पोलीसांनी नकाबंदी करत पकडला गुटखा; ८लाख ८९ हजारांचा मुद्देमालासह एकाची धरपकड
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
नविन पोलीस अधीक्षक रुजू झाल्यापासून पोलीस चांगलेच ॲक्शन मोडवर आले असल्याचेच दिसून येत आहे. काल दि.३० रोजी धर्मापुरी रस्त्यावर सिमेन्ट फॅक्ट्रीसमोर पोलीसांनी नाकाबंदी करत गुटखा व अन्य बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थ यांची अवैध वाहतूक होत असलेले वाहन पकडले आहे.या कारवाईत पोलीसांनी ८लाख 89 हजारांच्या मुद्देमालासह एकाची ग्रामीण पोलीसांकडून धरपकड करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दि. 30/12/2024 रोजी 21.45 वा. परळी ते धर्मापुरी जाणारे रोडवर सिमेन्ट फॅक्ट्रीसमोर ईनोव्हा गाडी जिचा पार्सीग क्रमांक MH-24/P-9009 आहे. गाडीमध्ये ईसम लक्ष्मीकांत गोविंदलाल पल्लोड वय 29 वर्ष रा. पदमावतीगल्ली ता. परळी वै. हा आपले स्वताचे फायद्या करीता विनापरवाना बेकायदेशीररित्या महाराष्ट्र राज्यात नागरीकांच्या आरोग्याचे दृष्टीने बंदी घातलेली असतानाही रजणनीगंधा पान मसाला, गुटख्याचा माल व सुंगधी तबांखुचे पोते हे ईनोव्हा गाडी मध्ये विक्री करण्यासाठी जवळ बाळगतांना मुद्देमाल किमंती 8,89,400/- रुपयाचे मालासह मिळुन आला. म्हणुन आरोपी लक्ष्मीकांत गोविंदलाल पलोड वय 29 वर्ष रा. पदमावतीगल्ली ता. परळी वै. यांचे विरूध्द भारतीय न्याय संहीता कलम 123,274,275,223 म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि जाधव हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा