पोस्ट्स

नोव्हेंबर २४, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आणखी एक खळबळजनक विनयभंगाचा प्रकार

इमेज
खळबळजनक: परळीत आणखी एक विनयभंगाचा प्रकार: नऊ वर्षे वयाच्या चिमुरडीशी अश्लील चाळे ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....                 परळी शहरात विनयभंगाच्या प्रकरणांचा सिलसिलाच सुरू झाला असून सध्या चर्चेत असलेल्या डॉक्टरने केलेल्या विनयभंगाच्या प्रकारानंतर आणखी एक खळबळजनक असा विनयभंगाचा प्रकार समोर आला आहे. आपल्या मुलीच्या, नातीच्या वयाच्या असलेल्या एका नऊ वर्षाच्या चिमुरडीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.               याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, परळीतील गंगासागरनगरमध्ये यातील आरोपीने फिर्यादीची ९ वर्षाची नातही आरोपीच्या घरी खेळण्याकरीता गेली असता हा विनयभंगाचा प्रकार केला आहे.आरोपी लखन घनघाव वय 35 वर्ष रा. गंगासागार नगर परळी याने घरी खेळण्यासाठी आलेल्या चिमुरडीला मांडीवर बसवून तिच्याशी अश्लील चाळे केले,विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले.याप्रकरणी पिडीतेच्या आजीने दिलेल...

एसटी बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत

इमेज
गोंदिया जिल्ह्यातील शिवशाही एसटी बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत  काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. 29 : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी जवळ शिवशाही एसटी बसच्या झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळामार्फत 10 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत, आवश्यकता वाटल्यास जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी दिली.   अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.  0000

एक तपापासूनचा उपक्रम

इमेज
  मोफत मधुमेह तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद सलग बारा वर्षांपासून मधुमेहतज्ञ डॉ.अतुल शिंदे यांचा उपक्रम अंबाजोगाई -: (वार्ताहर) समाजात वाढणारा मधुमेह रोखण्यासाठी विविधउपक्रम राबवत, मधुमेहींची मोफत तपासणी व उपचार करण्यासाठी सदैव अग्रेसर असणारे मधुमेह तज्ज्ञ डॉ अतुल शिंदे यांनी सोळाशे रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार केले.या उपक्रमाचे त्यांचे बारावे वर्ष आहे. गुरुवारी अंबाजोगाई येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी,आयएमए , ॲम्म्पा, व योगेश्वरी डायबेटीस केअर सेंटर, प्रशांतनगर,अंबाजोगाई यांच्या वतीने मधुमेहावरील महाशिबीर व मोफत तपासण्या व मोफत औषध उपचार  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.      या  शिबिराचे उद्घाटक म्हणून आयएमए चे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे,  तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गणपत व्यास हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आयएमए चे अंबाजोगाई अध्यक्ष डॉ. नवनाथ घुगे,डॉ.श्रीनिवास रेड्डी,डॉ.राजेश इंगोले,डॉ.सुलभा पाटील,रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी,संयोजक डॉ अतुल शिंदे,डॉ.स्वाती शिंदे य...

रोहित पवार म्हणाले," पंकजा मुंडे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून लोकांत चर्चा

इमेज
  राज्यातील मंत्रीमंडळात  महिलांची संख्या वाढवणार:  ' लाडक्या बहिणींना' मिळणार  प्राधान्य राज्यातील मंत्रीमंडळात देखील महिलांची संख्या वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना मंत्रीमंडळात देखील स्थान देण्यात येणार आहे.           राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता मुख्यमंत्री पद आणि मंत्रीपदाच्या चर्चांना वेग आला आहे. कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालेलं असलं तरी कोण होणार याबाबतचं उत्तर गुलदस्त्यात आहे. अनेक नावांची चर्चा आता होताना दिसत आहे. अशातच महिला मुख्यमंत्री होण्याच्याही चर्चा रंगताना दिसत आहेत. या महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार यावरून राजकारण रंगताना दिसत आहे. दिल्ली महायुतीच्या नेत्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली आहे.           तर राज्यातील मंत्रीमंडळात देखील महिलांची संख्या वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना मंत्रीमंड...
इमेज
सिरसाळा- बसचालक व महिला वाहकास मारहाण : गुन्हा दाखल  सिरसाळा, प्रतिनिधी...       गाडी आधीच भरलेली  आहे,बसण्याचा प्रयत्न करू नका, बाजूला सरका असे बस चालकाने म्हणताच सात ते आठ जणांनी मारहाण केल्याची घटना गावातील परळी-बीड मार्गावरील मुख्य चौकात बुधवारी (ता.२७) दुपारी बारा वा. दरम्यान घडली.     परळी आगाराची  जाणारी एमएच 20    बीएल २९२३या क्रमांकाची बस बीड कडे जात होती. या बसमध्ये आधीच ८०-८२ प्रवासी बसले होते.ही बस फुल झाल्याने बसचालक नागनाथ गित्ते,व महिला कंडक्टर रंजना कोळी यांनी  दुसऱ्या बसने या असेच सांगत असताना गर्दी जमली व बसचा दरवाजा लागत नसल्याने बस चालक खाली उतरून बाजूला सरका असे म्हणताच मुखीद शेख, आत्तार पठाण,पऱ्या अशपाक शेख, अनवर शेख व इतर आठ जणांनी बस चालक नागनाथ गीते व रंजना अभिमान कोळी यां दोघांना शिवीगाळ, धक्काबुक्की,करून बुक्क्याने मारहाण केल्याचे,शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी  फिर्याद सिरसाळा पोलिसात नोंद केली आहे. या घटनेनंतर बस चालक गित्ते यांना हार्टअटॅक आल्याचे सांगण्यात आले असून खाजगी दवाखान्...
इमेज
लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षे बलात्कार;गुन्हा दाखल  परळी (प्रतिनिधी)  परळी येथील २४ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवत चार वर्षे बलात्कार करत मारहाण केल्याप्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात लातुर येथील एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार परळी शहरातील एका २४ वर्षीय युवतीस तुझ्याशी लग्न करतो असे म्हणत स्वप्निल रमेश कांबळे वय २९ वर्षे रा.आवंतीनगर ५ नंबर लातुर याने परळी,अंबाजोगाई,लातुर अशा ठिकाणी २०२० पासून बलात्कार करत मारहाण केली.याप्रकरणी पिडीत युवतीच्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

अतिशय दुर्देवी व खळबळजनक घटना !

इमेज
परभणी जिल्हा हादरला : शिक्षकाने कुटुंबासह रेल्वेमार्गावर संपवले जीवन गंगाखेड :  गंगाखेड रेल्वे स्थानका जवळ असलेल्या धारखेड शिवारात रेल्वे पुलाजवळ शिक्षकाने आपल्‍या पत्‍नी व मुलीसह जीवन संपवल्‍याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मसनाजी सुभाष तुडमे (रा.किनी कद्दू तालुका अहमदपूर जिल्हा लातूर) सध्या मुक्काम गंगाखेड असे त्‍यांचे नाव आहे. ते सध्या शहरातील एका खाजगी विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. मसनाजी तुडमे त्‍यांची पत्नी व मुलगी या कुटुंबीयांतील तिघांनी रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या परभणी रेल्वे मार्गावर आत्‍महत्‍या केली. धारखेड शिवारातील रेल्वे पटरीवर ही घडल्‍याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान कुटुंबीयांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळतात उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक असेफ शेख जमादार दीपक वावळे व गंगाखेड पोलिसांनी घटनास्थळावर घेतली असून मृतदेह ताब्यात घेतले. मयत मसनाजी तुडमे यांच्या खिशात असलेला मोबाईल वरून नातेवाईकांना संपर्क करत सदर इसमाची ओळख पटवली सदर घटना दु...

परळी विधानसभा मतदारसंघात 11 पैकी 9 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त!

इमेज
वैध मताच्या एक षष्ठांश मते मिळवण्यात अपयशी: परळी विधानसभा मतदारसंघात 11 पैकी 9 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त! परळी वैजनाथ, प्रतिनिधी......             संपूर्ण राज्यात चर्चेचा ठरलेला परळी विधानसभा मतदारसंघ, हा मुंडे परिवाराचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.या बालेकिल्ल्यात मुंडेंना चोहोबाजूंनी घेरण्याचे शर्तीचे प्रयत्न केल्यानंतरही परळी विधानसभा मतदारसंघाचा बालेकिल्ला ऐतिहासिक विजयाने सर करण्यात धनंजय मुंडे यांनी यश मिळवले आहे. या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी मताधिक्य मिळविण्याचा इतिहास रचला आहे. त्यांनी 194889 एवढी मते घेतली तर तब्बल एक लाख 40 हजार 224 मतांचे मताधिक्य घेत विजयश्री खेचून आणली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना 54665 इतकी मते मिळाली.उर्वरित 11 पैकी 9 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.             भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 233 -परळी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मतमोजनीची प्रक्रिया होवुन निवडणूकीचा निकाल दि.23.11.2024 रोजी जाह...

राष्ट्रवादीकडून एक आणि भाजपकडून एक:बीड जिल्ह्य़ाला मिळणार दोन मंत्रीपदं

इमेज
  बीड जिल्ह्य़ाला दोन मंत्रीपदं: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री: पंकजा मुंडे मंत्रिमंडळात फिक्स ! भाजपच्या मुख्यमंत्री शपथविधीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर 2 तारखेला भाजप महायुतीचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. भाजप महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांना पत्ता कट होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ही दोन्ही पदं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहण्याची शक्यता आहे. महायुती भाजपाच्या मंत्रिमंडळात यंदा या नेत्यांना मंत्रिपदावरून पत्ता कट होण्याची शक्यता आहे.            विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. सत्ता स्थापनेसाठी आता राज्यात हालचालींना वेग आला आहे. आज मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच महायुतीमधील  तिन्ही पक्षांचे नेते आज दिल्लीत जाणार आहेत. दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. मुख्यमंत्रि‍पदाचे आज नाव जाहीर होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या माघारीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, आज सायंकाळपर्यंत अंतिम निर्...
इमेज
  ज्ञानेश्वरी ग्रंथ हा वारकरी सांप्रदायाचा प्राण आहे-ह.भ.प. ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे आळंदी (प्रतिनिधी)       ज्ञानेश्वरी ग्रंथ हा सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ  असून हा ग्रंथ वारकरी सांप्रदायाचा प्राण आहे,असे प्रतिपादन संतवाड्.मयाचे संशोधक ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केले.   वारकरी सांप्रदाय हा संस्कार देणारा सांप्रदाय असून महाराष्ट्रातील तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी वारकरी सांप्रदायाचा मोठा वाटा आहे असे खासदार श्री संजय जाधव (बंडु बाॅस )यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले.मी खासदार नंतर असून सर्वप्रथम वारकरी आहे.या सांप्रदायामुळेच मला जनता जनार्दनाची सेवा करण्याची प्रेरणा ,उर्जा मिळते असेही खासदार जाधव साहेब म्हणाले.        संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा उत्साहाचे निमित्ताने ह.भ.प.हरिहर महाराज घुले लिखित स्वानंदसुख निवासी वै.जोग महाराज प्रासादिक प्रवचनमाला भाग तिसऱ्या भागाचे प्रकाशन  पद्मावती मंगल कार्यालय आळंदी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.या प्रकाशन सोहळ्यास वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.श्री प्र...

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन साजरा

इमेज
  यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन साजरा परळी वैजनाथ...परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिना निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक संविधान प्रस्तावनेचे वाचन करत संविधान दिन साजरा करण्यात आला. 26 नोव्हेंबर हा दिवस देशात संविधान दिन म्हणुन साजरा केला जातो याच अनुषंगाने नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिना निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते करून सामूहिक संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले.           या वेळी यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.ए.ए.मुंडे मॅडम, प्रा.पी.पी.तिडके मॅडम,प्रा. एस.आर.कापसे, प्रा.यु.एन.फड, प्रा.ए.डी.शेख, प्रा.पी.पी.परळीकर, एस.बी. अष्टेकर,व्ही.एन.शिंदे , ए.बी.जगतकर ,जी. व्ही.कांबळे यु.बी.जगताप यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते.

परळी समाचार चा दिपावली अंक संग्रहणीय व वाचणीय-भास्करमामा चाटे

इमेज
  परळी समाचार च्या दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन  देव-देवतांची कथा मांडून दिपावली अंकाची परंपरा जोपासली-श्रीमती निर्मलाताई उत्तमराव विटेकर परळी समाचार चा दिपावली अंक संग्रहणीय व वाचणीय-भास्करमामा चाटे परळी-वैद्यनाथ (प्रतिनिधि) परळी वैजनाथ येथून गेल्या 33 वर्षापासून प्रकाशित होणार्‍या परळी समाचार च्या दीपावली अंकाचे प्रकाशन नुकतेच परळी येथील मुक्ताई लॉन्स मंगल कार्यालयाच्या सभागृहात प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्करमामा चाटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हरिश्चंद्र वंगे दादा तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सुरेशजी चौधरी, माजी नगराध्यक्ष बाजीरावभैया धर्माधिकारी, जेष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे हे उपस्थित होते. दिवाळी अंकाचे प्रकाशन हे नवनिर्वाचित सोनपेठ येथील आमदार राजेशभैय्या विटेकर यांच्या मातोश्री व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई उत्तमराव विटेकर यांच्या हस्ते  प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक संपादक आत्मलिंग शेटे यांनी केले. यावर्षी दीपावली अंकाच्या कव्हर पेजवर शेळगाव येथील महाविष्णूचे घेतले आहे. दिपावली अंकामध्ये महाविष्णुने मोहिन...

परळीत केलेल्या इनरव्हील क्लबच्या कार्याचा आढावा

इमेज
आढावा बैठक:परळीच्या इनरव्हील क्लबचे काम चांगले-डिस्ट्रिक चेअरमन डॉ. शोभना पालेकर  परळी-इंटरनॅशनल इनरव्हील क्लब डिस्ट्रिक  313 च्या चेअरमन डॉ शोभना पालेकर यांच्या उपस्थितीत येथील गणेशपार विभागातील सामाजिक कार्यकर्ते जीएस  सौंदळे यांच्या निवासस्थानी  इनरव्हील क्लब ऑफ परळी च्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी  परळीत केलेल्या इनरव्हील क्लबच्या कार्याचा आढावा घेतला व मार्गदर्शन केले.       डॉ शोभना पालेकर यांचे स्वागत नृत्य वरील मास्टर कु. मानवा खाडे यांनी स्वागत गीत गाऊन केले. यावेळी क्लबच्या सदस्यांनी यावर्षीच्या आपल्या कार्याचा अहवाल त्यांना सादर केला .यावेळी डॉ पालेकर यांचे क्लबच्या अध्यक्षा  श्रद्धा नरेश हालगे यांनी ट्रॉफी व शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .यावेळी रेणुका फुटके ,मानवाखाडे, जी एस सौंदळे यांचा डॉ पालेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इनरव्हील क्लब ऑफ परळीच्या कार्याचे डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ शोभना पालेकर यांनी कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लबचे अध्यक्षा  श्रद्धा हालगे,उपाध्यक्षा उर्मिला कांकरिया...

७५ व्या संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम

इमेज
  संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकांना अधिकार दिले - प्रा. अशोक मुंडे   संविधानिक मूल्यांचे संवर्धन  करावे - उप-मुख्यअभियंता महेश महाजन  परळी /प्रतिनिधी संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकांना मूलभूत अधिकार दिले असे प्रतिपादन प्रा.अशोक मुंडे  यांनी थर्मल कॉलनी येथील प्रेरणा सार्वजनिक वाचनालयाशेजारील सम्राट अशोक सभागृहामध्ये क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती आयोजित ७५ व्या संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी औष्णिक विद्युत केंद्राचे उप-मुख्यअभियंता महेश महाजन हे होते. विचार मंचावर प्रभारी उपमुख्य अभियंता एच. के. अवचार, सहायक कल्याण अधिकारी शरद राठोड, आणि उत्सव समितीचे कार्याध्यक्ष महेंद्र रोडे हे होते.   कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांना संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले. संविधानातील मौलिक अधिकार या विषयावर मार्गदर्शन करताना गेवराई येथील प्रा.अशोक मुंडे पुढे म्हणाले कि, भारतातील प्रत्येक नागरिकास मूलभूत अधिकार संविधाच्या माध्यमातून...

राजकीय वर्तुळात चर्चांना वेग...

इमेज
राजकीय ट्रेंड अन् जनमत: ऐन निवडणुकीत अजितदादांची साथ सोडणारांना जनतेची पसंती नाहीच ! मुंबई दि.२७ नोव्हेंबर - कोट्यावधी रुपयांचा निधी आणि विकासकामांना मंजुरी घेऊन ऐन निवडणुकीत अजितदादा पवार यांची साथ सोडणाऱ्या आमदारांना व माजी आमदारांना या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याचे चित्र महाराष्ट्रात पहायला मिळाले आहे.  बुलढाणा जिल्हा बँकेला कर्जातून बाहेर काढण्यासाठी अजितदादांसोबत राहिलो अशी कबुली देत नंतर तुतारी हातात घेणारे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांना मनोज कायंदे यांनी पराभूत केले, विधानपरिषदेवर तिसरी टर्म आमदार राहिलेले सतिश चव्हाण यांना भाजपच्या प्रशांत बंब यांनी पराभूत केले, रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक आमदार दिपक चव्हाण यांना सचिन पाटील यांनी पराभूत केले तर , माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांना पाथरीतून राजेश विटेकर यांनी दारुण पराभूत केले तर आमदार बबन शिंदे यांचा मुलगा रणजित शिंदे यांना भाजपच्या उमेदवाराने पराभूत केले, खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना काशिनाथ दाते यांनी पराभूत केले, तर मानसिंगराव नाईक यांना भाजपच्या उमेदवाराकडून पराभव पत...

शिबीराचा लाभ घेण्याचे डॉ.अतुल शिंदे यांचे आवाहन

इमेज
  अंबाजोगाईत २९नोव्हेबंर रोजी मधुमेहावरील महाशिबीर व मोफत रक्त तपासणी नागरिकांनी शिबीराचा लाभ घेण्याचे डॉ.अतुल शिंदे यांचे आवाहन ------ अंबाजोगाई -: (वार्ताहर )अंबाजोगाईत मधुमेहावरील महाशिबीर व मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन २९ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी ९.३० वाजता योगेश्वरी डायबेटीस केअर सेंटर, प्रशांत नगर, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ अतुल शिंदे यांनी दिली.                  येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी,आयएमए , ॲम्मपा व योगेश्वरी डायबेटीस केअर सेंटर, प्रशांत नगर, अंबाजोगाई यांच्या वतीने दर वर्षी जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून अंबानगरीतील नागरिकांसाठी जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेहावरील महाशिबीर व मोफत तपासण्या व मोफत औषध उपचार केले जातात. याही वर्षी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या शिबिराचा लाभ सर्व मधुमेही, रक्तदाब, थायरॉईड, हृदयविकार व ४० वर्षापासून पुढील व्यक्तींनी घ्यावा.असे आवाहन प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ अतुल शिंदे यांनी केले आहे. ----------- शिबीरातील म...

कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम

इमेज
  २६/११ हल्ल्यातील शहिदांना रक्तदानातून श्रद्धांजली कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम परळी | प्रतिनिधी मुंबई येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला तो आजचाच दिवस पण यात रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढून दहशतवाद्यांना यमसदनी पाठवणाऱ्या शूरवीरांना परळी येथिल १४ जणांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली.      कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते परळी व परिसरातील युवकांनी  रक्तदानाच्या या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला.      मंगळवार  दि.26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा.उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ येथे सदरील शिबीरास सुरुवात झाली. यावेळी रक्तदान करणाऱ्या तसेच रक्तपेढी व रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी या सर्वांचे कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले तर याकामी उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी डॉ. अरुण गुट्टे व त्यांच्या कर्मचारी वर्गाने सहकार्य केले. यांनी केले रक्तदान लक्ष्मण भास्कर, निलेश जाधव, व्यंकटी काळकोपरे, राकेश ज...
इमेज
  लाडकी बहीण योजनेच्या पुरस्कर्त्या, दूरदर्शी नेतृत्व पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे -अश्विन मोगरकर परळी वैजनाथ पंकजाताई मुंडे यांच्या सूचनेनुसार राज्य सरकारने लाडली बहना योजना महाराष्ट्रात लागू केल्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा सह महायुतीला भरघोस यश मिळाले आहे. पंकजाताई सारख्या दूरदर्शी नेतृत्वाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले पाहिजे अशी अपेक्षा भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे. भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे मध्यप्रदेश राज्यात प्रभारी असताना मध्यप्रदेशात लाडली बहना योजना चालवली जात होती. ही योजना महाराष्ट्रात चालवली तर याचा फायदा महाराष्ट्रातील करोडो महिलांना होईल यासाठी पंकजाताई मुंडे आग्रही होत्या. डिसेंबर 2023 मध्ये परळी येथे राज्य शासनाचा शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बोलताना पंकजाताई मुंडे यांनी मध्यप्रदेशात चालू असलेल्या लाडली बहना योजना महाराष्ट्रात लागू करावी अशी आग्रही मागणी केली. ही योजना चालू केली गेली तर आपल्याला जनतेच्या दारात जायची गरज पडणार नाही. मतदार आपल्याला आश...

२६/११ शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवारी परळीत रक्तदान शिबिर

इमेज
  २६/११ शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवारी परळीत रक्तदान शिबिर परळी | प्रतिनिधी २६/११ मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली म्हणून येथील कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानने रक्तदान शिबीर आयोजित केले असून या शिबिरात अधिकाधिक युवकांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवार  दि.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा.उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ येथे सदरील शिबीर होत असून या शिबिरातील रक्तसंकलनासाठी शासकीय रक्तपेढी अंबाजोगाई येथील पथक येणार आहे तरी शहर व परिसरातील रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान करून या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

जाणून घ्या - परळीच्या निवडणूकीची 'ही' आहेत खास सहा वैशिष्ट्ये

इमेज
  ' परळीचा लेक- नंबर एक' प्रत्यक्षात :धनंजय मुंडेंचा ऐतिहासिक विजय व निवडणूक-'ही' आहेत खास सहा वैशिष्ट्ये प रळी वैजनाथ, प्रतिनिधी....        " परळीचा लेक नंबर एक" हे टॅगलाईन निकालानंतर खरोखरच प्रत्यक्षात  उतरल्याचे दिसुन येत आहे. संपूर्ण राज्यात चर्चेचा ठरलेला परळी विधानसभा मतदारसंघ, हा मुंडे परिवाराचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.या बालेकिल्ल्यात मुंडेंना चोहोबाजूंनी घेरण्याचे शर्तीचे प्रयत्न केल्यानंतरही परळी विधानसभा मतदारसंघाचा बालेकिल्ला ऐतिहासिक विजयाने सर करण्यात धनंजय मुंडे यांनी यश मिळवले आहे. या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी मताधिक्य मिळविण्याचा इतिहास रचला आहे. त्यांनी 194889 एवढी मते घेतली तर तब्बल एक लाख 40 हजार 224 मतांचे मताधिक्य घेत विजयश्री खेचून आणलीआहे. धनंजय मुंडेंच्या ऐतिहासिक विजयाची विविधांगी अनेक वैशिष्ट्ये आहेत.        परळी मतदारसंघात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच राजेसाहेब देशमुख यांच्या उमेदवारीवरून विरोधाची नगण्य, थोडीफार असलेली मतदारसंघाची हवा बदलली. परळी मतदार संघाबाहेरचा रह...

साहस आदोडेंनी घेतली अडीच हजार उल्लेखनीय मते !

इमेज
परळी वैजनाथ विधानसभा निवडणुक : तिसऱ्या क्रमांकावर 'पिपाणी'; साहस आदोडे यांनी घेतली अडीच हजार उल्लेखनीय मते परळी वैजनाथ,प्रतिनिधी..         परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही खरोखरच एकतर्फी अशा प्रकारची निवडणूक झाली. या निवडणुकीत निर्विवादपणाने महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी एकहाती भक्कम विजय मिळवला. गेल्या लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघात पिपाणी निवडणूक चिन्ह असलेल्या उमेदवाराने मोठी हवा केली होती. लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल 50000 च्या वर मते पिपाणी या चिन्हाने घेतली होती. परळी विधानसभा निवडणुकीतही 'पिपाणी' हे चिन्ह अधोरेखित झाले असुन सर्वाधिक मते घेणाऱ्या एक व दोन क्रमांका नंतर पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराने तिसरा क्रमांक मिळवलेला आहे. वास्तविक पाहता खूप मोठ्या प्रमाणावर मते मिळाली नसली तरी अन्य उमेदवारांच्या तुलनेत साहस पंढरीनाथ आदोडे या उमेदवाराने उल्लेखनीय अडीच हजार मते घेतलेली दिसुन येत आहेत.      परळी विधानसभा मतदार संघामधून दोन पत्रकार उमेदवारांनी निवडणूक लढवली.  यामध्ये विकास इंडिया पार्टीकडून भागवत बबनराव वैद्य तर दै.सरकारच...

मोहा येथे सर्वाधिक नोटा चा वापर

इमेज
परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या उमेदवाराला आठ मतदान केंद्रावर भोपळा !  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      संपूर्ण महाराष्ट्रातील बहुचर्चित परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघ मुंडे परिवाराचा निर्विवाद बालेकिल्ला असल्याचे मतदानातील आकडेवारीवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 'मोठा चमत्कार करणार' असे शरद पवार यांच्या बाबतीत या मतदारसंघातील निवडणुकी संदर्भात म्हटले जायचे. मात्र शरद पवारांच्या पक्षाला परळी मतदारसंघातील मतदान केंद्रावर शून्य मते मिळाली आहेत. तर अनेक ठिकाणी या पक्षाच्या उमेदवाराला दोन आकडी मतेही मिळवता आलेली नाहीत.   धनंजय मुंडे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या राजेसाहेब देशमुख प्रचाराच्या सुरुवातीपासूनच पिछाडीवर पडले होते. निवडणूक यंत्रणा राबवण्यात आणि कार्यकर्त्यांचा संच सक्रिय करण्यात त्यांना शेवटपर्यंतही यश आले नाही. त्यामुळे निवडणूक प्रचार काळातच ही निवडणूक संपूर्णतः एकतर्फी होईल असे चित्र झाले. शेवटपर्यंतही शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना प्रचार व मतदारसंघातील जनसंपर्कात आपला प्रभाव निर्माण करता आला नाही.या सर्व परिस्थितीचा ...