राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, बीडमधून पुन्हा बजरंग सोनवणे

 राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, बीडमधून पुन्हा बजरंग सोनवणे






मुंबई : शरदचंद्र पवार गटाची बहुप्रतिक्षित दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये बीडमधून पंकजा मुंडे यांच्याविरोधात पुन्हा एकदा बजरंग बप्पा सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर भिवंडीवर काँग्रेसने अखेरपर्यंत दावा करूनही ही जागा मिळविण्यात शरद पवार गटाने बाजी मारली. या जागेवरून बाळ्यामामा म्हात्रे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याविरोधात म्हात्रे दोन हात करतील.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने याआधी पहिल्या उमेदवारी यादीत पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली होती. गुरुवारी पक्षाने दुसरी यादी जाहीर केलेली असून बीड आणि भिवंडीच्या जागेवर उमेदवार जाहीर केलेले आहेत



राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने याआधी पहिल्या उमेदवारी यादीत पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली होती. बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, नगर दक्षिणमधून निलेश लंके, दिंडोरीमधून भास्करराव भगरे गुरूजी तर वर्ध्यातून अमर काळे यांना पक्षाने उमेदवारी दिलेली होती. गुरूवारी पक्षाने आणखी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली असली तरी सातारा आणि माढ्यामधून पक्षाने उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात खेचाखेची

महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून तिन्ही पक्षांत तिढा आहे तर काही जागांवर पक्षांना उमेदवार मिळत नाहीयेत. सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागांसाठी ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात खेचाखेची सुरू आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले आहेत.
माढ्यात पवारांचा उमेदवार कोण असणार?

धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाचा निर्णय होत नसल्याने तसेच महादेव जानकर महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर शरद पवार गटाचा माढ्याबाबतीत निर्णय होत नाहीये. दुसरीकडे संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी माढा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा आहे. शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार