शंभू महादेवाच्या वाघाच्या काठीची व कावडीची मिरवणूक

शंभू महादेवाच्या वाघाच्या काठीची व कावडीची मिरवणूक 



 परळी : शंभू महादेवाच्या वाघाच्या काठीची व कावडीची मिरवणूक येथील पद्मावती गल्लीतून जुन्या परळीत पारंपरिक मार्गावरून मंगळवारी सायंकाळी  वाजत-गाजत काढण्यात आली  आहे . 

         पद्मावती गल्लीतील  मठपती वाघेश विश्वंभर स्वामी यांनी सपत्नीक महादेवाच्या काठीची व कावडीची पूजा केली .यावेळी आरती करण्यात आली. साखरेच्या गाठीची माळ व पुष्पहार घालून व एकदा शंभूच्या नावाने बोला हर हर महादेव चा जयघोष करीत मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी मठपती संजय स्वामी ,दयानंद स्वामी ,धनंजय स्वामी, वाघेश स्वामी , अनिरुद्ध स्वामी, उद्योजक शेखर स्वामी, विनोद स्वामी, ओम स्वामी.  शिक्षक नेते श्री शिवलिंग स्वामी. आश्विन मोगरकर , दयानंद चौधरी, रमेश चौधरी, संदीप चौधरी, उमाकांत टाक यांच्यासह गणेशपार रोड, जंगमगल्ली , देशमुख गल्ली, अंबेवेस , पेठगल्ली मार्गे   मार्गे  ही काठी व कावड मिरवणूक रात्री देशमुख पारावरील देशमुख वाड्यात आली. यावेळी एकदा शंभूच्या नावाने बोला हर हर महादेव चा जयघोष चालू होता. 172 वर्षाची परंपरा या काठी व कावड मिरवणूकिस असून परळीच्या मठपती परिवाराच्या वतीने हा मिरवणूक सोहळा  दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित करण्यात येतो. 21फूट उंच काठी तळहातावर घेऊन खेळले जाते. यात शिवभक्त उत्साहाने सहभागी होतात.              परळीचे  वाघेश स्वामी हे पुणे येथे कंपनीत जॉबला असून दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी ते परळीत येतात. रियाज या देशात एक महिनाभर कंपनीच्या कामासाठी होते . परंतु ते आवर्जून परदेशातून परळीत महादेवाची काठी मिरवणूक  सोहळा असल्याने  दोन दिवसापूर्वी आले. त्यांच्या निवासस्थानी महादेवाच्या काठीची कावडाची पूजा करण्यात आली     .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार