प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

स्थानिक नेते, कार्यकर्ते लागले कामाला

 पंकजाताई मुंडेंना लोकसभेत पाठविण्यासाठी पालकमंत्री, आमदारांच्या गावोगावी बैठका



स्थानिक नेते, कार्यकर्ते लागले कामाला


सुक्ष्म प्रचार यंत्रणा राबवून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार


बीड।दिनांक ०७।

लोकसभा निवडणूकीसाठी येत्या १३ मे रोजी मतदान होत आहे. तब्बल २१ लाख १५ हजारे ८१३ इतके मतदान असलेल्या बीड जिल्ह्यात भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना भाजप महायुतीने बीड लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर पालकमंत्र्यांसह भाजप महायुतीचे सर्व आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष आदी नेत्यांसह महायुतीचे तालुका व गावपातळीवर काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. पंकजाताईंना विक्रमी मतांनी निवडून देत लोकसभेत मान-सन्मानाने  पाठवण्याचा निर्धार सर्व जण विविध ठिकाणी बोलून दाखवत आहेत.


 सध्या पंकजाताई मुंडे यांनी नुकताच प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण करून दुसरा टप्पा सुरू केला आहे. गावोगावी महायुतीचे कार्यकर्ते तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांचेसह आमदार सुरेश धस, आ. प्रकाश सोळंके, आ. लक्ष्मण पवार, आ. बाळासाहेब आजबे, आ. नमिता मुंदडा, माजी आमदार केशवराव आधळे, भीमराव धोंडे, अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुखांसह  नेते मंडळी पंकजाताईंच्या प्रचारार्थ आपल्या बुथ पातळीवर  अधिकाधिक मतदान मिळवून देण्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. 


   यापूर्वी राज्य मंत्रीमंडळात स्वत:ची छाप पाडणारे काम करत जनमानसात दिवगंत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे विचार कायम ठेवणार्‍या पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल जिल्ह्यातील भाजप-महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदरभाव आहे. आता लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने पंकजाताईंना मोठ्या मताधिक्क्यांनी निवडून आणायचेच, असा निर्धार महायुतीचे कार्यकर्ते करु लागले आहेत. प्रत्येकाने आप-आपला बुथ सांभाळायचा, अन् अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचून महायुतीची विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहचवायची असे नियोजन सर्व बुथप्रमुख करु लागले असून आगामी एक महिन्यात कटाक्षाने प्रचारयंत्रणा सक्षम ठेवतानाच नवीन आणि यंदा पहिल्यांदाच मतदान करणार्‍या मतदारांपर्यंत संपर्क साधून भाजप-महायुतीचे कार्यकर्ते ‘मोदी सरकार’ची कार्यप्रणाली आणि धोरणे त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचे काम करण्यास सज्ज झाली आहे.

याबरोबरच मागील दहा वर्षात केद्रांतील भाजप-एनडीए सरकारने गोरगरिब, वंचित, उपेक्षित कष्टकरी, कामगार यांच्यासाठी राबवलेल्या विविध योजना अन् त्यातून लाभ मिळालेल्या नागरिकांची भावना किती चांगली आहे, याबाबतचे सुक्ष्म नियोजन करत महायुतीचे सर्व कार्यकर्ते गावोगावी सरकारचे हे काम मतदारांपर्यंत पोहचवत आहेत. पंकजाताईंना विक्रमी मतांनी निवडून देत केंद्रात पुन्हा एकदा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘अब की बार ४०० सो पार’ चा नारा देतांना दिसत आहेत.   गाव-वाडी-वस्ती-तांड्यापर्यत  पोहचून पंकजाताईंना मतदान करण्याचे आवाहन कार्यकर्ते करत आहेत.

••॰••॰••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या