महातपुरीत पाण्याच्या मोटार काढण्यावरून राडा!

 महातपुरीत पाण्याच्या मोटार काढण्यावरून राडा! 

अख्ख्या गावाने पाच तास रोखला तहसिलदारांचा ताफा  

आ.सोळंकेंनी मध्यस्थी करून तहसीलदारांना काढले सुखरूप बाहेर 



माजलगाव प्रतिनिधी दि.10


तालुक्यातील महातपुरी सुलतानपूर

येथील गोदावरी नदीवर पाणी उपश्यासाठी बसवलेल्या मोटार काढण्यावरून गावकरी आणि तहसीलदारात बुधवार दि 10 रोजी पहाटे मोठा राडा झाला.यादरम्यान आख्या गावाने एक होत सुमारे पाच तास तहसीलदाराचा ताफा रोखून धरला होता.या आणीबाणीच्या प्रसंगी आ.प्रकाश सोळंके यांनी गावकऱ्याची समजूत काढत मध्यस्थी करून तहसीलदारांना सुखरूप बाहेर काढले.


गतवर्षी पावसाळा कमी झाल्याने जिल्ह्यात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची जपवनुक करण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यातच शेतीसाठी नदीकाठ गंगा काठावरून केला जाणारा पाण्याच्या उपशावरही नियंत्रण ठेवणे सुरू केले आहे.याच कामासाठी माजलगावच्या तहसीलदार वर्षा मनाळे आपल्या ताफ्यासह महादपुरी  येथे गंगा काठी गेल्या होत्या.यावेळी त्यांनी नदीवर असणाऱ्या विद्युत मोटरी काढण्यासाठी सुरुवात केली.

दरम्यान या बाबीचा गावकऱ्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. दिवस-रात्र नदीतून होणारा वाळू उपसा आपल्याला दिसत नाही. मात्र शेतकरी आपल्या शेतीसाठी थोडं पाणी घेत असल तर आपण आडवे येता.वाढता विरोध होत असल्याने तहसीलदारांनी पोलिसांचा मोठा फौज फाटा यावेळी बोलावून घेतला.विरोध होत असल्याने पोलिसांकडून काही वयोवृद्ध शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली अशी माहिती येथील उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितली.यामुळे गावकऱ्यात आणि तहसीलदारात मोठा वाद निर्माण झाला.पहाटे 6 वाजल्या पासून महिला पुरुष आबालवृद्ध गावकऱ्यांनी तहसीलदारांच्या गाडीला गोदा पात्रातच अडवून धरले होते.यावेळी मोठा राडा सुरू झाला.दरम्यान या घटनेची माहिती आ.प्रकाश सोळंके यांना होतात ते घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी गावकऱ्यांची समजूत काढली.व मध्यस्थी करत तहसीलदारांना बाहेर काढले.



सुशील सोळंके,जयदत्त नरवडे यांची मध्यस्थीची भूमिका ठरली महत्त्वाची 


तहसीलदारांनी गोदापात्रात सुमारे 30 ते 40 विद्युत मोटर जप्त करण्याची कार्यवाही चालू होती. अगोदरच शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत आहे.ही बाब लक्षात घेता पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशील सोळंके व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरली. तहसीलदारांना विनंती केली. प्रसंगी कठोर ही झाले.

परंतु ते ऐकत नसल्याचे पाहून आमदारांना फोन केला.व शेतकऱ्यांच्या जप्त होणाऱ्या मोटार वाचवल्या.त्यामुळे येथील शेतकरी वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !