दुखःद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली

 भाजपाचे ज्येष्ठ नेते कमलाकर हरेगावकर यांचे अल्पशा आजाराने निधन




परळी वैजनाथ/प्रतिनिधी

भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक कमलाकर (तात्या) हरेगावकर यांचे आज बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मृत्यू समयी ते 65 वर्ष वयाचे होते.

गुरुकृपा नगर येथील रहिवासी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक कमलाकर सोपानराव हरेगावकर यांचे आज सकाळी आठ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. अत्यंत मनमिळाऊ व सुस्वभावी असल्याने ते सर्व परिचित होते. नगरसेवक पदाच्या कार्यकाळात त्यांनी विविध विकास कामे केली होती. वीरशैव समाजाच्या विविध धार्मिक सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रिय असत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, जावई, तीन भाऊ, एक बहीण, नातवंडे असा परिवार आहे.  कमलाकर हरेगावकर यांच्या पार्थिवावर सायंकाळी सार्वजनिक स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार