चेअरमन विनोद सामत यांना वाढदिवसानिमित्त शुभ आशीर्वाद

 वैद्यनाथ अर्बन बँकेची राज्यभरात  भरभराट होईल- नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
      राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रात अव्वल असलेल्या  परळीच्या वैद्यनाथ अर्बन बँकेने सभासद , खातेदार व ठेवीदारांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. बँकेच्या आजपर्यंतच्या  नेतृत्वाने , व चेअरमन संचालक मंडळ ,अधिकारी, कर्मचारी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे वैद्यनाथ अर्बन बँक राज्यात अग्रेसर असून या बँकेची प्रगती यापुढे होणार आहे असा आशीर्वाद सोनपेठ श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी दिले. सामान्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी या बँकेने प्रयत्न केले आहे यापुढे करावेत अशी अपेक्षा ही शिवाचार्य महाराजांनी व्यक्त केली.                   

              
       श्री  नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांनी शनिवारी वैद्यनाथ अर्बन बँकेच्या मुख्य शाखेस भेट दिली याप्रसंगी त्यांनी बँकेच्या कामकाजाची माहिती घेतली व बँकेचे चेअरमन विनोद सामत यांना वाढदिवसानिमित्त शुभ आशीर्वाद दिले .यावेळी बँकेच्या वतीने नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांचे स्वागत करण्यात आले .यावेळी आपल्या मनोगतातून बँकेच्या संचालिका सुरेखाताई मेनकुदळे यांनी वैद्यनाथ अर्बन बँकेच्या प्रगतीचा चढता आलेख मांडला यावेळी श्री वैद्यनाथ अर्बन बँकेचे उपाध्यक्ष रमेश कराड,संचालक अनिल तांदळे ,महेश्वर निर्मळे , कार्यकारी संचालक विनोद खर्चे, सर व्यवस्थापक एसपी खंदाडे, परळीचे शाखा व्यवस्थापक दिनेश बरदाळे,उत्तमराव जोशी, देशमाने मॅडम, सामाजिक कार्यकर्ते भिमराव सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे केज चे तालुकाध्यक्ष विष्णू चाटे, दीनदयाळ बँकेचे  संचालक सल्लागार महादेवअप्पा ईटके , अश्विन मोगरकर विकास हालगे ,नितीन समशेट्टे ,सुशील हारंगुळे ,संतोष पवार,श्री खके ,लोकमतचे प्रतिनिधी संजय खाकरे, सकाळचे प्रतिनिधी प्रा. प्रवीण फुटके, सामनाच्या प्रतिनिधी स्वानंद पाटील ,आडत व्यापारी विजय गिरी रामेश्वर काळे ,माऊली कांदे.गोविंद मुंडे, यांच्यासह इतर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार