प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

ऊस तोडणी ला मजूर पाठवतो म्हणून ऊसतोड मुकादमाला आठ लाखाला घातला गंडा

 ऊस तोडणी ला मजूर पाठवतो म्हणून ऊसतोड मुकादमाला आठ लाखाला घातला गंडा




परळी वैजनाथ, प्रतिनिधी
         ऊस तोडणीसाठी मजूर पुरवतो म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील एका जणाने परळी तालुक्यातील ऊसतोड मुकदमाला तब्बल आठ लाख रुपयाला गंडा घातल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
          याबाबत ग्रामीण पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी बबन सुदाम कदम वय-49 वर्षे व्यवसाय-ऊस तोड मुकादम रा-नंदागौळ ता- परळी यांनी आरोपी विष्णु उकंडा राठोड वय-29 वर्ष रा-वनवारला ता-पुसद जि-यवतमाळ याच्याशी करार केला होता.आरोपीने फिर्यादी व साक्षीदाराकडून कास्खाण्याला ऊस तोडणीसाठी मजुर पुरवतो असे म्हणुन विश्वासाने 800000/रु (आठ लाख रु) घेतले.पैसे घेऊनही ऊस तोडणीसाठी मजुर पुरवले नाही व फिर्यादीचे पैसे वापसही दिले नाही. त्यामुळे फिर्यादी व साक्षीदार यांचा त्याने विश्वासघात केला म्हणून पोलीस स्टेशन परळी ग्रामीण येथे आरोपीविरुद्ध गुरन. कलम-84/2024 कलम-406 भादवी प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास पोह केकाण हे करीत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या