माहेरी आलेल्या लेकीसारखं ग्रामस्थांनी केलं उत्स्फूर्त स्वागत

 पंकजाताई मुंडेंनी गुढीपाडवा साजरा केला धनगरवाडीतील ऊसतोड मजूरांसोबत


बीड जिल्हयाच्या अतिउज्ज्वल भविष्याचा इतिहास होण्याचा केला संकल्प



माहेरी आलेल्या  लेकीसारखं ग्रामस्थांनी केलं उत्स्फूर्त स्वागत


बीड।दिनांक ०९।

भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज धनगरवाडी (ता. शिरूर) येथील ऊसतोड मजूर बांधवांसोबत गुढी पाडवा सण मोठया आनंदात आणि उत्साहवर्धक वातावरणात साजरा केला. माहेरी आलेल्या लेकीसारखं गावातील महिलांनी अतिशय थाटात त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं.


   चैत्र शुध्द प्रतिपदा अर्थात मराठी नववर्षाच्या सुरवातीला येणाऱ्या गुढी पाडवा सणाला विशेष महत्त्व असते. पंकजाताई मुंडे सध्या जिल्हयात ठिकठिकाणी प्रचार दौर्‍यावर असून ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. आजचा गुढी पाडवा सण कष्टकरी जनतेसोबत साजरा करावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. या उद्देशाने त्यांनी शिरूर कासार तालुक्यातील धनगरवाडी येथील ऊसतोड मजूरांसोबत साजरा गुढी पाडवा साजरा केला. 


ग्रामस्थांनी केलं लेकीचं जंगी स्वागत

------

धनगरवाडीत आगमन होताच पंकजाताईंचं ग्रामस्थांनी वाजतगाजत जंगी स्वागत केलं. माहेरी आलेल्या लेकींचं जसं स्वागत होतं अगदी तसं स्वागत महिलांनी त्यांचं औक्षण करून  केलं. विधिवत पूजन करून वस्तीत त्यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.


मी बीडच्या अतिउज्ज्वल भविष्याचा इतिहास होईल

-----

ज्या गावात कष्टकरी लोकं राहतात, जे नव्वद- पंच्यान्नव टक्के मतदान करतात अशा लोकांसोबत सण साजरा करावा हे मी ठरवले होते. इथं ग्रामस्थांनी माझं जोरदार स्वागत केलं, त्यांच्यासमवेत भोजनही केलं, त्यांच्याशी संवादही साधला. आजच्या गुढी पाडव्याच्या दिवशी मी एकच संकल्प केला आहे, तो म्हणजे मी बीड जिल्हयाच्या अतिउज्ज्वल भविष्याचा इतिहास होईल असं पंकजाताई यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.


रस्त्यात ठिक ठिकाणी स्वागत

‌------

बीडहून निघाल्यावर पंकजाताई मुंडे यांचं रस्त्यात ठिक ठिकाणी वाहनाचा ताफा थांबवून ग्रामस्थांनी स्वागत केलं. हिवरसिंगा, येवलवाडी याठिकाणीही त्यांचं स्वागत झालं. भानकवाडी येथे संत श्री बाळुमामा मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले तसेच अखंड हरिनाम सप्ताहाला भेट देऊन भाविकांशी संवाद साधला.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार