निवडणूक सोपी करण्याचं कोष्टी, बंजारा समाज बांधवांनी दिलं पंकजाताईना वचन

 पंकजाताई मुंडेंनी वडवणी शहर पिंजून काढलं

तुमचं प्रत्येक मत हे माझ्यासाठी वचन ; सर्व घटकांचा विकास हेच माझं ध्येय

निवडणूक सोपी करण्याचं कोष्टी, बंजारा समाज बांधवांनी दिलं पंकजाताईना वचन


वडवणी ।दिनांक ०७।

तुमचं प्रत्येक मत हे माझ्यासाठी वचन असणार आहे, समाजातील वंचित, पीडितांसह सर्व समाज घटकांचा विकास करणं हे ध्येय ठेवून मी काम करत आहे. लोकनेते मुंडे साहेब जिथपर्यंत पोचले होते, तिथपर्यंत जाण्याची संधी मला आपल्या आशीर्वादाने मिळणार आहे. या संधीचा उपयोग जिल्हयासाठीच होणार असल्याने मला आपले आशीर्वाद द्या असं आवाहन भाजपा राष्ट्रीय सचिव तथा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज इथे केलं.


    लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार दौरा करत असतांना पंकजाताई मुंडे यांनी आज वडवणी शहर पिंजून काढले. चौपदरा तांडा येथे बंजारा आणि चौंडेश्वरी मंगल कार्यालयात कोष्टी समाज बांधवांशी संवाद साधत त्यांनी शहरातील विविध समाज घटकातील नागरिकांच्या भेटी घेतल्या व संवाद साधला. 


  नागरिकांसमोर बोलताना पंकजाताई म्हणाल्या,  आतापर्यंत मी लोकनेते मुंडे साहेब, खासदार डाॅ.प्रितमताई, रजनीताई पाटील यांच्यासाठी मतं मागितली. आता पहिल्यांदाच स्वतःसाठी मत मागायला आले आहे. इथं फक्त तेवढ्यासाठीच आले नाही तर तुमचं प्रत्येक मत हे माझेसाठी वचन असेल. सत्तेचा उपयोग मी जिल्हयाच्या विकासासाठीच केला. रेल्वे, राष्ट्रीय महामार्गा बरोबरच  अगदी तांडयापर्यत रस्ता आणला. प्रत्येक गावात सभागृह, नळ योजना, २५१५ तून मुलभूत सोयी केल्या. विविध योजना राबवून सर्व सामान्य माणसाचे कष्ट कमी व्हावेत यासाठी प्रयत्न केला. ऊसतोड मजूरांना ऐतिहासिक ३४ टक्के दरवाढ केली. माझा विकास पोचला नाही असं एकही गाव  नाही. त्यामुळे या निवडणूकीत मला आपले विजयरूपी आशीर्वाद द्या असं आवाहन पंकजाताईंनी यावेळी केले.


आम्ही सर्व मिळून निवडणूक सोपी करू


मुंडे साहेब जिथपर्यंत पोचले तिथपर्यंत जाण्याची संधी मला तुमच्या आशीर्वादाने मिळणार आहे. या संधीचा उपयोग जिल्हयाच्या विकासाला नक्कीच होईल असं पंकजाताई म्हणाल्या. निवडणूक अवघड आहे अशी चर्चा काही लोक करतात. खरचं आहे का निवडणूक अवघड? असा सवाल करताच उपस्थितांमधून अजिबात नाही असं उत्तर आलं. नागरिकांनी हात उंचावून 'ही निवडणूक अवघड नाही. तुम्हीच आम्हाला पाहिजेत. आम्ही सर्व मिळून ही निवडणूक सोपी करू असं अभिवचन त्यांना दिलं.


गांव भाग काढला पिंजून

------

पंकजाताई मुंडे यांनी शहरातील सर्व समाज घटकातील नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला. भावसार समाज महिला मंडळाच्या वतीने आयोजित श्री हिंगलाज माता प्रगटदिन उत्सवात त्यांनी सहभाग घेतला व महाआरती केली. यावेळी आमदार प्रकाशदादा सोळंके, माजी आमदार केशवराव आंधळे, रमेश आडसकर, राजाभाऊ मुंडे, भारत जगताप, बन्सीधर मुंडे, सुधीर ढोले, नवनाथ मेहत्रे, कचरू झाडे, गुरूप्रसाद गुरसाळी, अंकुश वारे आदी उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !