पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र व्यवहार आणि जहाजबांधणी मंत्रालयामार्फत मदतीची नितांत गरज

 परळी तालुक्यातील इंजेगावचा युवक सिंगापूर- इंडोनेशिया दरम्यान जहाजातून  बेपत्ता !


तीन दिवस उलटले :पालक चिंताग्रस्त: कंपनीकडून अधिक माहितीसाठी समाधानकारक प्रतिसाद नाही

परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा...

         सध्या पुण्यात राहत असलेला मात्र  मुळ परळी वैजनाथ तालुक्यातील इंजेगावचा प्रणव कराड नावाचा तरुण जहाजावरुन बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये एका कंपनीच्या जहाजावर काम करत होता. मात्र आता तो अचानक बेपत्ता झाल्याची माहिती प्रणवच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारामुळे प्रणवचे कुटुंबीय फार चितेत आहेत.तसेच या संदर्भात अधिक माहितीसाठी कंपनीकडून माहितीसाठी समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची खंत चिंताग्रस्त असलेल्या कराड कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

           प्राप्त अधिक माहितीनुसार, विल्हेम्सन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड या कंपनीत प्रणव काम करत होता. कंपनीच्या जहाजावर प्रणव डेट कॅडेट म्हणून काम करायचा. गेल्या तीन दिवसांपासून प्रणव बेपत्ता असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. मुंबईतल्या कंपनीने प्रणवचा शोध सुरू केला आहे. मात्र प्रणव बेपत्ता असल्याची माहिती दिल्यानंतर आतापर्यंत मुंबईतील कंपनीने कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही, असं त्याचे वडिल गोपाळ कराड यांनी सांगितले आहे.  

      मुळ परळी तालुक्यातील इंजेगावचे कराड कुटुंब सध्या पुण्यातील वारजे परिसरात राहते. प्रणव कराड हा गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईतील विल्हेलम्सन शिप मॅनेजमेंट इंडिया या कंपनीत नोकरीला आहे. याप्रकरणी गोपाळ कराड यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 22 वर्षीय प्रणव शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. जेव्हा तो बेपत्ता झाला तेव्हा तो सिंगापूर आणि इंडोनेशिया दरम्यान प्रवास करणाऱ्या टँकर जहाजावर तैनात होता. शुक्रवारी फोन करुन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या कुटुंबाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर कंपनीने मेल करुन प्रणवच्या घरच्यांना याबाबत कळवलं.

          प्रणवने एमआयटी, पुणे येथून नॉटिकल सायन्सचा अभ्यास पूर्ण केला होता आणि तो विल्हेल्मसन शिप मॅनेजमेंटमध्ये काम करत होता. तो रिझोल्व्ह II जहाजावर डेक कॅडेट म्हणून तैनात होता. गुरुवारी, आम्हाला जहाजवरील अधिकाऱ्यांकडून फोन आला आणि नंतर शुक्रवारी एक ईमेल आला की सिंगापूर आणि इंडोनेशिया दरम्यान प्रणव जहाजातून बेपत्ता झाला होता," अशी माहिती गोपाळ कराड यांनी दिली.

        कंपनी आम्हाला सांगत आहे की शोध सुरू आहे पण तो कसा बेपत्ता झाला याबद्दल अधिक काही माहिती नाही. गुरुवारी आम्ही त्याच्याशी व्हॉट्सॲप कॉलवर बोललो. कंपनी त्याच्यासोबत काम करणाऱ्या इतरांचे कोणतेही मोबाईल क्रमांक देण्यास नकार दिला आहे. पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र व्यवहार आणि जहाजबांधणी मंत्रालयापर्यंत पोहोचण्यात आम्हाला मदत करण्यासाठी आम्ही पुणे आणि मुंबईतील पोलीस आणि इतर प्राधिकरणांशी संपर्क साधत आहोत," असेही गोपाळ कराड म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !