पोस्ट्स

डिसेंबर १, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  साक्षी सुलाखे हिची न्यायालयीन कनिष्ठ लिपिक या पदासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार                        गेवराई :- बीड जिल्हा  सत्र न्यायालय कनिष्ठ लिपिक या पदी निवड झाल्याबद्दल साक्षी यशवंत( बंडू ) सुलाखे हिची निवड झाल्याबद्दल बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष व जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिल बोर्डे यांनी साक्षी सुलाखे हिचा पुष्पहार, शाल श्रीफळ व पेढे भरून निवासस्थानी सत्कार करण्यात आला.                         याप्रसंगी साक्षी तिचे आई वडील सौ कल्पना सुलाखे व वडील यशवंत सुलाखे परिवारातील सदस्य श्वेता सुलाखे, विश्वांभर सुलाखे, राजेश जोशी संगीता जोशी अर्चना देशमुख सुनंदा कुलकर्णी अनिता कुलकर्णी अशोक देऊळगावकर मोहन राजहंस आदी हजर होते. दिनांक पाच डिसेंबर रोजी निवड झालेली आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक झाले आहे व सर्वांनी अभिनंदन केले आहे.                         ...
इमेज
  जागतिक एड्‌स पंधरवडा निमित्ताने रेल्वे कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जागतिक एड्‌स पंधरवडा निमित्ताने रेल्वे कर्मचाऱ्यांची उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. यात अनेक कर्मचाऱ्यांना तपासणी करून उपचार करण्यात आले.     परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर जागतिक एड्‌स पंधरवडा निमित्ताने रेल्वेत काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची तपासणी करून आवश्यक ते उपचार करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील समुपदेशक शरद चव्हाण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमोल गालफाडे, अविनाश व्हावळे, प्रियंका पोटभरे (डी.आर.डब्ल्यू.), वैभव गुळवे, रेल्वे सुरक्षारक्षक अविनाश गुप्ता, स्टेशन मास्तर तुळशीराम मीना, पांडे, टेक्निशियन दत्तात्रय मुंडे, सहाय्यक टेक्निशियन सुमितकुमार कांबळे आदींनी परिश्रम घेतले.
इमेज
  एमकेसीएलच्या वतीने परळी वैजनाथ च्या विजय कॉम्प्युटर्स चा पुरस्काराने गौरव परळी वैजनाथ: महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) च्या वतीने बीड जिल्ह्यातून MKCL विविध क्लिक कोर्स चे  २०२४  मध्ये सर्वात जास्त प्रवेश नोंदविले ” या साठी  छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या वार्षिक सभेत परळी वैजनाथ येथील अजयकुमार सावजी यांच्या विजय कॉम्प्युटर्स  ला जिल्ह्यातून द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एमकेसीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका वीणा कामथ यांचे हस्ते  विजय कॉम्प्युटर्स चे संचालक अजयकुमार सावजी यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. गेल्या २० वर्ष्या पासून परळी वैजनाथ परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम घडविण्याचे काम सातत्याने विजय कॉम्प्युटर्स च्या माध्यमातून केले जाते. या मुळे दरवर्षी एमकेसीएल कडून सातत्याने विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यावेळी महामंडळाचे अमित रानडे, अतुल पतौडी, दीपक पाटेकर विभागीय समन्वयक बालकिशन बलदवा, गजानन कुलथे लोकल लीड सेंटरचे विठ्ठल पांचाळ हे उपस्थित होते.या मिळालेल्या पुरस्कारा...

श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे श्री दत्त जन्मोत्सवाचे आयोजन

इमेज
  श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे श्री दत्त जन्मोत्सवाचे आयोजन परळी/प्रतिनिधी येथील जागृत देवस्थान श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक प.पू.विलासानंदजी महाराज यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मित्ती मार्गशीर्ष शु.14 शके 1946 शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिरजवळील जागृत देवस्थान श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे श्री दत्त जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी 12 ते 1 वा. महाआरती, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. या धार्मीक कार्यक्रमाचा परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन श्री बजरंगबली वेताळ मंदिराचे संयोजक प.पू.श्री विलासानंदजी महाराज यांनी केले आहे.

धक्कादायक कारण आलं समोर !

