पोलीसांनी नकाबंदी करत पकडला गुटखा; ८लाख ८९ हजारांचा मुद्देमालासह एकाची धरपकड परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... नविन पोलीस अधीक्षक रुजू झाल्यापासून पोलीस चांगलेच ॲक्शन मोडवर आले असल्याचेच दिसून येत आहे. काल दि.३० रोजी धर्मापुरी रस्त्यावर सिमेन्ट फॅक्ट्रीसमोर पोलीसांनी नाकाबंदी करत गुटखा व अन्य बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थ यांची अवैध वाहतूक होत असलेले वाहन पकडले आहे.या कारवाईत पोलीसांनी ८लाख 89 हजारांच्या मुद्देमालासह एकाची ग्रामीण पोलीसांकडून धरपकड करण्यात आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दि. 30/12/2024 रोजी 21.45 वा. परळी ते धर्मापुरी जाणारे रोडवर सिमेन्ट फॅक्ट्रीसमोर ईनोव्हा गाडी जिचा पार्सीग क्रमांक MH-24/P-9009 आहे. गाडीमध्ये ईसम लक्ष्मीकांत गोविंदलाल पल्लोड वय 29 वर्ष रा. पदमावतीगल्ली ता. परळी वै. हा आपले स्वताचे फायद्या करीता विनापरवाना बेकायदेशीररित्या महाराष्ट्र राज्यात नागरीकांच्या आरोग्याचे दृष्टीने बंदी घातलेली असतानाही रजणनीगंधा पान मसाला, गुटख्याचा माल व सुंगधी तबांखुचे पोते हे ईनोव्ह...
पोस्ट्स
डिसेंबर २९, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्राजक्ता माळीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट: स्री सन्मानाला बाधा आणणारांवर कठोर कारवाई करु- देवेंद्र फडणवीस अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिले. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्र्वस्त केले. त्यांच्याविरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली. त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पाणी वाटप संस्था बरखास्त करा- सतीश कुंडगीर यांची मागणी परळी वैजनाथ,प्रतिनिधी... कौडगाव घोडा शिवारातील कॅनल नंबर 22/ 23 वरील पाणी वाटप संस्था काहीही कामाची नसून ही पाणी वाटप संस्था बरखास्त करा अशी मागणी युवक नेते सतीश कुंडगीर यांनी केली आहे. सध्या माजलगाव पाटबंधारे विभागाच्या वतीने कॅनलला पाणी सोडण्यात आलेअसुन नवीन लागवड करण्यात आलेल्या तसेच जुन्या उसासाठी हे पाणी अत्यंत गरजेचे आह. मात्र कॅनाल वरील चाऱ्या आणि पाण्याच्या वाटा बुजलेल्या असल्याने पाणी उपलब्ध असुनही शेतकऱ्यांना कुचंबणा सहन करावी लागत आहे.त्यामुळे या ठिकाणी असलेल्या पाणीवाटप संस्था काहीही उपयोगाच्या नसून कौडगाव शिवारातील कॅनल नंबर 22/ 23 वरील पाणी वाटप संस्था बरखास्त करावी अशी मागणी सतीश कुंडगीर यांनी केली आहे. त्याचप्रमाणे या शिवारातील ऊसाला पाणी मिळावे यासाठी मेहनत करून जेसीबी ऑपरेटरने पाणी शेत शिवारात पोहोचवले याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने या ऑपरेटरचा सत्कारही करण्यात आला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
धर्मगुरू अमृतआश्रम स्वामी यांचा महासाधू गाणपत्य संत श्री मोरया गोसावी संस्थानकडून सत्कार महासाधू गाणपत्य संत श्री मोरया गोसावी यांच्या ४६३ व्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ धर्मगुरू अमृत आश्रम स्वामी (हरितस् गोत्री शाळीग्राम नवगण राजुरी) व श्री वरदराज श्रीकांत देव लिंबागणेशकर यांनी पुणे पिंपरी चिंचवड येथे जाऊन श्रद्धा पूर्वक श्री संत मोरया गोसावी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. याप्रसंगी मोरया गोसावी यांच्या वंशातील श्री मंदार देव महाराज, जितेंद्र देव व प्रकाश देव यांनी मनःपूर्वक स्वागत केले . व संस्थानाधिपती मंदार देव महाराज म्हणाले की आमच्याच हरितस् गोत्री शाळीग्राम कुळातील अनेक घर विस्तार पावलेले आहेत त्यापैकी नवगन राजुरी व लिंबागणेश हे दोन हल्ली जोशी म्हणविणारे गणपती भक्त आहेत. आमच्याच घराण्यातील एक दंडी संन्याशी गाणपत्य संप्रदायाचे आहेत. याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. आपण सदैव चिंचवड संस्थानाला दर्शनासाठी येत जावे व आपण जो ग्रंथ प्रकाशित करणार आहात त्यालाही माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भामेश्वर मंदिरात भागवत कथेस सुरुवात दररोज सकाळी 11 ते 4 कथेची वेळ अमोल जोशी /पाटोदा. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही पाटोदा शहरांमधील भामेश्वर मंदिर येथे आजपासून भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर यांच्या भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून शनिवार 4 जानेवारी रोजी समाप्ती आहे. वैकुंठवासी मीराबाई आईसाहेब महासांगवी यांनी गेल्या 44 वर्षांपूर्वी पाटोदा शहरांमध्ये नंदकिशोर महाराजांची भागवत कथा सुरुवात केली होती त्यावेळी पासून आजपर्यंत जवळपास 44 वर्ष पाटोदा शहरांमध्ये नंदकिशोर महाराजांचे मार्गशीर्ष महिन्यामध्ये भागवत कथेचे आयोजन केले जाते यंदा या भागवत कथेचे यजमानपद संजय अंकुश महाजन व संतोष अंकुश महाजन या महाजन कुटुंबीयांनी स्वीकारलेले असून आजपासून भामेश्वर मंदिर पाटोदा येथे दररोज सकाळी अकरा ते एक व 2 ते 4 या वेळेत भागवत कथा होणार आहे तरी पाटोदा शहरातील व परिसरातील भाविक भक्तांनी या भागवत कथा सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाजन परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.