प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

महाविजय २०२४ : पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या बीड लोकसभा जिल्हा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ व बीड मतदारसंघ कार्यकर्ता बैठक

 महाविजय २०२४ : पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या बीड लोकसभा जिल्हा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ व बीड मतदारसंघ कार्यकर्ता बैठक


बीड,प्रतिनिधी....

         ३९ बीड लोकसभा निवडणुक भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपिनाथराव मुंडे यांच्या हस्ते बीड लोकसभा जिल्हा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आज शुक्रवार दि.५ एप्रिल २०२४ रोजी करण्यात येणार आहे.तसेच बीड मतदारसंघ कार्यकर्ता बैठक होणार आहे.यावेळी खा. डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. 

      आज शुक्रवार दि.५ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वा. संचेती बिल्डींग, एम.एस.ई.बी. कार्यालयासमोर, जालना रोड, बीड येथे पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते बीड लोकसभा जिल्हा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ  करण्यात येणार आहे. यावेळी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेना नेते अनिल जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे,सचिन मुळूक,रिपाई नेते पप्पू कागदे आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजप महायुती प्रचार समितीने केले आहे.


• बीड मतदारसंघ कार्यकर्ता बैठक


     दरम्यान जिल्हा प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर  पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बीड मतदार संघातील सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, सुपर वॉरियर्स, जिल्हा, तालुका पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते, नगरसेवक, जि.प. सदस्यसरपंच, उपसरपंच तथा सर्व भाजप सक्रिय कार्यकर्त्यांची महत्वपुर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. कै. तुकाराम गुरूजीनगर, मस्के कन्स्ट्रक्शन प्लांट, चऱ्हाटा रोड, बीड येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, बीड विधानसभा निवडणुक प्रमुख, व प्रचार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या