नारायण गडावरील बैठकीत मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केला होता विषय

शाळकरी मुलींची छेड प्रकरण ;दोन जण सिरसाळा पोलीसांच्या ताब्यात 

नारायण गडावरील बैठकीत मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केला होता विषय 


सिरसाळा  :  शाळेत जात येत असलेल्या मुलीला रस्त्यात गाठून छेड काढणाऱ्या करेवाडीच्या  दोन रोमिओंना सिरसाळा पोलीसांनी आज (दि. ६ एप्रिल) रोजी ताब्यात घेतले आहे.त्यांच्यावरती कलम ३५४,३४१ भादवी व पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक १ एप्रिल रोजी घडल्याचे समजते आहे. काल मनोज जरांगे पाटील यांनी  नारायणगड येथे मराठा समाज बांधवांच्या झालेल्या बैठकीत छेडछाडीचा विषय मांडला होता .

         परळी तालुक्यात माझ्या समाजाच्या मुलींना त्रास दिला जातो, अन्याय केला जातो असे म्हणत या प्रकरणी पालकमंत्री यांनी लक्ष द्यायला हवे अन्यथा आम्ही परळीत घुसू असे जरांगे पाटिल यांनी वक्तव्य केले होते. यानंतर ह्या घटनेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सिरसाळा पोलीसांनी दोन आरोपींना आज ताब्यात घेतले असुन पुढील कार्यवाही सुरु आहे. अधिक तपास सह पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहिफळे करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !