निष्काळजीपणामुळे बसस्थानकात बसचा धक्का बसून महिला जखमी
परळी वैजनाथ
येथील बसस्थानकात बस लावत असताना वाहकाने बस गतीने चालवल्यामुळे प्रवाशी महिलेला धक्का लागून ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला बोलावून डॉ अमोल चाटे यांनी महिलेला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
सध्या बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी आहे. बसमध्ये बसण्यासाठी,जागा पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ होत आहे. गुरुवारी (ता.०२) सायंकाळी सहाच्या सुमारास सावित्री बोंडगे व संजय बोंडगे पती पत्नी बीडला जाण्यासाठी बसस्थानकात बीडकडे जाणाऱ्या बससची वाट पाहत असताना परळी- लातूर ही बस सहाच्या सुमारास बसस्थानकात आली, बस स्थानकात लावत असताना वाहकाने प्रवाशांची गर्दी पाहता बसचा वेग कमी करणे आवश्यक असताना वाहकाने बस वेगाने आणली यावेळी सावित्री बोंडगे यांंना बसचा जोराचा धक्का लागुन बसचे चाक पायाला घासून गंभीर दुखापत झाली. याचवेळी पती संजय बोंडगे पत्नीला वाचवण्यासाठी जात असताना तेही जखमी झाले आहेत. येथील प्रवाशांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिनीला फोन करताच रुग्णवाहिनीतील डॉ अमोल चाटे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवून जखमींना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी सावित्री बोंडगे यांचे नातेवाईक उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले.जखमींना पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय आंबेजोगाई येथे पाठवण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा