इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

संत बाळूमामा मंदिराच्या सप्ताहास भेट

 पंकजा मुंडेंनी चाकरवाडीत केली सेवा,माऊलींचे दर्शन व घेतले आशिर्वाद !




माऊलींचे घेतले दर्शन ; कारेगावच्या संत बाळूमामांच्या सप्ताहात घेतला कीर्तन श्रवणाचा लाभ


केज ।दिनांक ०८। 

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या साधेपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आला. श्रीक्षेत्र चाकरवाडीत माऊलींचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी स्वतःच्या हाताने महापंगतीतील भाविकांना प्रसाद वाटप केला, त्यांच्या या कृतीने उपस्थित भाविक मात्र भारावून गेल्याचे पहायला मिळाले. 


   लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने पंकजाताई मुंडे यांचा सध्या जिल्हाभरात दौरा करत आहेत. आज सोमवती अमावस्यानिमित्त परळीतील व्यापाऱ्यांच्या वतीने चाकरवाडीत महापंगत ठेवण्यात आली होती. पंकजाताई मुंडे आज बीडमध्ये होत्या, प्रचारातून वेळ काढून त्या श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे पोहोचल्या. सर्वप्रथम त्यांनी संत माऊली महाराजांचे दर्शन घेतले. मंदिर संस्थानच्या वतीने महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी त्यांचं यावेळी स्वागत केलं. यानंतर पंकजाताईंनी लगेच महापंगतीत जाऊन भाविकांना  स्वतःच्या हाताने प्रसाद वाटप केला, त्यांचा हा साधेपणा पाहून उपस्थित भाविक भारावून गेल्याचे पहायला मिळाले.


संत बाळूमामा मंदिराच्या सप्ताहास भेट

----- 

मौजे कारेगव्हाण येथे  सुरु असलेल्या संत बाळूमामा मंदिर सप्ताहास पंकजाताई मुंडे यांनी आज भेट दिली. याठिकाणी व्याकरणाचार्य ह.भ.प. अर्जुन महाराज लाड गुरूजी यांच्या  कीर्तन श्रवणाचाही त्यांनी लाभ घेतला तसेच  उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!