प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कारवाया

 परळी पोलिस ॲक्शन मोडमध्ये !

कोम्बिग ऑपरेशन राबवत फरार 18 आरोपी ताब्यात;तीन तलवारी जप्त 

परळी (प्रतिनिधी)

 परळी शहर,संभाजीनगर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या वतिने शुक्रवारी (दि.5 एप्रिल) रात्री लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यात गस्त घालुन ठिकठिकाणी तपासणी करण्यात आली.यामध्ये विविध गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या 18 आरोपींना ताब्यात घेण्याबरोबरच तीन तलवारी व हातभट्टी दारु अड्डयावर छापा टाकत गुन्हे दाखल केले.

 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळी पोलिस ॲक्शन मोडमध्ये असुन शुक्रवार दि.5 एप्रिल रोजी रात्री 11 ते पहाटे 4 या वेळेत परळी शहरासह तालुक्यात पोलिस उपाधिक्षक चोरमले,परळी शहर पोलिस ठाण्याचे पोनि.संजय लोहकरे,संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोनि उस्मान शेख,ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोनि मनिष पाटिल यांच्यासह 23 कर्मचारी व आरसीपी ची एक प्लॅटुन अशा फोजफाट्यासह संयुक्त कारवाई करण्यात आली.यात  विविध गंभीर गुन्ह्यातील दोन वर्षांपासुन फरार असलेल्या 18 आरोपीसह टोकवाडी,फुलेनगर या भागातुन तीन तलवारी जप्त करण्यात आल्या.गंगासागर नगर भागात सुरु असलेल्या हातभट्टी अड्डयावर छापा टाकत 2200 रुपयांचे रसायन जप्त करत एकास अटक केली.परळी पोलिसांच्या या कोबिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या