संतश्री रानबा महाराज मंदिर येथे आज गुढीपाडवा उत्सवाचे आयोजन


नववर्षानिमित्त पूजा व आरती; प्रसादाचेही होणार वितरण



परळी वैजनाथ/प्रतिनिधी

परळी वैजनाथ येथील संत श्री रानवा महाराज मंदिर येथे आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता हिंदू धर्मियातील नववर्ष गुढीपाडवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त संत श्री रानबा महाराज यांची विधिवत पूजा व आरती होणार असून सकाळी दहा वाजता भाविक भक्तांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत श्री रानबा महाराज मंदिर ट्रस्टचे श्री ज्ञानेश्वर खर्डे व श्री रामेश्वर खर्डे यांनी  केले आहे.


प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी परळी वैजनाथ येथील पंचायत समिती समोर असलेले संत श्री रानबा महाराज यांचे मंदिर आहे. गुढीपाडवा नववर्षानिमित्त संत श्री रामभाऊ महाराज मंदिर फुलांनी सजविण्यात आले आहे. या ठिकाणी संत श्री रानबा महाराज यांची विशेष महापूजा व आरती सकाळी नऊ वाजता होणार आहे. त्यानंतर खिचडी प्रसाद भाविकांना वाटप केला जाणार आहे. या कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री ज्ञानेश्वर खर्डे ,रामेश्वर खर्डे, पांडुरंग खर्डे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार