पोस्ट्स

इमेज
  अरोही स्टाईल स्टुडीओच्या दांडीया महोत्सवास प्रारंभ महिला पोलीस कर्मचार्यांच्या हस्ते उद्घाटन,दररोज विविध स्पर्धांमध्ये आकर्षक बक्षीसे परळी (प्रतिनिधी)  परळी शहरातील अरोही स्टाईल स्टुडीओ च्या संचालिका,सामाजीक कार्यकर्त्या सौ.श्रध्दा गजानन हालगे- फुलारी यांच्या वतिने आयोजीत बेलवाडी येथे दांडीया स्पर्धेस प्रारंभ झाला या दांडीयाचे महिला पोलिस कर्मचार्यांच्या हस्ते व विविध क्षेत्रातील महिलांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.4 ऑक्टोबर रोजी शुभारंभ करण्यात आला.या दांडीयामध्ये महिलांसाठी खेळ पैठणीचा,फॅशन शो,आरती ताट सजावट व दांडीया स्पर्धेतून दररोज आकर्षक बक्षीसे देण्यात येत आहेत.    परळी शहरातील महिलांना आपल्याच भागात दांडीया खेळाचा आनंद घेता यावा यासाठी अरोही स्टाईल स्टुडीओच्या वतिने नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या गुरुलिंगस्वामी मठ,बेलवाडी येथे दररोज सायंकाळी 7 ते 10 या वेळेत नारीशक्ती दांडीया महोत्सवाचे आयोजन केले आहे.यामध्ये फॅशन शो,खेळ पैठणीचा,आरती ताट सजावट व दांडीया स्पर्धा घेण्यात येत आहेत.तसेच दररोज वेगवेगळ्या स्पर्धा घेवुन यातील विजेत्या महिलांना पेंटेवार कल

मतदान करणे हाच लोकशाहीचा आत्मा आहे -प्रा.डी.बी गायकवाड

इमेज
  मतदान करणे हाच लोकशाहीचा आत्मा आहे -प्रा.डी.बी गायकवाड  परळी प्रतिनिधी ---जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये शासनाच्या परिपत्रकानुसार मतदान जनजागृति मोहिमे संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक डी बी गायकवाड यांनी मतदान करणे हाच लोकशाहीचा आत्मा आहे  असे मत प्रतिपादन केले या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डी के आंधळे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.जे व्हि.जगतकर इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. व्हि.जे चव्हाण यांची उपस्थिती होती. यापुढे बोलताना प्रमुख पाहुणे प्रा. गायकवाड यांनी मतदानाद्वारे लोकशाही शासन व्यवस्था मजबूत करता येते. तसेच मतदानाच्या माध्यमातून नागरिकास हवा तो राजकीय पक्ष सत्तेत आणता येतो ,अर्थात हवी ती विचारधारा राजकीय सत्तेच्या माध्यमातून अमलात आणता येते, मतदानाकडे दुर्लक्ष करणे लोकशाहीचा अपमान आहे ही राजकीय उदासीनता लोकशाहीसाठी घातक आहे म्हणून आपल्या आवडीचे सरकार व विचारधारा प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे .मतदानाच्या माध्यमातून वैचारिक क्रांती होऊ शकते .जोपर्यंत देशातील

महातपुरीत पाण्याच्या मोटार काढण्यावरून राडा!

इमेज
  महातपुरीत पाण्याच्या मोटार काढण्यावरून राडा!  अख्ख्या गावाने पाच तास रोखला तहसिलदारांचा ताफा   आ.सोळंकेंनी मध्यस्थी करून तहसीलदारांना काढले सुखरूप बाहेर  माजलगाव प्रतिनिधी दि.10 तालुक्यातील महातपुरी सुलतानपूर येथील गोदावरी नदीवर पाणी उपश्यासाठी बसवलेल्या मोटार काढण्यावरून गावकरी आणि तहसीलदारात बुधवार दि 10 रोजी पहाटे मोठा राडा झाला.यादरम्यान आख्या गावाने एक होत सुमारे पाच तास तहसीलदाराचा ताफा रोखून धरला होता.या आणीबाणीच्या प्रसंगी आ.प्रकाश सोळंके यांनी गावकऱ्याची समजूत काढत मध्यस्थी करून तहसीलदारांना सुखरूप बाहेर काढले. गतवर्षी पावसाळा कमी झाल्याने जिल्ह्यात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची जपवनुक करण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यातच शेतीसाठी नदीकाठ गंगा काठावरून केला जाणारा पाण्याच्या उपशावरही नियंत्रण ठेवणे सुरू केले आहे.याच कामासाठी माजलगावच्या तहसीलदार वर्षा मनाळे आपल्या ताफ्यासह महादपुरी  येथे गंगा काठी गेल्या होत्या.यावेळी त्यांनी नदीवर असणाऱ्या विद्युत मोटरी काढण्यासा

शंभू महादेवाच्या वाघाच्या काठीची व कावडीची मिरवणूक

इमेज
शंभू महादेवाच्या वाघाच्या काठीची व कावडीची मिरवणूक   परळी : शंभू महादेवाच्या वाघाच्या काठीची व कावडीची मिरवणूक येथील पद्मावती गल्लीतून जुन्या परळीत पारंपरिक मार्गावरून मंगळवारी सायंकाळी  वाजत-गाजत काढण्यात आली  आहे .           पद्मावती गल्लीतील  मठपती वाघेश विश्वंभर स्वामी यांनी सपत्नीक महादेवाच्या काठीची व कावडीची पूजा केली .यावेळी आरती करण्यात आली. साखरेच्या गाठीची माळ व पुष्पहार घालून व एकदा शंभूच्या नावाने बोला हर हर महादेव चा जयघोष करीत मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी मठपती संजय स्वामी ,दयानंद स्वामी ,धनंजय स्वामी, वाघेश स्वामी , अनिरुद्ध स्वामी, उद्योजक शेखर स्वामी, विनोद स्वामी, ओम स्वामी.  शिक्षक नेते श्री शिवलिंग स्वामी. आश्विन मोगरकर , दयानंद चौधरी, रमेश चौधरी, संदीप चौधरी, उमाकांत टाक यांच्यासह गणेशपार रोड, जंगमगल्ली , देशमुख गल्ली, अंबेवेस , पेठगल्ली मार्गे   मार्गे  ही काठी व कावड मिरवणूक रात्री देशमुख पारावरील देशमुख वाड्यात आली. यावेळी एकदा शंभूच्या नावाने बोला हर हर महादेव चा जयघोष चालू होता. 172 वर्षाची परंपरा या काठी व कावड मिरवणूकिस असून परळीच्या मठपती परिवाराच

माहेरी आलेल्या लेकीसारखं ग्रामस्थांनी केलं उत्स्फूर्त स्वागत

इमेज
  पंकजाताई मुंडेंनी गुढीपाडवा साजरा केला धनगरवाडीतील ऊसतोड मजूरांसोबत बीड जिल्हयाच्या अतिउज्ज्वल भविष्याचा इतिहास होण्याचा केला संकल्प माहेरी आलेल्या  लेकीसारखं ग्रामस्थांनी केलं उत्स्फूर्त स्वागत बीड।दिनांक ०९। भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज धनगरवाडी (ता. शिरूर) येथील ऊसतोड मजूर बांधवांसोबत गुढी पाडवा सण मोठया आनंदात आणि उत्साहवर्धक वातावरणात साजरा केला. माहेरी आलेल्या लेकीसारखं गावातील महिलांनी अतिशय थाटात त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं.    चैत्र शुध्द प्रतिपदा अर्थात मराठी नववर्षाच्या सुरवातीला येणाऱ्या गुढी पाडवा सणाला विशेष महत्त्व असते. पंकजाताई मुंडे सध्या जिल्हयात ठिकठिकाणी प्रचार दौर्‍यावर असून ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. आजचा गुढी पाडवा सण कष्टकरी जनतेसोबत साजरा करावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. या उद्देशाने त्यांनी शिरूर कासार तालुक्यातील धनगरवाडी येथील ऊसतोड मजूरांसोबत साजरा गुढी पाडवा साजरा केला.  ग्रामस्थांनी केलं लेकीचं जंगी स्वागत ------ धनगरवाडीत आगमन होताच पंकजाताईंचं ग्रामस्थांनी वाजतगाजत जंगी स्वागत केलं. माहेरी आलेल्या लेकींचं जसं स्वागत होतं
इमेज
  संतश्री रानबा महाराज मंदिर येथे आज गुढीपाडवा उत्सवाचे आयोजन नववर्षानिमित्त पूजा व आरती; प्रसादाचेही होणार वितरण परळी वैजनाथ/प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील संत श्री रानवा महाराज मंदिर येथे आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता हिंदू धर्मियातील नववर्ष गुढीपाडवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त संत श्री रानबा महाराज यांची विधिवत पूजा व आरती होणार असून सकाळी दहा वाजता भाविक भक्तांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत श्री रानबा महाराज मंदिर ट्रस्टचे श्री ज्ञानेश्वर खर्डे व श्री रामेश्वर खर्डे यांनी  केले आहे. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी परळी वैजनाथ येथील पंचायत समिती समोर असलेले संत श्री रानबा महाराज यांचे मंदिर आहे. गुढीपाडवा नववर्षानिमित्त संत श्री रामभाऊ महाराज मंदिर फुलांनी सजविण्यात आले आहे. या ठिकाणी संत श्री रानबा महाराज यांची विशेष महापूजा व आरती सकाळी नऊ वाजता होणार आहे. त्यानंतर खिचडी प्रसाद भाविकांना वाटप केला जाणार आहे. या कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या

जनतेचे प्रेम हीच माझी ऊर्जा; बीड दौऱ्यात पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला विश्वास

इमेज
  जिल्ह्यातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठीच माझी उमेदवारी :पंकजा मुंडे  जनतेचे प्रेम हीच माझी ऊर्जा; बीड दौऱ्यात पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला विश्वास लोकनेते मुंडे साहेबांच्या संस्काराच्या शिदोरीवरच सर्वसामान्यांना सोबत घेऊन राजकीय वाटचाल बीड ।दिनांक ०८। जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा विकास करण्यासाठी भाजप महायुतीकडून माझी उमेदवारी आहे. यापूर्वी राज्य मंत्रिमंडळात मी काम केलेले आहे. हे काम करताना जिल्ह्यातील सर्व घटकांचा विकास हेच ध्येय समोर ठेवून जनतेची कामे मार्गी लावली. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवरच जिल्ह्यातील सर्वसामान्य, वंचित, उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी त्यांना सोबत घेऊन आमची राजकीय वाटचाल होत आहे, त्यामुळे मी ज्यांना- ज्यांना भेटते त्यांना कधीही जातीच्या चष्म्यातून पाहत नाही. तो संस्कार आमचा  नाही. बीड जिल्ह्यातील जनतेचे प्रेम हीच माझी ऊर्जा आहे असे भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज येथे सांगितले.  बीड लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांचा प

मायेच्या हळव्या स्पर्शाने' समृद्ध नेतृत्व

इमेज
 'मायेच्या हळव्या स्पर्शाने' समृद्ध नेतृत्व: ताई ,आम्ही आहोत; स्वतःला जप - पंकजाताईंना वयोवृद्ध महिलांचे भरभरून आशीर्वाद बीड, प्रतिनिधी....           पंकजाताई मुंडे यांना राजकीय जीवनात जनसामान्यांचा खंबीर आशीर्वाद, प्रेम ,साथ, सहकार्य नेहमीच मिळत आले आहे. परंतु इतर राजकीय नेत्यांपेक्षाही वेगळी अशा प्रकारची जिव्हाळा  माया व प्रेमाची समृद्ध श्रीमंती फक्त पंकजाताई मुंडे यांनाच सातत्याने अनुभवावयास मिळते याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात. बीड लोकसभेच्या प्रचारात असताना आज असाच काहीसा भाऊक परंतु अतिशय जिव्हाळ्याचा प्रसंग बघायला मिळाला.              बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे या सध्या जिल्ह्यात दौरा करत असून जिल्ह्यातील गाव न गाव त्या पिंजून काढताना दिसत आहेत. पंकजाताईंना जाईल तिथे जनतेच्या निरपेक्ष प्रेम व मायेची साथ मिळतांना  दिसते. पंकजाताई मुंडे राज्यात कुठेही फिरत असताना असे जिव्हाळ्याचे प्रसंग अनेक वेळा  बघायला मिळतात. परंतु बीड जिल्ह्यातील जनतेच्या मनात आणि वागण्यात पंकजाताई मुंडे आल्यानंतर एक वेगळीच आत्मीयता व लेक आल्याचा आनंद बघाय

संत बाळूमामा मंदिराच्या सप्ताहास भेट

इमेज
  पंकजा मुंडेंनी चाकरवाडीत केली सेवा,माऊलींचे दर्शन व घेतले आशिर्वाद ! माऊलींचे घेतले दर्शन ; कारेगावच्या संत बाळूमामांच्या सप्ताहात घेतला कीर्तन श्रवणाचा लाभ केज ।दिनांक ०८।  भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या साधेपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आला. श्रीक्षेत्र चाकरवाडीत माऊलींचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी स्वतःच्या हाताने महापंगतीतील भाविकांना प्रसाद वाटप केला, त्यांच्या या कृतीने उपस्थित भाविक मात्र भारावून गेल्याचे पहायला मिळाले.     लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने पंकजाताई मुंडे यांचा सध्या जिल्हाभरात दौरा करत आहेत. आज सोमवती अमावस्यानिमित्त परळीतील व्यापाऱ्यांच्या वतीने चाकरवाडीत महापंगत ठेवण्यात आली होती. पंकजाताई मुंडे आज बीडमध्ये होत्या, प्रचारातून वेळ काढून त्या श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे पोहोचल्या. सर्वप्रथम त्यांनी संत माऊली महाराजांचे दर्शन घेतले. मंदिर संस्थानच्या वतीने महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी त्यांचं यावेळी स्वागत केलं. यानंतर पंकजाताईंनी लगेच महापंगतीत जाऊन भाविकांना  स्वतःच्या हाताने प्रसाद वाटप केला, त्यांचा हा स

मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये यांचा व्यवस्थापकीय संचालक डॉ पी अनबलगन यांचाकडून सत्कार

इमेज
  महानिर्मितीची ऐतिहासिक विक्रमी ६१४३९ दशलक्ष युनिट्स वीज निर्मिती : परळी औष्णिक विद्युत केंद्राचे विशेष योगदान मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये यांचा व्यवस्थापकीय संचालक डॉ पी अनबलगन यांचाकडून सत्कार परळी / प्रतिनिधी      राज्यात महानिर्मिती कंपनीकडून वीज उत्पादनात विक्रम प्रस्थापित करण्यात आला असुन या वर्षात महानिर्मितीने ऐतिहासिक विक्रमी ६१४३९ दशलक्ष युनिट्स वीज निर्मिती केली.यामध्ये परळी औष्णिक विद्युत केंद्राचे विशेष योगदान राहिले. या कामगिरीबद्दल मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये यांचा वरिष्ठांकडून सत्कार करण्यात आला.         राज्यातील येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रांनी पुन्हा एकदा विक्रमी वीज उत्पादन केले असून एका आर्थिक वर्षात ६१४३९ दशलक्ष युनिट्स वीज उत्पादन केले आहे. याबद्दल महानिर्मिती च्या मुख्य कार्यालय मुंबई येथे औष्णिक विद्युत केंद्रांच्या मुख्य अभियंतांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये परळी वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये यांचाही सत्कार करण्यात आला.परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या वतीने विजनिर्मितीचे अनेक विक्रम केलेले आहेत.रा

जहाजावरून बेपत्ता परळी तालुक्यातील युवकाच्या शोधासाठी मुंडे बंधू- भगिनींचे पीएमओ व परराष्ट्र मंत्रालयाकडे मदतीसाठी प्रयत्न

इमेज
  जहाजावरून बेपत्ता परळी तालुक्यातील युवकाच्या शोधासाठी मुंडे बंधू- भगिनींचे पीएमओ व परराष्ट्र मंत्रालयाकडे मदतीसाठी प्रयत्न परळी वैजनाथ, प्रतिनिधी           परळी तालुक्यातील इंजेगावचा युवक सिंगापूर- इंडोनेशिया दरम्यान जहाजातून  बेपत्ता झाल्याच्या घटनेने त्याचे कुटुंबचिंतग्रस्त बनले आहे. सर्वच प्रसार माध्यमांमध्ये प्राधान्याने ही बातमी प्रसारित झाली असून कराड कुटुंबाला प्रणव चा शोध घेण्यासाठी मदत व्हावी या दृष्टीने सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. या अनुषंगाने राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी प्रधानमंत्री कार्यालय, परराष्ट्र मंत्रालय आदी संबंधित ठिकाणी पाठपुरावा  सुरू केलेला आहे. प्रणव कराडचा शोध घेण्यासाठी मदतीचे आवाहन त्यांनी ट्विट करून केले आहे.             सध्या पुण्यात राहत असलेला मात्र  मुळ परळी वैजनाथ तालुक्यातील इंजेगावचा प्रणव कराड नावाचा तरुण जहाजावरुन बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये एका कंपनीच्या जहाजावर काम करत होता. मात्र आता तो अचानक बेपत्त

स्थानिक नेते, कार्यकर्ते लागले कामाला

इमेज
  पंकजाताई मुंडेंना लोकसभेत पाठविण्यासाठी पालकमंत्री, आमदारांच्या गावोगावी बैठका स्थानिक नेते, कार्यकर्ते लागले कामाला सुक्ष्म प्रचार यंत्रणा राबवून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार बीड।दिनांक ०७। लोकसभा निवडणूकीसाठी येत्या १३ मे रोजी मतदान होत आहे. तब्बल २१ लाख १५ हजारे ८१३ इतके मतदान असलेल्या बीड जिल्ह्यात भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना भाजप महायुतीने बीड लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर पालकमंत्र्यांसह भाजप महायुतीचे सर्व आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष आदी नेत्यांसह महायुतीचे तालुका व गावपातळीवर काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. पंकजाताईंना विक्रमी मतांनी निवडून देत लोकसभेत मान-सन्मानाने  पाठवण्याचा निर्धार सर्व जण विविध ठिकाणी बोलून दाखवत आहेत.  सध्या पंकजाताई मुंडे यांनी नुकताच प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण करून दुसरा टप्पा सुरू केला आहे. गावोगावी महायुतीचे कार्यकर्ते तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांचेसह आमदार सुरेश धस, आ. प्रकाश सोळंके, आ. लक्ष्मण पवार, आ. बाळासाहेब आजबे, आ. नमिता मुंदडा, माजी आमदार केशवराव आधळे, भीमराव धोंडे, अमरसिंह पंडित, ज

निवडणूक सोपी करण्याचं कोष्टी, बंजारा समाज बांधवांनी दिलं पंकजाताईना वचन

इमेज
  पंकजाताई मुंडेंनी वडवणी शहर पिंजून काढलं तुमचं प्रत्येक मत हे माझ्यासाठी वचन ; सर्व घटकांचा विकास हेच माझं ध्येय निवडणूक सोपी करण्याचं कोष्टी, बंजारा समाज बांधवांनी दिलं पंकजाताईना वचन वडवणी ।दिनांक ०७। तुमचं प्रत्येक मत हे माझ्यासाठी वचन असणार आहे, समाजातील वंचित, पीडितांसह सर्व समाज घटकांचा विकास करणं हे ध्येय ठेवून मी काम करत आहे. लोकनेते मुंडे साहेब जिथपर्यंत पोचले होते, तिथपर्यंत जाण्याची संधी मला आपल्या आशीर्वादाने मिळणार आहे. या संधीचा उपयोग जिल्हयासाठीच होणार असल्याने मला आपले आशीर्वाद द्या असं आवाहन भाजपा राष्ट्रीय सचिव तथा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज इथे केलं.     लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार दौरा करत असतांना पंकजाताई मुंडे यांनी आज वडवणी शहर पिंजून काढले. चौपदरा तांडा येथे बंजारा आणि चौंडेश्वरी मंगल कार्यालयात कोष्टी समाज बांधवांशी संवाद साधत त्यांनी शहरातील विविध समाज घटकातील नागरिकांच्या भेटी घेतल्या व संवाद साधला.    नागरिकांसमोर बोलताना पंकजाताई म्हणाल्या,  आतापर्यंत मी लोकनेते मुंडे साहेब, खासदार डाॅ.प्रितमताई, रजनीताई पाटील यांच्यासाठी मतं म

पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र व्यवहार आणि जहाजबांधणी मंत्रालयामार्फत मदतीची नितांत गरज

इमेज
  परळी तालुक्यातील इंजेगावचा युवक सिंगापूर- इंडोनेशिया दरम्यान जहाजातून  बेपत्ता ! तीन दिवस उलटले :पालक चिंताग्रस्त: कंपनीकडून अधिक माहितीसाठी समाधानकारक प्रतिसाद नाही परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा...          सध्या पुण्यात राहत असलेला मात्र  मुळ परळी वैजनाथ तालुक्यातील इंजेगावचा प्रणव कराड नावाचा तरुण जहाजावरुन बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये एका कंपनीच्या जहाजावर काम करत होता. मात्र आता तो अचानक बेपत्ता झाल्याची माहिती प्रणवच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारामुळे प्रणवचे कुटुंबीय फार चितेत आहेत.तसेच या संदर्भात अधिक माहितीसाठी कंपनीकडून माहितीसाठी समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची खंत चिंताग्रस्त असलेल्या कराड कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.            प्राप्त अधिक माहितीनुसार, विल्हेम्सन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड या कंपनीत प्रणव काम करत होता. कंपनीच्या जहाजावर प्रणव डेट कॅडेट म्हणून काम करायचा. गेल्या तीन दिवसांपासून प्रणव बेपत्ता असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. मुंबईतल्या कंपनीने प्रणवचा शोध सुरू केला आहे

चेअरमन विनोद सामत यांना वाढदिवसानिमित्त शुभ आशीर्वाद

इमेज
  वैद्यनाथ अर्बन बँकेची राज्यभरात  भरभराट होईल- नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रात अव्वल असलेल्या  परळीच्या वैद्यनाथ अर्बन बँकेने सभासद , खातेदार व ठेवीदारांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. बँकेच्या आजपर्यंतच्या  नेतृत्वाने , व चेअरमन संचालक मंडळ ,अधिकारी, कर्मचारी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे वैद्यनाथ अर्बन बँक राज्यात अग्रेसर असून या बँकेची प्रगती यापुढे होणार आहे असा आशीर्वाद सोनपेठ श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी दिले. सामान्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी या बँकेने प्रयत्न केले आहे यापुढे करावेत अशी अपेक्षा ही शिवाचार्य महाराजांनी व्यक्त केली.                                          श्री  नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांनी शनिवारी वैद्यनाथ अर्बन बँकेच्या मुख्य शाखेस भेट दिली याप्रसंगी त्यांनी बँकेच्या कामकाजाची माहिती घेतली व बँकेचे चेअरमन विनोद सामत यांना वाढदिवसानिमित्त शुभ आशीर्वाद दिले .यावेळी बँकेच्या वतीने नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांचे स्वागत करण्यात आले .यावेळी आपल्या मनोगतातून बँकेच्या संचालि

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कारवाया

इमेज
  परळी पोलिस ॲक्शन मोडमध्ये ! कोम्बिग ऑपरेशन राबवत फरार 18 आरोपी ताब्यात;तीन तलवारी जप्त  परळी (प्रतिनिधी)  परळी शहर,संभाजीनगर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या वतिने शुक्रवारी (दि.5 एप्रिल) रात्री लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यात गस्त घालुन ठिकठिकाणी तपासणी करण्यात आली.यामध्ये विविध गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या 18 आरोपींना ताब्यात घेण्याबरोबरच तीन तलवारी व हातभट्टी दारु अड्डयावर छापा टाकत गुन्हे दाखल केले.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळी पोलिस ॲक्शन मोडमध्ये असुन शुक्रवार दि.5 एप्रिल रोजी रात्री 11 ते पहाटे 4 या वेळेत परळी शहरासह तालुक्यात पोलिस उपाधिक्षक चोरमले,परळी शहर पोलिस ठाण्याचे पोनि.संजय लोहकरे,संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोनि उस्मान शेख,ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोनि मनिष पाटिल यांच्यासह 23 कर्मचारी व आरसीपी ची एक प्लॅटुन अशा फोजफाट्यासह संयुक्त कारवाई करण्यात आली.यात  विविध गंभीर गुन्ह्यातील दोन वर्षांपासुन फरार असलेल्या 18 आरोपीसह टोकवाडी,फुलेनगर या भागातुन तीन तलवारी जप्त करण्यात आल्या.गंगासागर नगर भागात सुरु असलेल्या हातभट्टी अड्डयावर छापा टाकत 2200 रुपयांचे र

नारायण गडावरील बैठकीत मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केला होता विषय

इमेज
शाळकरी मुलींची छेड प्रकरण ;दोन जण सिरसाळा पोलीसांच्या ताब्यात  नारायण गडावरील बैठकीत मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केला होता विषय  सिरसाळा  :  शाळेत जात येत असलेल्या मुलीला रस्त्यात गाठून छेड काढणाऱ्या करेवाडीच्या  दोन रोमिओंना सिरसाळा पोलीसांनी आज (दि. ६ एप्रिल) रोजी ताब्यात घेतले आहे.त्यांच्यावरती कलम ३५४,३४१ भादवी व पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक १ एप्रिल रोजी घडल्याचे समजते आहे. काल मनोज जरांगे पाटील यांनी  नारायणगड येथे मराठा समाज बांधवांच्या झालेल्या बैठकीत छेडछाडीचा विषय मांडला होता .          परळी तालुक्यात माझ्या समाजाच्या मुलींना त्रास दिला जातो, अन्याय केला जातो असे म्हणत या प्रकरणी पालकमंत्री यांनी लक्ष द्यायला हवे अन्यथा आम्ही परळीत घुसू असे जरांगे पाटिल यांनी वक्तव्य केले होते. यानंतर ह्या घटनेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सिरसाळा पोलीसांनी दोन आरोपींना आज ताब्यात घेतले असुन पुढील कार्यवाही सुरु आहे. अधिक तपास सह पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहिफळे करत आहेत.

बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांशी साधला संवाद

इमेज
  गोंधळी, धनगर, बंजारा, भिल्ल समाजासह अठरापगड जातीची मिळतेयं पंकजाताई मुंडेंना साथ बीडच्या बैठकीत समाजातील कार्यकर्त्यांनी दिली एकमुखी पसंती सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख नेतृत्व पंकजाताई मुंडेच बीड ।दिनांक ०५। बीड जिल्ह्यातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेल्या अभूतपूर्व विकास कामांमुळे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना अनेक सामाजिक घटक आणि राजकीय संघटनांचा पाठिंबा मिळतो आहे. बीड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, सुपर वॉरीअर्सच्या बैठकीत याचा प्रत्यय आला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात बीड तालुक्यातील गोंधळी समाज,धनगर समाज, बंजारा समाज, भिल्ल समाज आणि लोक कलावंत जिल्हा संघटनेने पंकजाताई मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी सर्व समाज घटकांनी पंकजाताई मुंडे यांचे स्वागत केले. आगामी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने पंकजाताईंच्या पाठीशी मतदान रुपी आशीर्वाद उभे करून त्यांना विक्रमी मताधिक्याने लोकसभेत पाठवण्याचा संकल्प केला, याप्रसंगी पंकजाताई मुंडे यांनी

तुम्ही बुथ मजबुत करा, मी जिल्हा मजबूत करते

इमेज
  बीडमध्ये भाजपा महायुतीचे जिल्हा प्रचार कार्यालय ; पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले उद्घाटन बूथ प्रमुखांसह सुपर वॉरियर्स सोबत पंकजाताईंनी घेतली बैठक बीड ।दिनांक ०५। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बीड येथील जिल्हा मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उदघाटन आज  भाजप महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मोठया उत्साहात झाले. खा. डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्यासह महायुतीचे सर्व जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.  बीड शहरातील जालना रोडवरील संचेती बिल्डींग, एम.एस.ई.बी. कार्यालयासमोर, भाजप महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालय सुरू झाले आहे. आता या ठिकाणाहून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने काम केले जाणार आहे. दुपारी पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते फीत कापून या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पंकजाताई यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी करत त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.    पकार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी  खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर

परळीत आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल

इमेज
  परळीत आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     परळीत बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शाळकरी मुलींच्या अपहरणाच्या घटनाही घडलेल्या आहेत महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दररोज पोलीस ठाण्यात नोंद होताना दिसून येत आहे आज पुन्हा एकदा एका महिलेने आपल्यावर सातत्याने शारीरिक अत्याचार करण्यात आले व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली या आशियाची फिर्याद दाखल केल्यावरून एका जणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, शहरातील शिवनगर, वडर कॉलनी  येथील मोलमजुरी करणाऱ्या एका गृहिणीने आपल्यावर सातत्याने अत्याचार करण्यात आल्याची फिर्यादी पोलिसात दाखल केली आहे.यातील फिर्यादी व आरोपी हे एकमेकाना ओळखत असून आरोपी व फिर्यादी अधून-मधून बोलत असत. नंतर आरोपी हा फिर्यादीस मला तूझ्या सोबत शारीरीक संबंध ठेवायचे आहेत असे म्हणत असे, नकार दिल्यास तूझ्या मूलांना मारून टाकीन अशी धमकी देवू लागला, त्यानंतर दिनांक 30/03/2024 रोजी सकाळी 11.00 वा. सुमारास फिर्यादी घरी एकटीच असताना आरोपीने घरी येवून फिर्यादीसोबत जबरदस्तीने बलात

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, बीडमधून पुन्हा बजरंग सोनवणे

इमेज
  राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, बीडमधून पुन्हा बजरंग सोनवणे मुंबई  : शरदचंद्र पवार गटाची बहुप्रतिक्षित दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये बीडमधून पंकजा मुंडे यांच्याविरोधात पुन्हा एकदा बजरंग बप्पा सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर भिवंडीवर काँग्रेसने अखेरपर्यंत दावा करूनही ही जागा मिळविण्यात शरद पवार गटाने बाजी मारली. या जागेवरून बाळ्यामामा म्हात्रे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याविरोधात म्हात्रे दोन हात करतील. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने याआधी पहिल्या उमेदवारी यादीत पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली होती. गुरुवारी पक्षाने दुसरी यादी जाहीर केलेली असून बीड आणि भिवंडीच्या जागेवर उमेदवार जाहीर केलेले आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने याआधी पहिल्या उमेदवारी यादीत पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली होती. बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, नगर दक्षिणमधून निलेश लंके, दिंडोरीमधून भास्करराव भगरे गुरूजी तर वर्ध्यातून अमर काळे यांना पक्षाने उमेदवारी दिलेली होती. गुरूवारी पक्षाने आणखी दोन उमेदवारांच्

महाविजय २०२४ : पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या बीड लोकसभा जिल्हा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ व बीड मतदारसंघ कार्यकर्ता बैठक

इमेज
  महाविजय २०२४ : पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या बीड लोकसभा जिल्हा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ व बीड मतदारसंघ कार्यकर्ता बैठक बीड,प्रतिनिधी....          ३९ बीड लोकसभा निवडणुक भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपिनाथराव मुंडे यांच्या हस्ते बीड लोकसभा जिल्हा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आज शुक्रवार दि.५ एप्रिल २०२४ रोजी करण्यात येणार आहे.तसेच बीड मतदारसंघ कार्यकर्ता बैठक होणार आहे.यावेळी खा. डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.        आज शुक्रवार दि.५ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वा. संचेती बिल्डींग, एम.एस.ई.बी. कार्यालयासमोर, जालना रोड, बीड येथे पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते बीड लोकसभा जिल्हा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ  करण्यात येणार आहे. यावेळी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेना नेते अनिल जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे,सचिन मुळूक,रिपाई नेते पप्पू कागदे आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजप महायुती प्रचार समितीने केले आहे. • बीड मतदारसंघ कार्

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पंकजाताईंना विक्रमी मताधिक्य देणारा

इमेज
  पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ खा.प्रितम मुंडे यांच्या बर्दापूर, राडी गटात भेटीगाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पंकजाताईंना विक्रमी मताधिक्य देणारा अंबाजोगाई - दि. ०२ --- भाजप महायुतीच्या उमेदवार तथा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ खा. प्रितमताई मुंडे यांनी बर्दापूर आणि राडी जिल्हा परिषद गटातील  नागरिकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. ग्रामीण भागातील तांडे, वाड्या-वस्त्यांचा शहरातील उच्चभ्रू वस्त्यांप्रमाणे विकास करणाऱ्या विकासाभिमुख नेतृत्वाला बहुमताने लोकसभेत पाठवण्यासाठी मतदानरुपी आशीर्वाद दया असे आवाहन खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी याप्रसंगी केले. पंकजाताई मुंडे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासाठी अभूतपूर्व विकास निधी आणला होता, आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, बीडकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण व सर्वसमावेशक विकासाला गती देण्यासाठी पंकजाताई मुंडे यांना संसदेत पाठवायच आहे, याकरिता एकजुटीने आपल्या सर्वांचे आशीर्वाद पंकजाताईंच्या पाठीशी उभे राहतील, पंकजाताईंना उमेदवारी जाही

ऊस तोडणी ला मजूर पाठवतो म्हणून ऊसतोड मुकादमाला आठ लाखाला घातला गंडा

इमेज
  ऊस तोडणी ला मजूर पाठवतो म्हणून ऊसतोड मुकादमाला आठ लाखाला घातला गंडा परळी वैजनाथ, प्रतिनिधी          ऊस तोडणीसाठी मजूर पुरवतो म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील एका जणाने परळी तालुक्यातील ऊसतोड मुकदमाला तब्बल आठ लाख रुपयाला गंडा घातल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.           याबाबत ग्रामीण पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी बबन सुदाम कदम वय-49 वर्षे व्यवसाय-ऊस तोड मुकादम रा-नंदागौळ ता- परळी यांनी आरोपी विष्णु उकंडा राठोड वय-29 वर्ष रा-वनवारला ता-पुसद जि-यवतमाळ याच्याशी करार केला होता. आरोपीने फिर्यादी व साक्षीदाराकडून कास्खाण्याला ऊस तोडणीसाठी मजुर पुरवतो असे म्हणुन विश्वासाने 800000/रु (आठ लाख रु) घेतले.पैसे घेऊनही ऊस तोडणीसाठी मजुर पुरवले नाही व फिर्यादीचे पैसे वापसही दिले नाही. त्यामुळे फिर्यादी व साक्षीदार यांचा त्याने विश्वासघात केला म्हणून पोलीस स्टेशन परळी ग्रामीण येथे आरोपीविरुद्ध गुरन. कलम-84/2024 कलम-406 भादवी प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास पोह केकाण हे करीत आहेत. 

दुखःद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
  भाजपाचे ज्येष्ठ नेते कमलाकर हरेगावकर यांचे अल्पशा आजाराने निधन परळी वैजनाथ/प्रतिनिधी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक कमलाकर (तात्या) हरेगावकर यांचे आज बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मृत्यू समयी ते 65 वर्ष वयाचे होते. गुरुकृपा नगर येथील रहिवासी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक कमलाकर सोपानराव हरेगावकर यांचे आज सकाळी आठ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. अत्यंत मनमिळाऊ व सुस्वभावी असल्याने ते सर्व परिचित होते. नगरसेवक पदाच्या कार्यकाळात त्यांनी विविध विकास कामे केली होती. वीरशैव समाजाच्या विविध धार्मिक सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रिय असत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, जावई, तीन भाऊ, एक बहीण, नातवंडे असा परिवार आहे.  कमलाकर हरेगावकर यांच्या पार्थिवावर सायंकाळी सार्वजनिक स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

इमेज
  महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग! फेसबुकवरची मैत्री परळीतील गृहिणीली आली अंगलट: ब्लॅकमेलिंग, शारिरीक संबंध, मारहाण ते जीवे मारण्या पर्यंतची फरफट:गुन्हा दाखल परळी वैजनाथ प्रतिनिधी फेसबुक वरची मैत्री आपल्या कधीही अंगलट येऊ शकते विशेषतः फेसबुक वापरणाऱ्या महिलांनी याबाबतीत काळजी घेणे अत्यंत आवश्यक असून फेसबुक वरून मैत्री करून अनेक जण महिलांना आपल्या जाळ्यात ओढतात व त्यानंतर जे घडते ते अंगावर काटे आणणारे असते असाच काहीसा प्रकार परळी शहरातील एका गृहिणी सोबत घडला असून याप्रकरणी या महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाख दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे         पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, परळी वै येथील शारदानगर भागातील 32 वर्षिय गृहिणी महिलेने फेसबुकवर  झालेल्या मैत्रीनंतरआपल्यावर बेतलेल्या प्रसंगाबाबत बीड येथील एका आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. यातील आरोपी अकबर बबन शेख वय 23 वर्षे रा. तेलगावनाका ईंदिरानगर बीड याने फिर्यादि महिलेशी फेसबुक अकाउन्टवर ओळख करुन घेतली. त्यानंतर सततच्या चॅटिंगमध्ये मैत्री पुढे गेली. विविध प्रकारची माह