मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये यांचा व्यवस्थापकीय संचालक डॉ पी अनबलगन यांचाकडून सत्कार

 महानिर्मितीची ऐतिहासिक विक्रमी ६१४३९ दशलक्ष युनिट्स वीज निर्मिती : परळी औष्णिक विद्युत केंद्राचे विशेष योगदान


मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये यांचा व्यवस्थापकीय संचालक डॉ पी अनबलगन यांचाकडून सत्कार


परळी / प्रतिनिधी


     राज्यात महानिर्मिती कंपनीकडून वीज उत्पादनात विक्रम प्रस्थापित करण्यात आला असुन या वर्षात महानिर्मितीने ऐतिहासिक विक्रमी ६१४३९ दशलक्ष युनिट्स वीज निर्मिती केली.यामध्ये परळी औष्णिक विद्युत केंद्राचे विशेष योगदान राहिले. या कामगिरीबद्दल मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये यांचा वरिष्ठांकडून सत्कार करण्यात आला.

        राज्यातील येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रांनी पुन्हा एकदा विक्रमी वीज उत्पादन केले असून एका आर्थिक वर्षात ६१४३९ दशलक्ष युनिट्स वीज उत्पादन केले आहे. याबद्दल महानिर्मिती च्या मुख्य कार्यालय मुंबई येथे औष्णिक विद्युत केंद्रांच्या मुख्य अभियंतांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये परळी वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये यांचाही सत्कार करण्यात आला.परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या वतीने विजनिर्मितीचे अनेक विक्रम केलेले आहेत.राज्यात विजनिर्मिती मध्ये हे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र अनेकवेळा प्रथम क्रमांकावर आहे. येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राने मागील २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४१०४.२६१दशलक्ष युनिट्स विक्रमी विजनिर्मिती केली आहे. त्याचबरोबर संच क्रमांक ६ एखदाही बंद न राहताञसतत १०९ दिवस सुरु ठेवण्यात आला. या विक्रमी विजनिर्मिती बदल महानिर्मितीच्या मुंबई येथील कार्यालयात येथील राज्यातील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे सर्व मुख्य अभियंता  यांचा सत्कार प्रातीनिधिक स्वरूपात करण्यात आला.यामध्ये परळीचे मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये यांचा वरिष्ठांकडून सत्कार करण्यात आला.

      यावेळी डॉ काठोये यांनी सांगितले की,  महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ पी अनबलगन , संचालक संजय मारुडकर, सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालय मुंबई आणि क्षेत्रीय मुख्य अभियंते यांच्या नेतृत्वात महानिर्मितीने जी ऐतिहासिक विक्रमी  वीज उत्पादन केले ते आमचे सर्वांचे टिमवर्क आहे. केंद्रातील अधिकारी,कर्मचारी, कंत्राटदार , प्रकल्पग्रस्त पी ए पी, कंत्राटी कामगार यांच्या सहकार्याने व अथक परिश्रमाने हे यश संपादन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !