इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

परळीत आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल

 परळीत आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

    परळीत बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शाळकरी मुलींच्या अपहरणाच्या घटनाही घडलेल्या आहेत महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दररोज पोलीस ठाण्यात नोंद होताना दिसून येत आहे आज पुन्हा एकदा एका महिलेने आपल्यावर सातत्याने शारीरिक अत्याचार करण्यात आले व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली या आशियाची फिर्याद दाखल केल्यावरून एका जणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, शहरातील शिवनगर, वडर कॉलनी  येथील मोलमजुरी करणाऱ्या एका गृहिणीने आपल्यावर सातत्याने अत्याचार करण्यात आल्याची फिर्यादी पोलिसात दाखल केली आहे.यातील फिर्यादी व आरोपी हे एकमेकाना ओळखत असून आरोपी व फिर्यादी अधून-मधून बोलत असत. नंतर आरोपी हा फिर्यादीस मला तूझ्या सोबत शारीरीक संबंध ठेवायचे आहेत असे म्हणत असे, नकार दिल्यास तूझ्या मूलांना मारून टाकीन अशी धमकी देवू लागला, त्यानंतर दिनांक 30/03/2024 रोजी सकाळी 11.00 वा. सुमारास फिर्यादी घरी एकटीच असताना आरोपीने घरी येवून फिर्यादीसोबत जबरदस्तीने बलात्कार केला व त्यानंतर दिनांक 03/04/2024 रोजी रात्री 09.30 वा. आरोपी फिर्यादीचे घरासमोर येऊन तु माझा फोन का उचलत नाहीस असे म्हणून घरावर दगड मारुन शिवीगाळ करुन जिवे मारणेची धमकी दिली.या फिर्यादीवरुन आरोपी विरुद्ध गुरनं.--56/2024 कलम 376,504,506 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोउपनी शेटे हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!