इमेज
गंगाखेड :एकाच कुटुंबातील तिघांच्या सामूहिक आत्महत्येचे गूढ उकलले, धक्कादायक कारण आलं समोर गंगाखेडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केली होती. या सामूहिक आत्महत्या प्रकरणामध्ये राज्यभरात खळबळ उडाली होती. या घटनेमागील गूढ अखेर उलगडले. मयत मुलीस माझ्यासोबत लग्न कर अन्यथा तुझ्यासोबतचे असलेले व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची ब्लॅकमेलिंग वजा धमकी सहन न झाल्याने तिघांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शिक्षकीपेशातील कुटुंबाने बदनामीपेक्षा मृत्यूला कवटाळल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.           गंगाखेड शहरानजीकच्या धारखेड शिवारातील रेल्वे रुळावर २८ नोव्हेंबरला दुपारी ममता माध्यमिक विद्यालयातील शिक्षक मसनाजी तुडमे, त्यांच्या पत्नी रंजना आणि मुलगी अंजली यांनी सामूहिक आत्महत्या केली होती. या घटनेमुळे गंगाखेड हादरले होते. आत्महत्या करणारे तुडमे कुटुंब लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किनी-कद्दू येथील रहिवासी होते. या तिघाच्या आत्महत्येमुळे तुडमे...

देशाच्या प्रगतीचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनामुळे  समाजात अस्पृश्यता व भेदभावाच्या विरोधात सुधारणा- राज्यपाल सी. पी राधाकृष्णन मुंबई, दि. ०६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी असलेले एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची होती. त्यांच्या दृष्टिकोनामुळेच भारतीय समाजातील अस्पृश्यता आणि भेदभावाच्या विरोधात महत्वपूर्ण सुधारणा घडल्या असल्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज सांगितले.  दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यपाल श्री. राधाकृष्णन संबोधीत करीत होते.  कार्यक्रमास व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, राजकुमार बडोले, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, संजय बनसोडे, कालिदास कोळंबकर,...

आपघाताचे प्रमाण वाढले.......

इमेज
परळी -सिरसाळा रस्त्यावर दोन आपघात: एकात एक जखमी तर दुसर्‍या अपघातात एक जागीच ठार परळी वैजनाथ (प्रतिनिधी)       परळी -सिरसाळा या एकाच रस्त्यावर काही अंतर व काही वेळेच्या फरकाने  दोन वेगवेगळे आपघात घडले. एका आपघातात एक जण जखमी झाला तर दुसर्‍या एका अपघातात एक जागीच ठार झाला आहे.  याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रावर दि. 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास तुकाराम मुंडलीक (सोनार), रा. खोकलेवाडी ता. गांगाखेड हे मोटार सायकलने जात असताना नाथरा पाटीजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामीण पोलीस व रुग्णवाहिकने तातडीने मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.       दरम्यान याच वेळेच्या काही फरकाने  सिरसाळा रस्त्यावरील रेवली फाट्यानजीक मोटार सायकलस्वार अपघातात जखमी झाला.ऋषी कुकडे रा.होळकर चौक धनगर गल्ली परळी वैजनाथ असे जखमीचे नाव आहे.परळी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यास स्वाराति रुग्णालय अंबाजोगाई येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

गीता जयंती महोत्सव : सहभागी व्हा !

इमेज
गीता परिवारच्या वतीने गीता जयंती महोत्सव मोक्षदा एकादशी निमित्त रंगभरण व फोटो डेकोरेशन स्पर्धा परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       गीता जयंती महोत्सव मोक्षदा एकादशी निमित्त गीता परिवार, परळी वैजनाथ यांच्या तर्फे रंगभरण व फोटो डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन गीता परिवारच्या वतीने करण्यात आले आहे.       जिजामाता गार्डन, टॉवर जवळ, परळी वैजनाथ येथे रविवार, दि. ०८/१२/२०२४ रोजी रंगभरण व फोटो डेकोरेशन  स्पर्धा होणार आहे. प्रवेश वयोगटः १ ली ते ४ थी : विषय रंगभरण स्पर्धा ,५ वी ते ८ वीः विषय फोटो डेकोरेशन स्पर्धा  वेळः दुपारी ३ ते ५  स्पर्धेची फीः फक्त १० रुपये आहे.स्पर्धेसाठी रंग व डेकोरेशनचे साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणावे. त्याचबरोबर मोक्षदा एकादशी विशेष कार्यक्रमः दि. ११/१२/२०२४ दुपारी ३ ते सायंकाळी ६ सामूहिक गीता पठणाचे आयोजन करण्यात आले आहे.आर्य वैश्य महिला मंडळ व गीता परिवार तर्फेः आर्य वैश्य मंदिर, परळी वैजनाथ, जि. बीड येथे तरराजस्थानी महिला मंडळ व गीता परिवार तर्फे हनुमान म...
इमेज
  ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन, ८४व्या वर्षी उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे आज वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. मागील दीड महिन्यांपासून त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. आज पिचड यांची प्रकृती अधिकच खालावली आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मधुकर पिचड यांनी मुलगा वैभव पिचड याच्यासह २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला होता.महाराष्ट्राच्या राजकारणात मधुकर पिचड यांचे नाव आदराने घेतले जाते. मधुकर पिचड यांनी कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली. त्यावेळी त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदही भुषवले होते. त्यांनी आदिवासी विकास, वन व पर्यावरण मंत्री म्हणून कार्यभार पाहिला. अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून त्यांनी १९७२ साली राजकीय प्रवासाला सुरुवात केली. १९७२ ते १९८० या क...

अभिनंदनीय: परळीसाठी मोठी संधी !

इमेज
परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची अमृत विकास सल्लागार समितीवर निवड ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती इत्यादीचा विकास घडविण्याकरीता, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. 'अमृत' संस्थेवर परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची सल्लागार सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.      अमृत संस्थेच्या नियामक मंडळाच्या दिनांक १९/०४/२०२३ रोजी झालेल्या बैठकीमधील मुद्दा क्रमांक १३ नुसार सल्लागार समिती, निवड समिती किंवा इतर आवश्यक त्या कार्यासाठी, आवश्यक त्या विषयांच्या समित्या नेमण्याचे व त्यांच्या वेळोवेळी बैठका घेणे, याचा अधिकार व्यवस्थापकीय संचालक अमृत यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यानुसार अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी सदस्यांची नियुक्ती करून अमृत विकास सल्लागार समितीची स्थापना केली आहे. या नियुक्तीबाबतचे अधिकृत कार्...
इमेज
  सुभाष जोशी पुसकर यांचे निधन परळी वैजनाथ गणेशपार भागातील किराणा व्यापारी सुभाष नारायण जोशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.  गावभागतील गणेशपार भागातील किराणा व्यापारी सुभाष नारायण जोशी पुसकर यांचे दि. 4 डिसेंबर बुधवारी लातूर येथे उपचार चालू असताना प्राणज्योत मालवली. किराणा व्यापारी सुभाष जोशी मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून  परिचित होते. मृत्यसमयी त्यांचे वय 62 वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 विवाहित मुली नातवंडे असा परिवार आहे.
इमेज
रा.काॅ.च्या वतीने रेल्वे स्टेशन परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन परळी वैजनाथ, प्रतिनिधी... रा. काॅ.च्या वतीने रेल्वे स्टेशन परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पानगाव येथे जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या भेटी घेतल्या.       विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख, उपनगराध्यक्ष आय्युबभाई पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अनंत इंगळे, माजी नगरसेवक अजिज कच्छी, रवि मुळे, राज हजारे, सचिन मराठे, संतोष घोडके,सोपानराव रोडे, अलीभाई,सखाराम आदोडे,मंगेश मुंडे, विठ्ठल लोंढे,सुरज उपाडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे क्रांतिकारी व मानवातावादी

इमेज
बहुआयामी विचारवंत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर ------------------------------------------------- ✍️ प्रा.डॉ.सिद्धार्थ आबाजी तायडे नाट्यशास्त्र विभागप्रमुख,  संत  रामदास महाविद्यालय, घनसावंगी जि. जालना.  मो. 9822836675.  ---------------------------------------------------              विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे क्रांतिकारी व मानवातावादी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडलेले आहेत.  शैक्षणिक विचार:- शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल...

पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत

इमेज
  मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत मुंबई, दि.५ : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना  पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.
इमेज
  महायुती सरकारच्या शपथविधी आधी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी परळीतून महायुती सरकारला दिला महत्त्वाचा संदेश परळी वैजनाथ-...       श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील श्री. रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी धर्मशास्त्र, मुहूर्त व प्राणप्रतिष्ठा या संबंधाने केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या ज्योतिर्मठ बद्रीनाथ येथील जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारला मात्र आशिर्वाद दिले आहेत. गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महायुतीचे सरकार असल्याने त्यांना गोमातेचे आशिर्वाद मिळाले आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचे सरकार होत असल्याचे वक्तव्य बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग क्षेत्रामधून केले. महायुती सरकारचा आज शपथविधी होत आहे. या अनुषंगाने शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारला धर्माधिष्ठित राज्यसत्ता चालवा असा महत्त्वाचा शुभ संदेश दिला आहे.            परमाराध्य' परमधर्माधीश उत्तरामनाय ज्योतीष्पीठाधीश्वर जगद्‌गुरू शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वर...

महाराष्ट्र भाजपचे मुंडे - महाजन ते देवेंद्र पर्व

इमेज
  महाराष्ट्र भाजपचे मुंडे - महाजन ते देवेंद्र पर्व ! 1999 साली कॉंग्रेसमधे उभी फुट पडुन झालेली राष्ट्रवादी कॉंग्रेस ची पहिली निवडणुक झाली. सत्तेत असलेल्या युती सरकार ला बहुमतासाठी काही जागा कमी होत्या. 12 अपक्ष आमदार तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत होते. गोपीनाथरावांना मुख्यमंत्री पद दिले तर राष्ट्रवादी पक्ष देखील पाठिंबा देणार अशा चर्चा सुरू होत्या. “शरद पवारांची अभद्र युती कडे वाटचाल “ अशी दै.लोकमत ची हेडलाईन त्यावेळेस होती.मात्र, बाळासाहेब ठाकरे मात्र दुराग्रह सोडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार नाहीतर विरोधी पक्षात बसू अशी जाहीर भूमिका.मुंडे- महाजन - पवार यांची शिष्टाई अयशस्वी झाली. शिवसेना-६९, भाजप -५६ कॉग्रेस-७५, एनसीपी-५८ अपक्ष-१२ व बाकी इतर. असं गणित असुनही ठाकरी बाण्यामुळे युती ला विरोधी पक्षात बसायची वेळ आली.सामना मधून गोपीनाथ मुंडेंवर आडून आडून कधी ऊघड ऊघड टिका केली गेली. मुंडे मुख्यमंत्री होऊ शकतात हे शिवसेनेला कधीच मान्य नव्हते. 2014 साली केंद्रात मोदी सरकार विराजमान झाल्यानंतर देखील मुंडे मुख्यमंत्री होऊ शकतात या चर्चेवर शिवसेनेने टिका...
इमेज
  मजुरीसाठी शेतात गेलेल्या महिलांच्या ॲटोला अपघात: सहा महिलांसह चालक जखमी परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  परळी शहरातील सिध्दार्थ नगर व फुलेनगर भागातील महिला शेतातुन काम करुन परत येत असलेल्या ॲटोला झालेल्या अपघातात सहा महिला व ॲटोचालकासह सातजण जखमी झाल्याची घटना बुधवार दि.४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजता घडली. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.        याबाबत प्राप्त माहिती अशी की, परळी शहरातील सिध्दार्थ नगर व फुले नगर येथील महिला कापूस वेचणीसाठी ग्रामीण भागात जातात. बुधवारी सकाळी कापूस वेचणीसाठी गेलेल्या सांची दिपक शिंदे रा. सिध्दार्थनगर, सोनाली महादेव सोनवणे रा. फुलेनगर, पुजा विक्रम मस्के रा.फुलेनगर परळी, निलाबाई विठ्ठल सोनवणे रा.सिध्दार्थ नगर, सत्यशिला देवराव सोनवणे रा.सिध्दार्थनगर, अंजना सुभाष मिसाळ रा.फुलेनगर या महिला विक्रांत माणिक रोडे रा. ब्रम्हवाडी याच्या ॲटोतुन परळीकडे येत असताना सायंकाळी ७.१५ वाजता परळी जवळील धर्मापुरी फाटा येथे रस्त्याचे काम सुरु असलेल्या ठिकाणी समोरुन येणार्‍या कारने धडक दिल्याने वरील सहा महिला व ॲटोचालक जखमी झाले. सर्व ...

शिर्षस्थ नेत्यांचा संदेश प्राप्त होताच सर्व स्पष्ट होणार!

इमेज
उद्या कोण-कोण शपथ घेणार? भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्टच सांगितलं! गेल्या अनेक दिवसांपासून असलेला सत्ता स्थापनेचा तिढा अखेर शेवटच्या क्षणी सुटला आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. तर, दोन उपमुख्यमंत्रीही राज्याला लाभणार आहेत. दरम्यान, उद्याच्या शपथविधीला कोण कोण शपथ घेणार, कोणाच्या पारड्यात कोणतं खातं पडणार याचीही उत्सुकता राज्यातील जनतेला आहे. यावरून भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते एका वृत्तवाहिनीवर बोलत होते. २० नोव्हेंबरला मतदान होऊन २३ नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालानुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. भाजपाला १३२ जागा, शिवसेना (एकनाथ शिंदे) ५५ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ४० जागा मिळाल्याने महायुतीच राज्यात सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झालं होतं. परंतु, मुख्यमंत्री पदावरून राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या पदासाठी अडून बसले होते, अशी चर्चा होती. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला होता. अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदा...
इमेज
बीड:भाजपा सोडलेल्या लक्ष्मण पवारांनी घेतली फडणवीसांची भेट.. बीड( प्रतिनिधी) जिल्ह्याच्या पालकमंत्र्यावर आरोप करणारे गेवराईचे भाजपकडून दोन टर्म आमदार राहीलेले लक्ष्मण पवार यांनी अपक्ष निवडणूक लढविली.निवडणूक प्रचारात जिंकल्यावर पून्हा भाजपात जाणार नाही असे ठणकावून सांगणा-या लक्ष्मण पवारांनी थेट मुंबई गाठुन सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली आहे. यामुळे पवारांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा मतदार संघात होत आहे.लक्ष्मण पवारांनी भाजपकडून गेवराई विधानसभेची दोन टर्म निवडणूक लढविली होती. २०१४ पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी निवडणुकीत राष्ट्रवादीचे बदामराव पंडित यांचा पराभव केला. तर २०१९ झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित यांचा त्यांनी पराभव केला. गेवराई विधानसभा मतदार संघातून दोन वेळा आमदार राहिलेल्या पवारांनी बीडच्या भाजप श्रेष्ठीवर तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रोष व्यक्त केला. यामुळे यंदाची निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. पुन्हा कार्यकर्ते यांच्या आग्रहाखातर अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा या निवडणुकीत दारूण पराभव तर झालाच शिवा...

गोपाळ आंधळे यांची निवड :हार्दिक अभिनंदन!!!

इमेज
  अखिल  भारतीय ग्राहक पंचायतीची परळी तालुका कार्यकारिणी जाहीर ! अध्यक्षपदी चित्रा देशपांडे, सचिव गोपाळ आंधळे तर संघटन मंत्री पदी विजया दहिवाळ यांची निवड  परळी वैद्यनाथ दि.४(प्रतिनिधी) अखिल भारतीय ग्राहक पंचायत परळी वैजनाथ तालुक्याची कार्यकारणी निवडण्यासाठी बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीत परळी वैजनाथ  तालुका अध्यक्षापदी चित्राताई देशपांडे, तालुका सचिव पदी माजी न.प. शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, संघटन मंत्रीपदी विजयाताई दहिवाळ, तर विधी सल्लागारपदी ॲड.अशोक शहाणे व ॲड. वैजनाथ वांजरखेडे यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही संघटना देश पातळीवर ग्राहकांच्या संरक्षणासाठी निर्माण झाली असून, या समितीची परळी वैजनाथ तालुक्याची कार्यकारणी निवडण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉक्टर विलास मोरे सर यांच्या अध्यक्षतेखाली परळी येथे बैठक संपन्न झाली. यानंतर परळी वैजनाथ तालुक्याची नवीन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली .यामध्ये परळी तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या चित्रा दे...
इमेज
मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीसांची घोषणा होताच मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया काय ? राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा पेच आज अखेर सुटल्याचं चित्र आहे. महायुतीतील भाजपने आज मुख्यमंत्रीपदासाठीचं नाव जाहीर झालं आहे. आज भाजपने अखेर मुख्यमंत्री पदाचं आणि विधीमंडळाच्या नेतेपदी एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यामुळे आता शपथविधीचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. उद्या (गुरूवारी) 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांचा आणि इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहतील.आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पुन्हा देवेंद्र फडणवीसांची नावाची घोषणा होताच मनोज जरांगे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत होते म्हणून आम्ही त्यांचा विरोध केला. सत्तेत असतो त्याच्याशीच भांडावं लागतं. सरकार म्हणून आरक्षण देणारे ते होते म्हणून आम्ही त्यांच्याश...
इमेज
देवेंद्र फडणवीस यांची निवड : गंगाखेड येथे फटाके फोडून आनंदोत्सव      आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक गंगाखेड येथे भारतीय जनता पक्ष विधिमंडळ पक्षनेतेपदी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष श्री.देवेंद्र फडणवीस  यांची निवड झाल्याबद्दल फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.          यावेळी उपस्थित रामप्रभू मुंडे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, रवी जोशी जिल्हापाध्यक्ष परभणी, सुनिल ठाकुर शहराध्यक्ष गंगाखेड, गोविंदराव रोडे मंडळ सरचिटणीस, संतोषराव टोले, बाळासाहेब गव्हाणकर, दिपक फड उद्योजक, जयदेव जोशी शहर उपाध्यक्ष, देवानंद जोशी शहर चिटणीस गंगाखेड, जगन्नाथ आंधळे, संतोष स्वामी, हनुमंत मुंडे सर, मयुर कुलकर्णी, शशिकांतजी धोंडेरकर, वैभव कुलकर्णी, विष्णु चाटे, दिपक दलाल यांच्यासह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
  शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीजींच्या हस्ते श्रीमुर्ती प्राणप्रतिष्ठा  ⟩⟩ संत-महंतांची विशेष उपस्थिती ; काल्याचे कीर्तनाने  उद्या समारोप.    परळी | प्रतिनिधी दि.४ डिसेंबर २०२४ तालुक्यातील श्री क्षेत्र दत्तधाम, सारडगाव येथे सोमवार (दि.२) पासून संत साहित्यिक तथा प्रसिद्ध कथावाचक विद्यावाचस्पती स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य श्री दत्तात्रय भगवान (त्रिमुखी) भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा, दत्तयाग व चार दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात आज गुरुवार दि.५ रोजी बद्रीनाथ येथील परमाराध्य परमधर्माधीश उत्तराम्नाय ज्योतिष्पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामिश्रीः अविमुक्तेश्वरानन्दः सरस्वती १००८ यांची विशेष उपस्थिती लाभणार असून स्वामीजींच्या शुभहस्ते विधिवत महापुजेने श्री दत्तात्रय भगवानजींच्या त्रिमुखी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. प्राणप्रतिष्ठापनेनंतर जगद्गुरु शंकराचार्य स्वामिश्रीः अविमुक्तेश्वरानन्दः सरस्वतीजी यांच्या रसाळ वाणीत भाविकांना अमृततुल्य प्रवचनाचा लाभ घेता येणार आहे. प्रसंगी वेदा...

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द

इमेज
  नगरसेवक ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री! देवेंद्र फडणवीस यांचा 'असा' राहिला झंझावाती राजकीय प्रवास भाजप विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज (दि.४) सर्वानुमते निवड झाली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) म्हणून उद्या ५ डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा शपथ घेतील. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. फडणवीस १९९९ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २००४ मधील निवडणुकीत त्यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली. त्यापाठोपाठ २००९, २०१४, २०१९ आणि आता २०२४ असे सहावेळा विधानसभेवर निवडून आलेत. नगरसेवक ते मुख्यमंत्री असा फडणवीस यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द जन्म : २२ जुलै, १९७० शैक्षणिक पात्रता : नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी १९९२. पुढे बर्लिन येथे व्यवसाय व्यवस्थापन आणि प्रकल्प व्यवस्थापन पद्धती आणि तंत्र पदविका शिक्षण घेतले. १९९२ ते ९७ : नगरसेवक, नागपूर महानगरपालिकेत पहिल्यांदा नगरसेवक. १९९७ ते २००१ : नगरसेवक पदाचा दुसरा कार्यकाळ. १९९७ ते २००१...
इमेज
महाराष्‍ट्रातील जनतेला साष्‍टांग नमस्‍कार: देवेंद्र फडणवीस यांनी व्‍यक्‍त केली कृतज्ञता यावर्षीची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक अशी होती. 'एक है तो सेफ है', 'मोदी है तो मुमकीन है', यावर विश्वास दाखवत महाराष्ट्रातील जनतेने अभूतपूर्व जनादेश महायुतीला दिला. त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आण मित्र पक्षांचे आभार मानतो, अशा शब्दांत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.

.......निमंत्रण पत्रिका

इमेज
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस, उद्या शपथ घेणार शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका आली समोर भाजप विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज (दि.४) सर्वानुमते निवड झाली. विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) म्हणून उद्या ५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता होईल. उद्याच्या शपथविधी सोहळ्याच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेत देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात भाजप आमदारांच्या बैठकीत फडणवीस यांची गटनेतेपदी सर्वोनुमते निवड करण्यात आली. भाजपचे केंद्रीय निरिक्षक निर्मला सितारामन, विजय रूपाणी यांच्या उपस्थितीत गटनेतेपदाची निवड प्रक्रिया पार पडली. या बैठकीत भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदासाठी देवेंद्...
इमेज
  भाजप विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस : चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार यांचा प्रस्ताव तर पंकजा मुंडेंनी दिलं अनुमोदन  भाजप विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार यांचा प्रस्ताव तर पंकजा मुंडेंनी  अनुमोदन दिलं .देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी आज (दि. ४) एकमताने निवड झाली आहे. त्यामुळे फडणवीस यांचेच नाव भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झाल्याचे मानले जात आहे. विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे आज (दि. ४) सकाळी १० वाजता भाजप आमदारांची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत भाजप गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची महाराष्ट्राचे केंद्रीयनिरीक्षक म्हणून यांनी भाजपचे निरीक्षक म्हणून काम पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला होता. महाराष्ट्रात महायुतीला पुन्हा बहुमत मिळाल्याने सरकार स्थापन करणार आहे. महायुतीने 230 जागा जिंकल्या...
इमेज
  महायुती सरकारच्या शपथविधीसाठी प.पु. अमृताश्रमस्वामी महाराज विशेष निमंत्रित   बीड, प्रतिनिधी....   बीड जिल्ह्याचे भूमीपुत्र धर्मगुरू अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत म. जोशी नवगण राजुरी) यांना उद्याच्या होणाऱ्या राज्य सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण आले आहे.      महायुती सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबरला आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अनेकविध पंथ, संप्रदाय, संघटना, संस्था, साधू,संत, महंत, यांना शपथविधी साठी निमंत्रित करण्यात आले आहे. या मध्ये बीड जिल्ह्यातील कीर्तन क्षेत्रात अत्यंत अग्रगण्य असणारे ज्येष्ठ कीर्तनकार नवगण राजुरीचे भूमीपुत्र अमृताश्रम महाराज यांना देखील निमंत्रित करण्यात आले असुन महाराज शपथविधी सोहळ्याला साठी उपस्थित राहणार आहेत. सध्या अमृत आश्रम स्वामी महाराज  सुरत येथे कार्यक्रमानिमित्त गेलेले असून त्यांना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण प्राप्त झाल्यानंतर आता ते थेट सुरत वरून मुंबई येथे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
इमेज
  हेळंब येथे श्री खंडोबा यात्रोत्सव 7 ते 9 डिसेंबर ; यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-  तालुक्यातील हेळंब येथे प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री खंडोबाची यात्रा दि. 7 ते 9  डिसेंबर रोजी होत असून यात्रेची जोरदार तयारी सुरु आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणावर पंचक्रोशीतील भाविक येत असल्याने ग्रामस्थामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात यात्रेच्या पार्श्‍वभुमीवर घरोघरी भाविक व नातेवाईकांच्या स्वागताची तयारी सुरु असल्याचे दिसत आहे.  हेळंब येथे श्री खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी चंपाषष्ठीला मोठी यात्रा भरत असते. याहीवर्षी ही यात्रा जोरदार होणार आहे. यात्रा अवघ्या काही दिवसावर आली असुन यात्रेची नागरिकांमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. नवसाला पावणारा खंडेराया अशी या देवसस्थानाची पंचक्रोशीत ओळख आहे. परिसरातील गावो गावचे नागरिक दर्शनासाठी, नवस करण्यासाठी व नवसाच्या पुर्तेतेसाठी येथे गर्दी करीत असतात. या पार्श्‍वभुमीवर ग्रामस्थांच्या वतीने स्वच्छते सह इतर तयारीला वेग आला आहे. यात्रेनिमित्त गावामध्ये दि.7 ते 9 डिसेंबर या कालावधीत श्रींची प...