पोस्ट्स

नोव्हेंबर १७, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शरद सोळंके यांचे निधन

इमेज
शरद सोळंके यांचे निधन  नानासाहेब सोळंके यांना पुत्रशोक परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील न्यु हायस्कूल परळीचे शालेय समीतीचे अध्यक्ष नानासाहेब सोळंके यांचे जेष्ठ चिरंजीव शरद भैय्या सोळंके यांचे आज शनिवारी सायंकाळी दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 45 वर्षे होते. स्व. शरद सोळंके यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, एक मुलगा व मुलगी एक असा परिवार आहे. सोळंके परिवाराच्या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे. शरद सोळंके हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. आज शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी  सायंकाळी 6:15 वाजता निधन झाले. शरद सोळंके अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांचा फार मोठा मित्र वर्ग आहे.  आज अंत्यसंस्कार     स्व. शरद सोळंके यांच्या पार्थिवावर उद्या रविवार दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता परळी येथील स्मशानभूमीत होणार आहेत.      

लाडक्या बहिणीने केली जादू:आ.पंकजा मुंडेंच्या झंझावती नेतृत्वाचा विधानसभा निवडणुकीत करिश्मा !

इमेज
आ.पंकजा मुंडेंच्या झंझावती नेतृत्वाचा विधानसभा निवडणुकीत करिश्मा  सभा घेतलेल्या २७ उमेदवारांपैकी महायुतीचे २३ उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी  मुंबई  ।दिनांक २३। भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा स्टार प्रचारक आ. पंकजाताई मुंडे यांच्या धडाकेबाज नेतृत्वाचा करिश्मा विधानसभा निवडणुकीतही दिसून आला हे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले. त्यांनी प्रचार सभा घेतलेल्या    २७ उमेदवारां पैकी २३ उमेदवार प्रचंड मतांनी झाले तर चार उमेदवारांचा निसटता पराभव झाला. दरम्यान, सर्व विजयी उमेदवारांचे आ. पंकजाताईंनी अभिनंदन केले आहे.    विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारक असलेल्या आ. पंकजाताई मुंडे यांनी स्वतःच्या बीड जिल्हयात उमेदवारांसाठी दोन दोन सभा तर घेतल्याच पण त्याच बरोबर राज्यातही ठिक ठिकाणी जोरदार प्रचार करून भाजपा महायुतीच्या उमेदवारांना बळ दिले. केवळ भाजपच्याच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी देखील त्यांनी प्रचार सभा घेतल्या. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पंकजाताई मुंडे यांच्या खांद्यावर छोटीसी शस्त्रक्रिया झाली, तशा अवस्थेतही त्यांनी दुखणं सहन करत...

धनंजय मुंडेंनी रचला इतिहास !

इमेज
परळीत 'डीएम'च बाॅस: धनंजय मुंडेंनी रचला इतिहास: एक लाख 40 हजाराचे मताधिक्य घेत सर केला परळीचा बालेकिल्ला ! परळी वैजनाथ,...           संपूर्ण राज्यात चर्चेचा ठरलेला परळी विधानसभा मतदारसंघ, हा मुंडे परिवाराचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.या बालेकिल्ल्यात मुंडेंना चोहोबाजूंनी घेरण्याचे शर्तीचे प्रयत्न केल्यानंतरही परळी विधानसभा मतदारसंघाचा बालेकिल्ला ऐतिहासिक विजयाने सर करण्यात धनंजय मुंडे यांनी यश मिळवले आहे. या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी मताधिक्य मिळविण्याचा इतिहास रचला आहे. त्यांनी 194889 एवढी मते घेतली तर तब्बल एक लाख 40 हजार 224 मतांचे मताधिक्य घेत विजयश्री खेचून आणली आहे.              दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळी वैजनाथ मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने या ठिकाणी मराठा कार्ड खेळत राजेसाहेब देशमुख यांना निवडणूक रिंगणात उतरविण्या...

२५ तारखेला होणार मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी ?

