मुस्लिम बांधवांशी संवाद साधत दिल्या शुभेच्छा
अंबाजोगाई येथील इस्तेमाच्या समारोप दुवा प्रसंगी धनंजय मुंडेंची उपस्थिती
मुस्लिम बांधवांशी संवाद साधत दिल्या शुभेच्छा
अंबाजोगाई (प्रतिनिधी) - अंबाजोगाई येथे मुस्लिम समाजाच्या इस्तेमाच्या समारोपाच्या दुवाप्रसंगी आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली.
यावेळी धनंजय मुंडे यांनी समारोपाच्या दुवाप्रसंगी उपस्थित मुस्लिम समाज बांधवांशी तसेच विविध धर्मगुरूंशी संवाद साधत इस्तेमाच्या समारोप प्रसंगाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व मुस्लिम समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे यांचे केले सांत्वन
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबाजोगाई चे तालुकाध्यक्ष राजेभाऊ औताडे यांच्या वडिलांचे नुकतेच दुःखद निधन झाले असून धनंजय मुंडे यांनी सेलू आंबा येथील राजाभाऊ अवताडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन औताडे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, ज्येष्ठ नेते दत्ता आबा पाटील, शिवाजीराव शिरसाट, विलास बापू मोरे, विलास काका सोनवणे, अजित गरड, रणजित लोमटे, तानाजी देशमुख, गणेश देशमुख, राजाभाऊ पौळ, प्रवीण जगताप, बंडू शिंदे, शरद शिंदे, रामलिंग चव्हाण, लिंब्राज धुमाळ, धर्मराज पाटील, विठ्ठल कोकरे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा