मतदान करणे हाच लोकशाहीचा आत्मा आहे -प्रा.डी.बी गायकवाड

 मतदान करणे हाच लोकशाहीचा आत्मा आहे -प्रा.डी.बी गायकवाड 


परळी प्रतिनिधी ---जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये शासनाच्या परिपत्रकानुसार मतदान जनजागृति मोहिमे संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक डी बी गायकवाड यांनी मतदान करणे हाच लोकशाहीचा आत्मा आहे  असे मत प्रतिपादन केले या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डी के आंधळे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.जे व्हि.जगतकर इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. व्हि.जे चव्हाण यांची उपस्थिती होती. यापुढे बोलताना प्रमुख पाहुणे प्रा. गायकवाड यांनी मतदानाद्वारे लोकशाही शासन व्यवस्था मजबूत करता येते. तसेच मतदानाच्या माध्यमातून नागरिकास हवा तो राजकीय पक्ष सत्तेत आणता येतो ,अर्थात हवी ती विचारधारा राजकीय सत्तेच्या माध्यमातून अमलात आणता येते, मतदानाकडे दुर्लक्ष करणे लोकशाहीचा अपमान आहे ही राजकीय उदासीनता लोकशाहीसाठी घातक आहे म्हणून आपल्या आवडीचे सरकार व विचारधारा प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे .मतदानाच्या माध्यमातून वैचारिक क्रांती होऊ शकते .जोपर्यंत देशातील पांढरपेशी, बुद्धीजीवी वर्ग मतदानाबाबत स्वतः जागृत आणि इतरांना जागृत करणार नाही तोपर्यंत या क्रांतीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे असे मत या प्रसंगी व्यक्त केले .त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे व उपप्राचार्य प्रा.डी के आंधळे यांनी मतदानाच्या बाबतीत घटनात्मक तरतुदीवर प्रकाश टाकून प्रत्येक नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे असे मत प्रतिपादन केले. त्याचबरोबर विद्यार्थी आणि प्राध्यापकांना निवडणूक मार्गदर्शिका या संदर्भात विस्तृत माहिती दिली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर जे चाटे तर आभार प्रा. मोकळे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !