शिक्षण व क्रीडा या एका नाण्याच्या दोन बाजू-जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर


गेवराई, प्रतिनिधी....

     भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,गेवराई येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्था कार्यवाह डॉ.हेमंतजी वैद्य, रा.स्व.सं.पश्चिम क्षेत्र कार्य, सदस्य श्री हरीशजी कुलकर्णी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर तालुका क्रीडा अधिकारी श्री कालिदास होसूरकर  तालुका क्रीडा सहाय्यक श्री राठोड  माजी उपनगराध्यक्ष श्री राजेंद्रजी राक्षसभुवनकर भजन सम्राट ह.भ.प.तुळशीराम महाराज आतकरे स्था.नि.मं.अध्यक्ष प्रमोदजी कुलकर्णी उपाध्यक्ष राधेश्यामजी झंवर शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अक्षयजी कुलकर्णी अर्थ समिती अध्यक्ष नितीनजी डोळे प्राथमिक मुख्याध्यापक श्री प्रदीप जोशी माध्यमिक मुख्याध्यापक श्री अमोल गोरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

           प्रसंगी प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रदीप जोशी तर पद्य गायन श्री अमृत गोले यांनी केले उद्घाटन प्रसंगी भाषणात श्री अरविंद विद्यागर यांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रीडा या प्रकाराचे अनन्यसाधारण महत्व आहे असे प्रतिपादन केले व संपन्न होत असलेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या श्री तुळशीराम महाराज आतकरे यांनी अबिर गुलाल..या अभंगांने वातावरण मंत्रमुग्ध केले.

       विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात बाल वर्गापासून ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्वतःमधील सुप्त गुणांचे सादरीकरण केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची शालेय प्रवेशद्वार ते व्यासपीठा पर्यंतचा अश्र्वावरून केलेला प्रवेश कार्यक्रमाचे आकर्षण ठरले उद्घाटन सत्राचे सूत्रसंचलन श्रीम.सारिका रामदासी तर आभार श्रीम.संघनी वक्ते यांनी केले. विविध गुणदर्शन या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शालेय विद्यार्थी यशराज बर्गे,अमर आगलावे,अभिषेक दाभाडे,अपूर्वा दिक्षीत,पूजा जवंजाळ,अंजली होंडे तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्रीम.रेखा मोटे यांनी मानले.

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक विद्यासभा संयोजक श्री चंद्रकांत घोलप यांच्या नियोजनात अभ्यासपूरक मंडळ प्रमुख व विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना