नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पंकजाताईंना विक्रमी मताधिक्य देणारा

 पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ खा.प्रितम मुंडे यांच्या बर्दापूर, राडी गटात भेटीगाठी




नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पंकजाताईंना विक्रमी मताधिक्य देणारा


अंबाजोगाई - दि. ०२ --- भाजप महायुतीच्या उमेदवार तथा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ खा. प्रितमताई मुंडे यांनी बर्दापूर आणि राडी जिल्हा परिषद गटातील  नागरिकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. ग्रामीण भागातील तांडे, वाड्या-वस्त्यांचा शहरातील उच्चभ्रू वस्त्यांप्रमाणे विकास करणाऱ्या विकासाभिमुख नेतृत्वाला बहुमताने लोकसभेत पाठवण्यासाठी मतदानरुपी आशीर्वाद दया असे आवाहन खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी याप्रसंगी केले.

पंकजाताई मुंडे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासाठी अभूतपूर्व विकास निधी आणला होता, आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, बीडकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण व सर्वसमावेशक विकासाला गती देण्यासाठी पंकजाताई मुंडे यांना संसदेत पाठवायच आहे, याकरिता एकजुटीने आपल्या सर्वांचे आशीर्वाद पंकजाताईंच्या पाठीशी उभे राहतील, पंकजाताईंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, हा प्रतिसाद विक्रमी मताधिक्य देणारा आहे असा विश्वास याप्रसंगी खा. प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केला.

भाजपचे अंबाजोगाई तालुका अध्यक्ष अच्युत बापू गंगणे,अविनाश मोरे, गणेश कराड,श्यामराव आपेट,बिभीषन फड, विलास बापू मोरे, महादेव फड,विकास मोरे,सिद्धू मोरे, चिंचोळे बप्पा, सचिन फड, उत्तम जांभळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. दरम्यान दौरा आटोपून परळीकडे जाताना खा.प्रितमताई मुंडे यांनी सायगाव येथील प्रसिद्ध हजरत सय्यद सादिक अली शाह हुसेन दर्गाचे दर्शन घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !