बीड पोलिसांच्या विशेष पथकाने पुण्यातून उचलले
संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे पोलिसांच्या ताब्यात
बीड पोलिसांच्या विशेष पथकाने पुण्यातून उचलले
बीड : केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे याला पुण्यातून बीड पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली होती त्यानंतर 26 दिवस हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते अखेर त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोषी देशमुख यांची हत्या करणाऱ्या प्रमुख आरोपींपैकी सुदर्शन घुले सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे हे फरार होते यातील सुदर्शन घुले व सुधीर सांगळे याला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गेले 26 दिवस ते फरार होते.. त्यांच्या मागावर बीड पोलिसांचे पथक होते परंतु ते हाती येत नसल्याने पोलिसांवरील दबाव वाढतच होता यादरम्यान रात्री एका डॉक्टरची तीन ते चार तास कसून चौकशी करण्यात आली.. त्यानंतर या दोघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे थोड्याच वेळात त्यांना कोर्टात हजर केले जाणार असून त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील प्रक्रिया होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा