मायेच्या हळव्या स्पर्शाने' समृद्ध नेतृत्व

 'मायेच्या हळव्या स्पर्शाने' समृद्ध नेतृत्व: ताई ,आम्ही आहोत; स्वतःला जप - पंकजाताईंना वयोवृद्ध महिलांचे भरभरून आशीर्वाद


बीड, प्रतिनिधी....

          पंकजाताई मुंडे यांना राजकीय जीवनात जनसामान्यांचा खंबीर आशीर्वाद, प्रेम ,साथ, सहकार्य नेहमीच मिळत आले आहे. परंतु इतर राजकीय नेत्यांपेक्षाही वेगळी अशा प्रकारची जिव्हाळा  माया व प्रेमाची समृद्ध श्रीमंती फक्त पंकजाताई मुंडे यांनाच सातत्याने अनुभवावयास मिळते याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात. बीड लोकसभेच्या प्रचारात असताना आज असाच काहीसा भाऊक परंतु अतिशय जिव्हाळ्याचा प्रसंग बघायला मिळाला.

             बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे या सध्या जिल्ह्यात दौरा करत असून जिल्ह्यातील गाव न गाव त्या पिंजून काढताना दिसत आहेत. पंकजाताईंना जाईल तिथे जनतेच्या निरपेक्ष प्रेम व मायेची साथ मिळतांना  दिसते. पंकजाताई मुंडे राज्यात कुठेही फिरत असताना असे जिव्हाळ्याचे प्रसंग अनेक वेळा  बघायला मिळतात. परंतु बीड जिल्ह्यातील जनतेच्या मनात आणि वागण्यात पंकजाताई मुंडे आल्यानंतर एक वेगळीच आत्मीयता व लेक आल्याचा आनंद बघायला मिळत असतो. असाच प्रसंग आज बघायला मिळाला. पंकजाताई मुंडे आज चाकरवाडी भागात प्रचारात असताना वयोवृद्ध महिलांनी त्यांची भेट घेतली.  अतिशय आत्मीयतेने व जिव्हाळ्याने आपल्या या लाडक्या लेकीचे स्वागत करत या वयोवृद्ध महिलांनी पंकजाताई मुंडे यांच्या गालावरून हात फिरवत त्यांची दृष्टही काढली. त्याचबरोबर आम्ही सगळे आहोत, तुम्ही स्वतःला जपा, काळजी करू नका, विजय आपलाच आहे अशा प्रकारचा आशीर्वादही या वयोवृद्ध महिलांनी पंकजाताई मुंडे यांना दिला. पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्याशी अतिशय आत्मियतेने व त्यांच्या व्यक्तिगत सुखदुःखाची चर्चा केली. ताईंचे चार शब्द ऐकताना डोळ्यात कौतुक आणि मनात आश्वासक भावना अशा प्रकारचे सुखावह चित्र या वृद्ध महिलांमध्ये बघायला मिळाले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार