
छ. संभाजीराजेंचे मस्साजोगमधील मंत्रीपदाबाबतचे 'खोडा' घालणारे वक्तव्य- माजी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंनी 'खोडले' ! बीड: एमबी न्यूज वृत्तसेवा.... स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबांचे सांत्वन करायला आलेल्या छ. संभाजीराजे यांनी मंत्रीपदीबाबत खोडा घालणारे वक्तव्य केलं होतं.या वक्तव्याला खोडणारे वक्तव्य आता माजी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंनी केलं आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे यांनी देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत इथल्या आमदाराला मंत्री करू नये, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यावर माजी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठे विधान केले आहे. देशमुख खून प्रकरणातील सर्व धोगेदोरे पोलिस तपासतील आणि या प्रकरणामागील जो सूत्रधार आहे, ज्याने कोणी हे कृत्य केले आहे, त्याला पोलिस नक्की शोधून काढतील, असा दावाही त्यांनी केला. ...