इमेज
  २५ तारखेला होणार मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी ?           राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी  बुधवारी मतदान पार पडले. आज शनिवारी २३ तारखेला निकाल जाहीर होत आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एक हाती सरकार  येणार आहे. येणाऱ्या २५ नोव्हेंबरला  मुख्यमंत्री पदाचा  शपथविधी होणार असल्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. सध्या हाती आलेल्या कलानुसार महायुती २१६ जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून आता भाजपकडून सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विधानसभेच्या निकालामुळे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे निकालानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदावर येण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात करत आपला दबदबा कायम ठ...

Kingmaker: देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब, पुन्हा मुख्यमंत्रीपदावर येणार?

इमेज
  Kingmaker: देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब, पुन्हा मुख्यमंत्रीपदावर येणार? यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. सध्या हाती आलेल्या कलानुसार महायुती २१६ जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून आता भाजपकडून सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विधानसभेच्या निकालामुळे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे निकालानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदावर येण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात करत आपला दबदबा कायम ठेवला आहे. महाराष्ट्राचे चाणाक्य म्हणजेच शरद पवार आहेत. भाजपचा आतापर्यंतचा स्ट्राईक रेट पाहिला तर ८४ टक्के असा आहे. तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वात भाजपला सलग तिसऱ्यांचा बहुमत मिळाले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात २०१४, २०१९ आणि यंदा २०२४ ला भाजपला रेकॉर्डब्रेक जागा मिळाल्या आहेत. इतकंच नाहीत उद्धव ठ...

जाणून घ्या>>>> परळी मतदारसंघ-मतमोजणी : एकूण 26 फेऱ्या: कोणत्या फेरीत कोणती गावे ?

इमेज
जाणून घ्या >>>> परळी मतदारसंघ-मतमोजणी : एकूण 26 फेऱ्या: कोणत्या फेरीत कोणती गावे ? 1.पहिली फेरी:   डिग्रस , पोहनेर, तेलसमुख, कासरवाडी, जळगव्हाण,हिवरा गो., जयगाव  गोवर्धन हि., गोवर्धन हि.तांडा. 2. दुसरी फेरी: पिंपरी बुद्रुक, बोरखेड, ममदापूर, कवडगाव हुडा, आचार्य टाकळी, हसनाबाद, पाडोळी, औरंगपूर, तपोवन 3.  तिसरी फेरी: सिरसाळा, कवडगाव  घोडा, कवडगाव साबळा, कानडी, पिंपळगाव गाढे. 4.चौथी फेरी: पिंपळगाव गाढे, नाथरा, रेवली, वाका, सेलू, सबदराबाद  इंजेगाव, टाकळी देशमुख  वडखेल, परचुंडी. 5. पाचवी फेरी: मलनाथपुर, भिलेगाव, वाघाळा, तडोळी, पांगरी, पांगरी कॅम्प, लिंबोटा, लिंबोटा तांडा, कौठळी, कौठळी तांडा, सेलू. 6.सहावी फेरी: लोणी, दगडवाडी, वडगाव दादाहरी, दाऊदपूर, लोणारवाडी, बेलंबा, वाघबेट, संगम, टोकवाडी. 7.सातवी फेरी: टोकवाडी, तळेगाव, बहादुरवाडी, नागापूर, माळहिवरा, गोपाळपूर, कावळ्याची वाडी, मोहा. 8. आठवी फेरी: करेवाडी, वंजारवाडी, सरफराजपुर, गर्देवाडी, बोधेगाव, सोनहिवरा, नागपिंपरी, मांडेखेल, अस्वलंबा, वानटाकळी, वानटाकळी तांडा,  9.नववी फेरी: दौनापूर, डाबी, ...

मुख्य अभियंता सुनिल इंगळे यांच्या हस्ते कौतुक

इमेज
  परळी वीज निर्मिती केंद्राचा देश पातळीवर डंका ! अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत सुनिल पवार यांनी मिळविले कांस्यपदक  मुख्य अभियंता सुनिल इंगळे यांच्या हस्ते कौतुक  परळी  /प्रतिनिधी      परळी वीज निर्मिती केंद्राचा देश पातळीवर डंका वाजत असून गुजरात येथील वडोदरा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या विद्युत कंपन्यांच्या अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत महाजनकोचे प्रतिनिधित्व करताना परळी  औष्णिक विद्युत केंद्राचे सुनील पवार यांनी कास्यपदक पटकावले आहे.   ‌. गुजरात येथील वडोदरा येथे नुकत्याच अखिल भारतीय विद्युत कंपनीच्या बॅडमिंटन स्पर्धेत महाजनकोचे प्रतिनिधित्व करताना परळी औष्णिक विद्युत केंद्राने देशभरातून तिसरा क्रमांक मिळवून कांस्यपदक पटकावले. यापूर्वी 2000-  2001 मध्ये रजत पदक पटकावले होते. त्यानंतर 23 वर्षांनी कास्यपदक मिळाले आहे.  ‌.  याबरोबरच बुद्धिबळ स्पर्धेत राघव देशपांडे यांनी रजत पद्धत पटकावले तसेच  शमिमा  शेख यांनीही बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग नोंदविला. सुनील पवार यांनी आतापर्यंत क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन या तिन्ही खेळात...

तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने आयोजन

इमेज
  तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने 23 फेब्रुवारी रोजी बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन -बालासाहेब जगतकर             परळी प्रतिनिधी:-- तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र परळीच्या वतीने २३फेब्रुवारी २०२५ रोजी बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख  साप्ताहिक मानपत्र चे संपादक तथा तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे.   परळी शहर व तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांना कळविण्यात येते की तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र परळीच्या वतीने दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी रविवारी दुपारी ठीक दीड वाजता परळी शहरातील नटराज रंगमंदिर येथे बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्ध समाजातील लोकांचा अनाठायी खर्च होणे व त्यासाठी कर्जबाजारी होणे व त्यामुळे आर्थिक समस्येच्या खाईत लोटले जाणे हे प्रकार टाळण्यासाठी व समाजातील ज्यांची आर्थ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत १८ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू तर दुसरा जखमी

इमेज
अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू तर दुसरा जखमी केज :- केज तालुक्यातील मस्साजोग येथे अज्ञात वाहनाने मोटार सायकलला दिलेल्या धडकेत एका अठरा वर्षाच्या युवकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्या सोबत असलेला दुसरा युवक जखमी झाला आहे. दिनांक २१ नोव्हेंबर रोजी रात्री ९:०० च्या सुमारास केज तालुक्यात मस्साजोग येथील तरुण बालाजी मनोहर केदार वय १८ वर्ष आणि त्याचा साथीदार उमेश केंद्रे (१८ वर्ष) हे केजहून त्यांच्या सारणी (सांगवी) या गावाकडे जात असताना मस्साजोग येथील हॉटेल  संघर्ष समोर त्यांच्या मोटार सायकलीला एका भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिली. यात बालाजी केदार याचा जागीच मृत्यू झाला . आहे तर त्याच्या पाठीमागे बसलेला उमेश केंद्रे हा जखमी झाला आहे. अपघातात नंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह फरार झाला आहे.  अपघाताची माहिती मिळताच बिट जमादार दत्तात्रय बिक्कड हे अपघातस्थळी दाखल झाले.

जिल्ह्यात परळीत सर्वाधिक तर बीड मतदारसंघात सर्वात कमी मतदान!

इमेज
अचूक अन् अधिकृत आकडेवारी आली : जिल्ह्यात सर्वाधिक परळी मतदारसंघात 75.27 टक्के मतदान  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात आज प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत परळी मतदार संघात विक्रमी मतदान झाले असुन एकूण  75.27 टक्के इतके मतदान झाले आहे. निवडणूक विभागाकडून अचुक अन् अधिकृत आकडेवारी आली असुन जिल्ह्यात सर्वाधिक परळी मतदारसंघात 75.27 टक्के मतदान झाले आहे.      परळी विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या प्रक्रियेत  दि. 20 रोजी सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदारांनी घराबाहेर पडून उस्फूर्तपणाने मतदान केले. संपूर्ण दिवसभर मतदानाची गती चांगली असल्याचेच दिसून आले. मतदार संघातील व परळी शहरातील सर्वच मतदान केंद्रे मतदारांनी गजबजुन गेल्याचे दिसून आले. दुपारी 3 वाजेपर्यंतच्या निवडणूक विभागाच्या अहवालानुसार सरासरी 50 टक्के मतदान पार पडले होते.          मतदान करण्याची वेळ संपल्यानंतर मतदानाची टक्केवारी ही 75.27 ...

जगद्‌गुरू शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती येणार !

इमेज
श्रीक्षेत्र दत्तधाम सारडगाव येथे श्री.दत्तात्रय भगवान (त्रिमुखी) प्राणप्रतिष्ठा सोहळा, दत्तयाग व चार दिवसीय कीर्तन महोत्सव  सोहळ्याला बद्रिनाथहून जगद्‌गुरू शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यासह संत महंत राहणार उपस्थित परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....          बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या पावन पंचक्रोशीत निर्माण होत असलेल्या श्री क्षेत्र दत्तधाम (अध्यात्मिक उन्नती केंद्र), गोपाळपुरा, सारडगांव, परळी-धर्मापुरी रोड, परळी वैजनाथ, जि. बीड येथे श्री.दत्तात्रय भगवान (त्रिमुखी) प्राणप्रतिष्ठा सोहळा, दत्तयाग व चार दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या भव्य दिव्य सोहळ्याला बद्रिनाथहून जगद्‌गुरू शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यासह संत महंत  उपस्थित राहणार आहेत.       ह.भ.प. विद्यावाचस्पती डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज (निर्माणकर्ते श्री. दत्तधाम, अध्यामिक उन्नती केंद्र) यांनी या सोहळ्याबाबत सविस्तर माहिती दिली.मार्गशीर्ष प्रतिपदा, सोमबार दि. २ डिसेंबर २०२४ ते मार्गशीर्ष शुक्ल...

परळी वैजनाथ:कशी असणार मतमोजणी प्रक्रिया ?

इमेज
विधानसभा निवडणूक निकाल: परळीत कशी असणार मतमोजणी प्रक्रिया ?| प्रशासनाने काय केले नियोजन?  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...              संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या परळी विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार असून याची आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दि. 23 रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेच्या संबंधाने निवडणूक विभागाने नियोजन लावलेले असून परळीत मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. जाणून घेऊया - परळीत कशी असणार मतमोजणी प्रक्रिया ? आणि प्रशासनाने काय केले आहे नियोजन?             २३३- परळी विधानसभा मतदार संघातील मतदान  प्रक्रिया दिनांक २०/११/२०२४ रोजी पूर्ण झाली असुन या निवडणूकीची मतमोजणी दि. २३/११/२०२४ सकाळी ०८:०० वाजल्या पासुन होणार आहे.नवीन क्लब बिल्डींग थर्मल वसाहत परळी येथे  मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी एकुण १४ टेबल असुन प्रत्येक मतमोजणी टेबलवर ०४ अधिकारी/कर्मचारी या प्रमाणे ५...

परळी रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होईल- पंकजाताई

इमेज
  राज्यात भाजपा महायुतीचं सरकार बहुमताने येणार - आ. पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला विश्वास परळी रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होईल परळी वैजनाथ।दिनांक २०। राज्यभरात मी अनेक ठिकाणी प्रचार सभा घेतल्या, त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. महायुतीच्या सरकारने राबवलेल्या योजनांमुळे लोकांचा विश्वास वाढलाय, त्यामुळे राज्यात भाजपा महायुतीचे सरकार बहुमतांनी येईल असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा स्टार प्रचारक आ. पंकजाताई मुंडे यांनी आज येथे माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला. आमची परळीची जागा रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येईल असेही त्या म्हणाल्या.    नाथरा येथे मतदानाला जाण्यापूर्वी आ. पंकजाताई मुंडे यांनी निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. गेल्या तीन तारखेपासून मी प्रचारात आहे. राज्यात वेगवेगळ्या क्षेत्रात सभा घेतल्या, सर्व ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. महायुती बाबत जनता सकारात्मक आहे. सरकारने जनतेच्या हितासाठी ज्या काही योजना राबवल्या आहेत, त्या यशस्वी ठरल्या आहेत, लोकांचा महायुतीबद्दल विश्वास वाढला आहे त्यामुळे आमचं सरकार बहुमतांनी पुन्हा सत्तेवर य...

मतदानाचा वाढलेला टक्का कोणत्या उमेदवाराच्या फायद्याचा?

इमेज
परळी विधानसभा मतदारसंघात विक्रमी मतदान: सरासरी एकूण 72 टक्के झालं मतदान  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात आज प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत परळी मतदार संघात विक्रमी मतदान झाले असुन एकूण सरासरी 72 टक्के इतके मतदान झाले आहे.      परळी विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या प्रक्रियेत आज दि. 20 रोजी सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदारांनी घराबाहेर पडून उस्फूर्तपणाने मतदान केले. संपूर्ण दिवसभर मतदानाची गती चांगली असल्याचेच दिसून आले. मतदार संघातील व परळी शहरातील सर्वच मतदान केंद्रे मतदारांनी गजबजुन गेल्याचे दिसून आले. दुपारी 3 वाजेपर्यंतच्या निवडणूक विभागाच्या अहवालानुसार सरासरी 50 टक्के मतदान पार पडले होते. दुपारनंतरही हाच ट्रेण्ड सुरू राहिला. मतदान करण्याची वेळ संपल्यानंतर मतदानाची टक्केवारी ही 72 टक्के इतकी झाली. निवडणूक विभाग अंतिम आकडेवारी अचूक करून अधिकृत टक्केवारी जाहीर करणार असल्याने या टक्केवारीत थोडाफार अंशत: हा बदल होऊ शकत...

परळीला गुंडगिरीच्या नावाने बदनाम करणारेच निघाले मोठे गुंड, निवडणूक आयोगात तक्रार - धनंजय मुंडे

इमेज
शरद पवार गटाच्या उमेदवाराची परळी मतदारसंघात गुंडशाही, तरीही विजय आमचाच - धनंजय मुंडे अनेक ठिकाणी बूथ ताब्यात घेण्याचे प्रयत्न; मतदान केंद्रांवर तसेच नेते व कार्यकर्त्यांवर हल्ले परळीला गुंडगिरीच्या नावाने बदनाम करणारेच निघाले मोठे गुंड, निवडणूक आयोगात तक्रार - धनंजय मुंडे परळी वैद्यनाथ (दि. 20) - परळी विधानसभेची निवडणूक लागल्यापासून परळी गुंडशाही व दादागिरीचे राजकारण चालते असे म्हणून परळीच्या लोकांची बदनामी करणारे शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हेच स्वतः आज मतदानाच्या दिवशी गुंडशाही माजवताना दिसून आल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यांच्या गुंडशाहीस जनतेने थारा दिला नसून, विजय आमचाच होईल, असा विश्वासही मुंडेंनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील सहा पैकी किमान 5 जागा महायुती जिंकेल असा दावाही मुंडेंनी केला आहे. मतदारसंघातील घाटनांदुर, जवळगाव, मुरंबी, धायगुडा पिंपळा, सायगाव यांसह अनेक गावात बूथ ताब्यात घेण्याचे प्रयत्न राजेसाहेब देशमुख व त्यांच्या समर्थकांनी तसेच बाहेरून आणलेल्या गुंडांनी केले असून ज्या ठिकाणी बूथ ताब्यात घेता आले नाही त्या ठिकाणी धनंजय मुंडे...

बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू

इमेज
  बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू  बीड : बीड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवणाऱ्या एका अपक्ष उमेदवाराच्या मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नेमकी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच घडले आहे या घटनेने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केले जात आहे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यांनी  बीड विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. बीड मतदारसंघातून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत होते आणि आज मतदान होत असताना मतदान केंद्र बाहेर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य: कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर तरीही परळीतील प्रयाग कुटुंबाने बजावला मतदानाचा हक्क !

इमेज
  राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य: कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर तरीही परळीतील प्रयाग कुटुंबाने बजावला मतदानाचा हक्क ! परळी वैजनाथ ,प्रतिनिधी...          विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू आहे. खऱ्या अर्थाने हा लोकशाहीचा उत्सव आहे. सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक असून हे आपले कर्तव्य असल्याची भावना नागरिकांमध्ये असल्याची उदाहरणे दिसून येतात. असेच उदाहरण परळी येथे घडले असून घरातील आजीचे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही परळीतील प्रयाग कुटुंबियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.      परळी वैजनाथ येथील मोंढा भागातील सर्वपरिचित प्रयाग इलेक्ट्रिकल्स चे संचालक हरीश व गिरीश प्रयाग यांच्या आजी कावेरीबाई रंगनाथराव प्रयाग यांचे दि.१९ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. कावेरीबाई रंगनाथराव प्रयाग या अतिशय कुटुंबवत्सल, धार्मिक, मनमिळावू व प्रयाग कुटुंबाच्या आधारवड म्हणून परिचित होत्या. वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडं,पतवंडं असा परिवार...

घाटनांदुर येथे गोंधळानंतर मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू जिल्हाधिकारी यांनी दिली माहिती

इमेज
  परळी मतदारसंघात आत्तापर्यंत 52.41 टक्के मतदान  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... परळी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक विभागाचे अधिकृत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 52.41% इतके मतदान झाले आहे मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत सुरू असून घाटनांदुर येथे झालेल्या गोंधळानंतर थांबवण्यात आलेले मतदान पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिली आहे         विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आज सकाळपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी तीन वाजेपर्यंत  परळी मतदारसंघात 52.41 टक्के मतदान झाले आहे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात सकाळपासून अतिशय शांततेने मतदानाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे त्याचप्रमाणे सकाळच्या टप्प्यामध्ये मोठ्या संख्येने मतदारांनी प्रतिसाद देत रांगेत उभे राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे दुपारी एक वाजेपर्यंत चा निवडणूक विभागाच्या अधिकृत अहवाल निवडणूक विभागाला सादर करण्यात आला असून दुपारी एक पर्यंत परळी मतदारसंघात 36.23% इतके मतदान झाले होते. आ...

परळी मतदारसंघात आत्तापर्यंत 40 टक्के मतदान

इमेज
परळी मतदारसंघात आत्तापर्यंत 40 टक्के मतदान  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आज सकाळपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी तीन वाजेपर्यंत परळी मतदारसंघात अंदाजे 40 टक्के मतदान झाले आहे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात सकाळपासून अतिशय शांततेने मतदानाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे त्याचप्रमाणे सकाळच्या टप्प्यामध्ये मोठ्या संख्येने मतदारांनी प्रतिसाद देत रांगेत उभे राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे दुपारी एक वाजेपर्यंत चा निवडणूक विभागाच्या अधिकृत अहवाल निवडणूक विभागाला सादर करण्यात आला असून दुपारी एक पर्यंत परळी मतदारसंघात 36.23% इतके मतदान झाले होते आत्ता तीन वाजेपर्यंत परळी विधानसभा मतदारसंघाची मतदानाची गती पाहता हे मतदाना अंदाजे 40% झाले आहे एकंदरीतच मतदानाच्या प्रक्रियेत मतदारांची चांगली गती दिसून येत आहे

धनंजय मुंडे यांनी संपूर्ण मुंडे कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

इमेज
धनंजय मुंडे यांनी संपूर्ण मुंडे कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क           आज दुपारी 1 च्या सुमारास परळी विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे यांनी संपूर्ण मुंडे कुटुंबासह आपले जन्मगाव नाथ्रा येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी आ.पंकजाताई मुंडे यांच्यासह धनंजय मुंडे यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई मुंडे, काकी प्रज्ञाताई मुंडे, माजी खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे, ऍड.यशश्रीताई मुंडे, युवक नेते अजय मुंडे, रामेश्वर मुंडे, नाथ्रा गावचे सरपंच अभय मुंडे, डॉ. संतोष मुंडे, बी-बियाणे राज्य समितीचे सदस्य अतुल मुंडे, सुरेश मुंडे, सचिन मुंडे, रामेश्वर तात्या मुंडे यांसह मुंडे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांनी परळीसह बीड जिल्ह्यातील जनतेला मतांचा टक्का वाढवण्याचे आवाहन केले.

परळीतील मतदान केंद्रांना भेटी देऊन घेतला मतदानाचा आढावा

इमेज
आ.पंकजा मुंडे, डॉ.प्रीतम मुंडे व कुटुंबियांनी नाथ्रा येथे बजावला मतदानाचा हक्क परळीतील मतदान केंद्रांना भेटी देऊन घेतला मतदानाचा आढावा परळी ।दिनांक २०। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ पंकजाताई मुंडे, माजी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे व कुटुंबियांनी आज नाथरा येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर आ. पंकजाताई मुंडे यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदानाचा आढावा घेतला.    आ. पंकजाताई मुंडे, त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, भगिनी माजी खा. डॉ. प्रितमताई मुंडे, यशःश्रीताई मुंडे यांनी दुपारी १२.१५ वा. नाथरा या त्यांच्या गावी  जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. सकाळपासूनच वातावरणात उष्णता जाणवत होती तरीही  मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करताना दिसत होते. जागोजागी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.      मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या, या भागातील जनता नेहमीच विकासाच्या बाजूने राहिली आहे, जातीपातीला त्यांनी कधीच थारा दिला नाही. परळीची जागा आम्ही सहज जिंकू असं त्या म्हणाल्या.मतदानानंतर  आ....

परळीत मतदानकेंद्रावर अधिकाऱ्याला आलं टेन्शन :हृदयविकाराचा सौम्य धक्का

इमेज
  परळीत मतदानकेंद्रावर अधिकाऱ्याला आलं टेन्शन :हृदयविकाराचा सौम्य धक्का परळी वैजनाथ, प्रतिनिधी..         विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र या निवडणूक प्रक्रियेतील प्रक्रिया व अन्य सर्व बाबींचा मानसिक ताण एका मतदान केंद्र अधिकाऱ्याला आल्याने या टेन्शनमध्ये त्यांना अस्वस्थ वाटू लागले. तातडीने प्रशासनाने उपचारासाठी त्यांना परळीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार  करून त्यांना त्यांच्या घरी  बीड पाठवण्यात आले आहे.        परळी विधानसभा मतदार संघासाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर या मतदान प्रक्रियेचा मानसिक ताण सहन न झाल्याने एका मतदान अधिकाऱ्याला अस्वस्थ वाटू लागले. परळी वैजनाथ येथील सरस्वती विद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम करणारे जालिंदर जाधव यांना अस्वस्थ वाटल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही माहिती कळताच परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे नायब तहसिलदार बाबुराव रुपनर य...

लोकशाहीने दिलेला आपला मतदानाचा हक्क बजवा: राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा - ॲड.जीवनराव देशमुख

इमेज
  लोकशाहीने दिलेला आपला मतदानाचा हक्क बजवा: राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा -ॲड.जीवनराव देशमुख परळी वैजनाथ/प्रतिनिधी...        लोकशाहीने दिलेला आपला मतदानाचा हक्क जरुर बजवा परळी विधानसभा मतदारसंघात राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा  असे आवाहन रा.काॅ.शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड.जीवनराव देशमुख यांनी केले आहे.           233- परळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना प्रचारात सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.यावेळी मतदार संघातील प्रश्न केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष सोडवणारा लोकप्रतिनिधी म्हणून राजेसाहेब देशमुख यांना निवडून देण्याचा निर्धार जनतेने केलेला आहे. शेती,शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार यांच्यासाठी काम करणारा जबाबदार लोकप्रतिनिधी निवडला जाणे गरजेचे आहे. त्यासाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी राजेसाहेब देशमुख यांना  प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन रा.काॅ. शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड.जीवनराव देशमुख यांनी केले आहे.

दुःखद वार्ता: कावेरीबाई प्रयाग यांचे निधन

इमेज
  दुःखद वार्ता: कावेरीबाई प्रयाग यांचे निधन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         येथील प्रयाग इलेक्ट्रिकल्स चे संचालक हरीश व गिरीश प्रयाग यांच्या आजी कावेरीबाई रंगनाथराव प्रयाग यांचे आज दि.१९ रोजी दुपारी चार वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.       कावेरीबाई रंगनाथराव प्रयाग या अतिशय कुटुंबवत्सल, धार्मिक, मनमिळावू व प्रयाग कुटुंबाच्या आधारवड म्हणून परिचित होत्या. वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडं,पतवंडं असा परिवार आहे. सुधीर रंगनाथराव प्रयाग यांच्या त्या आई होत तर हरीश, गिरीश शिवाजीराव प्रयाग यांच्या त्या आजी होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज दि. २० रोजी परळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी नऊ वाजता राहते घर, विद्यानगर येथील अंत्ययात्रा निघणार आहे.

भाजपा महायुतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी बळ द्या

इमेज
  प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आ.पंकजाताई मुंडे यांच्या कडा, घनसावंगीत जोरदार सभा भाजपा महायुतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी बळ द्या बीड / जालना ।दिनांक १८। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपण्याच्या  आजच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा स्टार प्रचारक आ. पंकजाताई मुंडे यांच्या कडा (बीड) आणि  घनसावंगी (जालना) येथे जंगी सभा झाल्या. महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपा महायुतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी बळ द्या, आमच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं.    आष्टी पाटोदा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ कडा येथे तर जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे उमेदवार हिकमत उढाण यांच्या प्रचारार्थ आ. पंकजाताई मुंडे यांच्या आज जंगी सभा झाल्या. या दोन्ही सभांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.   आष्टी मतदार संघाचे मुंडे साहेबांपासून ते माझ्यापर्यंत प्रचंड प्रेम आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही या मतदार संघाने मला मोठे मताधिक्य दिले. या मतदारसंघात विकासाची गंगा आणण्याचा सातत्याने मी प्रयत्न केलेला आहे. म...

बारामतीत अजितदादांची सांगता सभा

इमेज
Ajitdada Pawar: 'मेरे पास माँ है...'; बारामतीत अजितदादांची अतिविराट सांगता सभा, आईची मुलासाठी भावनिक चिठ्ठी बारामती : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी बारामतीमध्ये भावनिक होत भाषण केलं आहे. अजित पवारांच्या सभेला त्यांच्या आई आशाताई पवारही उपस्थित होत्या. या सभेत बोलताना अजित पवारांनी आई माझ्यासोबत आहे, माझ्या बहिणी माझ्यासोबत आहेत. जय आणि पार्थ माझ्या पोटची लेकरं आहेत. त्यांना तर फिरावं लागतंय. बायको पराभूत झाली तरी तिला राज्यसभेचं खासदार केलं, तिचाही सन्मान राखला, असं अजित पवार म्हणाले. बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होत आहे. अजित पवार यांच्याविरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार रिंगणात उतरले आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे पूत्र आहेत. ● अजितदादांसाठी आईचा भावनिक संदेश ‘एक आई म्हणून मी अजितच भाषण ऐकण्यासाठी आली आहे. एक आई म्हणून एक गोष्ट मला तुम्हाला अजितच्या बाबतीत सांगायची आहे की, अजित लोकांचे प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठीच सतत धडपडत असतो. लोकांचे प्रश्न सोडवण्याशिवाय ...

अमरावती व बुलढाणा जिल्हयात झंझावती सभा ; महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब

इमेज
आ.पंकजाताई मुंडे यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांसमवेत खामगांवात घेतली जाहीर सभा पंतप्रधान मोदींप्रमाणे आकाश फुंडकर यांच्या विजयाची हॅटट्रिक करा - आ.पंकजाताई मुंडेंच मतदारांना आवाहन अमरावती व बुलढाणा जिल्हयात झंझावती सभा ; महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब खामगांव (बुलढाणा)।दिनांक १७। भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा स्टार प्रचारक आ. पंकजाताई मुंडे यांच्या आज भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अमरावती व बुलढाणा जिल्हयात झंझावती सभा झाल्या. खामगांव येथे हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासमवेत त्यांची सभा झाली. या सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.   आ. पंकजाताई मुंडे यांना आज खामगाव येथे भाजपा महायुतीचे उमेदवार आकाश फुंडकर आणि धामणगांव रेल्वे मतदारसंघात नांदगाव खंडेश्वर येथे प्रताप अडसड यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतल्या. या दोन्ही सभांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.     केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जशी हॅटट्रिक केली तशी हॅटट्रिक आकाश फुंडकर यांना प्रचंड मतांनी विजयी करून आपण करावी असं आवाहन आ. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केलं....