प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली होती, तर त्यांना मदत करणाऱ्या आणखी एका आरोपीला देखील अटक करण्यात आली. दरम्यान या आरोपींना पोलिसांकडून केज न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टानं या घटनेतील तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोर्टात नेमकं काय घडलं?

कोर्टात युक्तिवाद करताना डीवायएसपी अनिल गुजर यांनी म्हटलं की, सुदर्शन घुले याने हत्येआधी अवादा कंपनीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन दमदाटी केली होती. त्यानंतर त्याला मारहाण झाली होती. संतोष देशमुख आणि मस्साजोग मधील लोकांनी त्याला मारहाण केली होती. त्यानंतर संतोष देशमुख यांना रस्त्यात अडवून एके दिवशी आरोपींनी जबरदस्त मारहाण केली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी यावेळी सीआयडीच्या एसआयटी टीमकडून कोर्टात करण्यात आली. हे टोळीने गुन्हे करणारे आरोपी आहेत. संघटित गुन्हे करून दहशत निर्माण करणे जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे करायला आलेल्या कंपन्यांना धमकावणे हा यांचा पेशा आहे. या आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चाताप नाही. संतोष देशमुख यांचा खून यांनी एंजॉय केला आहे. या आरोपीना आता आळा घालणे गरजेचे आहे, त्यामुळे तपासासाठी आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी असा युक्तीवाद कोर्टात करण्यात आला.

तर दुसरीकडे आरोपींच्या कोठडीसाठी एसआयटीकडे असलेलेले मुद्दे पुरेसे नाहीत. जवळपास या गुन्ह्यातल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. विष्णू चाटे यालाही आधीपासूनच अटक करण्यात आलेली आहे. डिजिटल एव्हिडन्स प्राप्त झाले असे पोलीस म्हणत आहेत. आरोपींना केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाही असे म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद यावेळी आरोपींच्या वकिलांनी केला. दरम्यान न्यायालयानं दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडली सुनावली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या