुद्ध असंज्ञेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, परभणी येथे झालेल्या मूक मोर्चात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी भाषण करताना मंत्री धनंजय मुंडे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला होता. त्याचबरोबर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशाराही दिला होता. याच भाषणात बोलताना "मुंडया-फिंड्या हरामखोर अवलादी" असे शब्दप्रयोग केले होते. यावरून मुंडे समर्थकांमध्ये मोठा संत...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र मस्के यांना पत्नीशोक; सौ. नंदनी मस्के यांचे निधन परळी/प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते तथा मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र मस्के यांच्या पत्नी सौ.नंदनी मस्के यांचे दिनांक ४ जानेवारी रोजी वयाच्या ४७ व्या वर्षी नांदेड येथे उपचारादरम्यान निधन झाले. मागील काही दिवसापासून त्या आजारी होत्या. अतिशय मनमिळाऊ आणि सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या नंदनी मस्के यांच्या निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले,एक मुलगी, सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे.