पोस्ट्स

23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

शिवीगाळ व धक्काबुक्की: तुला उचलून घेऊन जातो म्हणत शेजारणीला धमकी;गुन्हा दाखल

इमेज
  शिवीगाळ व धक्काबुक्की: तुला उचलून घेऊन जातो म्हणत शेजारणीला धमकी;गुन्हा दाखल   परळी वैजनाथ  प्रतिनिधी...            घराशेजारी राहणाऱ्या एका 35 वर्षीय युवकाने एका महिलेला  शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्याचप्रमाणे वाईट हेतूने फिर्यादी महिलेचा हात धरून तुला उचलून घेऊन जातो असे म्हणून धमकी दिल्या प्रकरणी एका जणाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी चाळीस वर्षीय महिला रा.सटवाईचा मळा परळी वै.या आरोपी सचिन वैद्यनाथ नाईकवाडे वय 35 वर्षे रा.सटवाईचा मळा ता. परळी वै. याच्या शेजारीच राहतात.दि. 16 ऑगस्ट रोजी रात्री 11.43 वा. आरोपी फिर्यादी महिलेस बोलू लागला. तेंव्हा मला बोलू नको असे महिला म्हणली असता त्याने शिवागाळ केली. अंगावर येवुन वाईट भावनेने हात धरला व फिर्यादीला लज्जा वाटेल असे कृत्य केले. तसेच फिर्यादीचे मुलास शिवीगाळ करून धक्काबुक्की केली व फिर्यादीस उचलुन घेवुन जातो असे म्हणत धमकी दिली म्हणुन आरोपीविरुद्ध गु.र.न. 130/2024 कलम 74, 75, 115(2),352,351 (2) (3) भा.न्या. स. प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील

गावातून पहिली पीएसआय: लिंबोटा येथील कन्या पोलीस उपनिरीक्षक : निवडीबद्दल सत्कार

इमेज
  गावातून पहिली पीएसआय: लिंबोटा येथील कन्या झाली पोलीस उपनिरीक्षक : निवडीबद्दल सत्कार  परळी वैजनाथ दि १७ (प्रतिनिधी) :- लिंबोटा गावची सुकन्या कु. राणी दत्तू कराड हिने पीएसआय होण्याचा गावात पहिला मान मीळवला. एम.पी.एस.सी परीक्षेत मार्फत व्ही जे एन टी मध्ये महाराष्ट्रात पहिली आली. नुकत्याच झालेल्या एम.पी.एस.सी परीक्षेत ती राज्यातून एमपीएससी परीक्षेतून पहीली आली. वडील शेतकरी आई घरकाम आणि मजुरी करते (एवढ्या कठीण परस्थीतीत तीने स्वःताच्या बळावर व आई वडीलांचा जिद्दीने शिकत राहीली. लिंबोट्यात तेव्हा आठवी ते दहावी पर्यन्त ची शाळा पांगरीला वश श्री संत भगवान बाबा विद्यालयात शिकली आणि ११ वि व १२ पर्यंत शिक्षण तिचे फुलचंद भाऊ कराड यांनी महाविद्यालय आणल व मुलीचा शिक्षणाची सोय केली. राणीच शिक्षण भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ येथे झाले. पुढे तीने एम पी एस सी चा आभ्यास पुण्याला केला. आई वडील कमी पैसे देत होते तरी ती खचली नाही. लिंबोट्या सारखा छोट्या गावातून ती आज पीएसआय झाली. ही ही बाब गावच्या नागरिकांना खुप आभीमानाची गोष्ट आहे. आज श्री संत भगवान बाबा शाळेत संस्थाचालक फुलचंद  कराड यांच्या शुभहस्ते त

श्रेयस व प्रेयस याची जाणीव पालकांनी मुलांना करून द्यावी-पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे

इमेज
  श्रेयस व प्रेयस याची जाणीव पालकांनी मुलांना करून द्यावी-पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे  परळी, दि. 17/08/2024 (प्रतिनिधी)....    आपल्या हितासाठी व उज्ज्वल भवितव्यासाठी योग्य, उचित काय म्हणजे श्रेयस व आपल्याला प्रिय वाटणारे,आवडीचे म्हणजे प्रेयस या दोन्हीचीही जाणीव पालकांनी मुलांना करून द्यावी तरच त्यांची जडणघडण व जीवनातील वाटचाल योग्य होईल असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक  योगेश शिंदे यांनी केले. येथील कै .लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आयोजित  नुकताच पालक मेळाव्यात ते बोलत होते.           या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत असताना परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मा.योगेश शिंदे साहेब यांनी "श्रेयस व प्रेयस यांची जाणीव करून देण्याची  मुख्य जबाबदारी पालकांची असल्याचे "मत या प्रसंगी व्यक्त केले.यावेळी सखोल मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांसाठी अनेक क्षेत्र खुली आहेत त्या क्षेत्रातील संधीचा वापर करून घ्यावा व पालकांनी आपल्या पाल्याला त्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष जबाबदारी पार पाडावी अशी भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.          पालक

विधानसभेच्या तोंडावर परळीच्या महाविकास आघाडीत बिघाडी ?

इमेज
  विधानसभेच्या तोंडावर परळीच्या महाविकास आघाडीत बिघाडी ? : काँग्रेस शहराध्यक्षांनी खासदार बजरंग सोनवणेंवर व्यक्त केली जाहीर नाराजी परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा...          लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म इमानदारीने पालन करून अतिशय कठीण परिस्थितीत खासदार बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या घटक पक्षांचा निवडून आल्यानंतर मात्र त्यांना विसर पडला असल्याचा आरोप करत परळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ यांनी खा. बजरंग सोनवणे यांच्यावरील नाराजी जाहीरपणाने व्यक्त केली आहे. त्यामुळे परळीतील एक दिलाने काम करणाऱ्या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये हळूहळू बिघाडी होतेय का ? असा सवाल उपस्थित होत आहे.         या संदर्भाने परळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सय्यद हनीफ उर्फ बहादुर भाई यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढले असून त्यामध्ये जाहीरपणाने खा. बजरंग सोनवणे यांना निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा विसर पडल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर बजरंग सोनवणे हे बीडचे खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर काल दि.१६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच

परळीत बिंगोवर धाड: ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

इमेज
  परळीत बिंगोवर धाड: ४० हजारांचा मुद्देमाल जप्त  परळी (प्रतिनिधी)...       नवीन पोलिस अधिक्षक बारगळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदयांवर जिल्ह्यात धाडस्त्र सुरू केले आहे. त्यानुसार परळी येथील चक्री जुगार अड्डड्यावर छापा मारून बिंगो जुगार साहित्यासह रोख रक्कम जप्त केली आहे.          परळी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत ऑनलाइन बींगो चक्री खुलेआम सुरू असल्याची माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखा बीड पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या आदेशावरून दिनांक १६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता इशारातील संभाजीनगर भागामध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन बिंगो चक्रीवर धाड मारून एका व्यक्तीसह लॅपटॉप सीपीयू सह ऑनलाइन बिंगो चक्रीसाठी लागणारे साहित्य सह ४०८७० रू मुद्देमाल पोलिसानी जप्त करून संभाजीनगर पोलीस ठाण्यात गु र न१२९/२४ कलम १२ अ म जू का प्रमाणे गुन्हा दाखल केला.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुतळे,पो.ठोबरे, पो. दुबाले, पो.जोगदंड, पो. घोडके,पो. सानप, पो.कांबळे,पो.जायभाय,पो. वडमारे व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली.

दुःखद वार्ता : भावपुर्ण श्रध्दांजली

इमेज
  पत्रकार संजय खाकरे यांना भगिनीशोक: सौ. वैशाली रामेश्वरअप्पा महाजन यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       येथील पत्रकार संजय खाकरे यांच्या भगिनी सोनपेठ येथील रहिवासी सौ. वैशाली रामेश्वरअप्पा महाजन यांचे आज दिनांक 16 रोजी अल्पश: आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्या 54 वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुन असा परिवार आहे.      सौ.वैशालीताई रामेश्वरआप्पा महाजन यांच्यावर लातूर येथे उपचार सुरु होते.उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.सोनपेठ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने महाजन व खाकरे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

स्वातंत्र्य दिन:जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात प्रा.टी. पी. मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

इमेज
  स्वातंत्र्य दिन:जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात प्रा.टी. पी. मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण परळी/प्रतिनिधी 78 व्या स्वातंत्र्याच्या दिनाचे औचित्य साधून जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.श्री.प्रा.टी. पी. मुंडे (सर) यांच्या हस्ते भारतीय ध्वजाचे ध्वजारोहन संपन्न झाले.   सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. राष्ट्रगीताने तिरंगा ध्वजास मानवंदना देण्यात आली.   या कार्यक्रमास  शिवरत्न काका मुंडे, फुलारी सर, डॉ. सुरेश चौधरी, भीमराव मुंडे, ओम प्रकाश सारडा, सुदाम लोखंडे, जि.प. सदस्य प्रदीप भैय्या मुंडे, विनायक गडदे,अँड.अनिल मुंडे,अँड.प्रकाश मुंडे,  दत्तात्रय ढवळे,मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा विजय मुंडे ,रघुनाथ डोळस, जम्मू शेठ, शेख इलियास ,नवनाथ क्षीरसागर, दीपक फड, श्याम गाडेकर, महेश बँकेचे मुख्याधिकारी उपाध्य साहेब,  मुक्तार भाई , चांद भाई,शेख बाबा , शेख मुख्तार , बबलू सय्यद, नागेश व्

भव्य स्वरूपात संस्कृत श्लोकपाठांतर व भाषण स्पर्धांचे आयोजन

इमेज
भव्य स्वरूपात संस्कृत श्लोकपाठांतर  व भाषण स्पर्धांचे आयोजन     परळी वैजनाथ,दि.१५ -             अमृतवाणी संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी येथील संस्कृत भाषा प्रचार केंद्राच्या वतीने दरवर्षाप्रमाणे याही वर्षी येथे येत्या १७ व १८ ऑगस्ट २०२४ रोजी संस्कृत श्लोकपाठांतर व भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धा विविध गटात विभागण्यात आले आहेत.                    या स्पर्धा शहरातील आर्य समाज मंदिरात पार पडणार आहेत. त्यानुसार दि.१७ ऑगस्ट रोजी दुपारी २.०० वाजता बालवाडी (शिशुगट), पहिली ते चौथी (बालगट), पाचवी ते सातवी (प्राथमिक गट) या विभागांच्या श्लोक व भाषणस्पर्धा संपन्न होतील, तर दि.१८ ऑगस्ट रोजी दुपारी १.०० वाजता आठवी ते दहावी (माध्यमिक गट) व अकरावी ते पदवी अंतिम वर्ष (महाविद्यालयीन गट) या विभागाच्या श्लोक गायन व भाषण स्पर्धा पार पडतील. या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण दि.१९ ऑगस्ट रोजी ४.०० वाजता आयोजित सामूहिक संस्कृत दिन समारंभात करण्यात येईल.                 विविध विभागांच्या श्लोक पाठांतर स्पर्धेसाठी  वेग

भेल संकुलातील एकूण 11 विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश

इमेज
  भेल संकुलातील एकूण 11 विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश  परळी (प्रतिनिधी):                        येथील भा.शि. प्र.सं. अंबाजोगाई संचलित  भेल संकुलातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक विकासाबरोबरच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सर्व शिक्षकांसोबत क्रीडा शिक्षक ही खूप महत्त्वाचे कार्य करत असतात, याचेच एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे नुकत्याच क्रीडा व युवक संचालनालय पुणे यांच्याद्वारे बीड जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत न्यू दिल्ली पब्लिक स्कूल, परळी येथे झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत वेगवेगळ्या गटात भेल संकुलातील एकूण 11 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड होणे  हा एक आणखीन मानाचा तुरा भेलच्या शिरपेच्यात रोवला गेला.   यामध्ये  विभाग1- वयोगट 14 वर्षे (मुले)   चि.शिवम परमेश्वर गुट्टे याने परळी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला.तर *जिल्हास्तरीय निवड झालेले स्पर्धक* यामध्ये- चि.ऋषिकेश श्याम शिंदे  विभाग दोन वयोगट 14 वर्षे (मुली)  कु. सानवी पंकज अवचार  विभाग तीन वयोगट 17 वर्ष (मुले)  चि. सच्चिदानंद चाटे,  चि दिग्विजय शंकर महाजन   विभाग च

श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

इमेज
  श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा गेवराई: भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या   कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.          या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून स्थानिक समन्वय समिती चे अध्यक्ष श्री प्रमोद कुलकर्णी प्रमुख उपस्थिती म्हणून जयमंगल दादा जाधव,प्रमुख अतिथी म्हणून गेवराई शहरातील सर्व स्थापत्य अभियंता वर्ग सर्व श्री.संजय पंडित,सयाजी काळे,रामानंद स्वामी,निलेश खेत्रे,अक्षय शेटे,अक्षय करांडे, ह.भ.प.कैलास महाराज, स्थानिक समन्वय समिती उपाध्यक्ष डॉ.श्री.राधेश्याम झंवर,कार्यवाह श्री दत्ताजी पत्की,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री.अक्षय कुलकर्णी,श्री.नितीन डोळे श्री.अनिल बोर्डे श्री किशोर बोर्डे, डॉ.विजय सिकची श्री.सुदर्शन गुळजकर श्री.बाबासाहेब सांगुळे श्री.केशव पंडित,श्रीम.प्रणिता ताई हिटनाळीकर, प्राथमिक मुख्याध्यापक श्रीम.सुषमा ताई मोरगांवकर माध्यमिक मुख्याध्यापक श्री.अमोल गोरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.         मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रति

श्रावणी वेदप्रचार सप्ताह

इमेज
स्वर्ग व नरकाविषयी वेदांचा विशुद्ध दृष्टिकोन आचरणात आणावा ! श्रावणी वेदप्रचार सप्ताहात आचार्य ज्ञानप्रकाशजी  परळी वैजनाथ, दि.१५-                           जगात स्वर्ग व नरक हे दोन्ही या भूतलावरच असून त्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात परंपरागत भ्रामक व मिथ्या कल्पना पसरल्याने सर्वत्र  दुःखाचे वातावरण आहे.  स्वर्ग व नरकाविषयी वेदांचा विशुद्ध दृष्टीकोन आचरणात आणल्यास खऱ्या अर्थाने मानवी जीवन सुखी ठरते, असे प्रतिपादन प्रसिद्ध वैदिक विद्वान आचार्य श्री ज्ञानप्रकाश शास्त्री यांनी केले.                     येथील आर्य समाजात कालपासून सुरू झालेल्या श्रावणी वेदप्रचार सप्ताहाच्या रात्रकालीन ज्ञानसत्रात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेचे प्रधान स्वामी विद्यानंद सरस्वती हे होते. आपल्या अभ्यासपूर्ण प्रवचनात श्री शास्त्री म्हणाले की सध्या समाज अविद्या व अंधश्रद्धांनी ग्रासलेला आहे. स्वर्ग व नरकाच्या भ्रामक कल्पनामुळे समाजात दुःखाचे वातावरण पसरले आहे. ज्ञानपूर्वक सत्कर्मांनी सुखी होणे म्हणजे स्वर्ग तर अज्ञानपूर्वक दुष्कर्मांनी दुःखी होणे म्हणजेच नरक होय. म्हणूनच सुखविशेष स्वर्गाच्

शिवस्वराज्य यात्रेत सहभागी व्हा-सौ.सुदामती गुट्टे

इमेज
  शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी  वैद्यनाथाच्या परळी नगरीत जनजागृतीच्या उद्देशाने निघालेल्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी व्हा-सौ.सुदामती गुट्टे परळी प्रतिनिधीः महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था, रोजगार, महागाई, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच  पातळीवर सध्या घसरण झाली आहे. यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा 16ऑगस्ट रोजी परळी येथे येणार आहे तरी परळी मतदारसंघातील सर्व नागरिकांनी या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जेष्ठनेत्या सौ.सुदामतीताई गुट्टे यांनी पत्रकरांना माहिती दिली. 9 ऑगस्टला शिवनेरी किल्ल्यावरून यात्रेला सुरुवात झाली असुन ही शिवस्वराज्य यात्रा बीड जिल्ह्यातील परळी शहरात शुक्रवार दि.16 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता दाखल होणार आहे.या यात्रेचे परळी नगरीत जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर या यात्रेचे श्रद्धा मंगल कार्यालय येथे आयोजित सभेत  होणार आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल साहेब,खा.अमोल को

राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम

इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात हर घर तिरंगा व आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त मोफत रक्त तपासणी शिबीर राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)                 लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाराष्ट्र राज्य एड्स प्रतिबंध संस्था मुंबई शाखा उपजिल्हा रुग्णालय परळी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन व आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त मोफत रक्त तपासणी शिबीराचे आयोजन बुधवारी (ता.१४) करण्यात आले होते. १३५ विद्यार्थिनींची रक्त तपासणी करण्यात आली. तसेच हर घर तिरंगा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले.    ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हर घर तिरंगा अभियान तसेच महाराष्ट्र राज्य एड्स प्रतिबंध संस्था मुंबई व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात रक्ताच्या विविध चाचण्या शिबीर घेण्यात आले. रक्त तपासणी शिबीराचे उद्घाटन संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्ह

श्री. चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात अखंड भारत दिन उत्साहात साजरा

इमेज
 श्री. चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात अखंड भारत दिन उत्साहात साजरा गेवराई: भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.          या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून स्थानिक समन्वय समिती चे अध्यक्ष श्री प्रमोद कुलकर्णी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री दिलीप बाबा घोगे,भा.शि.प्र.संस्था कार्यवाह डॉ.श्री.हेमंत वैद्य, डॉ.श्री.राधेश्याम झंवर,श्री.अनिल बोर्डे श्रीम.प्रणिता ताई हिटनाळीकर, प्राथमिक मुख्याध्यापक श्रीम.सुषमा ताई मोरगांवकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.         मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले व हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत आजचा द्वितीय दिनाचा प्रमुख ध्वजारोहणाचा कार्यक्रम दिलीप बाबा घोगे यांच्या हस्ते पार पडला.          कार्यक्रमाचे पद्य गायन इयत्ता आठवी तील विद्यार्थिनीनी केले तर प्रास्ताविक श्रीम.वक्ते ताई यांनी केले तर अखंड भारत दिनाची माहिती श्री.घोलप सर यांनी विद्यार्थ्यांसमोर सविस्तर मांडली.          प्रमुख अतिथी दिलीप बाबा घोगे यांनी एकसंघ

प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर

इमेज
प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर  मराठी साहित्यिक व विचारवंत फुले शाहू-आंबेडकर चळवळीचे मार्गदर्शक प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर झाला झाला असून १५ ऑगस्ट २०२४ रोजी वेळ सकाळी ११ वाजता हा पुरस्कार राणीत्री बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. भालचंद्र ब्लड बँक सभागृह लातूर या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे.       प्राचार्य डॉ कमलाकर कांबळे  यांचे "आठवणीचे पक्षी: एक चिकित्सक अभ्यास", "दलित साहित्य शोध, आणि स्वरुप", "महाउम्मग जातक कादंबरी वाड्मयाचे आद्य स्वरुप", "बुध्दाच्या जातक कथा एक अभ्यास" इत्यादी ग्रंथ प्रकाशित झाले असून त्यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यांचे विशेष सन्मान करण्यात आले आहेत.        त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्याची विशेष दखल घेऊन त्यांना राणीत्री बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने 'विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सामाजिक, शैक्षणिक, विविध क्षे

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची वार्षिक महासभा

इमेज
  भाशिप्र संस्थेच्या वार्षिक महासभेतून संस्थेच्या ध्येय धोरणांची उजळणी होते - हरीश कुलकर्णी अंबाजोगाई/प्रतिनिधी... भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वार्षिक महा सभेतून संस्थेच्या ध्येयधोरणांची उजळणी होते. ही संस्था सामूहिक नेतृत्वाच्या आधारे सुसूत्र पद्धतीने चालविली जाते. लोकांधारावर आधारित शिक्षण व्यवस्था विकसित करण्याकडे आता शिक्षण संस्थांनी पाहायला हवे. सुजाण नागरिकांची जडणघडण व चांगल्या समाजाची निर्मिती करत असताना हिंदूधर्म एकसंघ राहावा यासाठी भविष्यात सर्वांना काम करावे लागणार असल्याचे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांताचे कार्यकारणी सदस्य हरीशजी कुलकर्णी यांनी भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाईच्या वार्षिक महासभेच्या वेळी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. अंबाजोगाई येथे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वार्षिक महासभेला केंद्रीय कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांची सर्व संस्था सभासदांची व संस्थेच्या सर्व संस्कार केंद्राच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य संस्थेच्या के

कै. जनार्दन आत्माराम चितळे युवा नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

इमेज
  कै. जनार्दन आत्माराम चितळे युवा नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ....... नांदेड, प्रतिनिधी ... नांदेड येथे तन्मय प्रतिष्ठान व लीला आर्ट्स फाउंडेशन, नांदेड यांच्या वतीने कै. जनार्दन आत्माराम चितळे युवा नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक 22 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. यावर्षीच्या आयोजनाचे हे 34 वे वर्ष आहे. या नाट्य शिबिरात नाट्यक्षेत्रातील सर्वोच्च शिक्षण देणाऱ्या राष्ट्रीय नाट्य शाळा ( एनएसडी, नवी दिल्ली) येथील तज्ञ नाट्य प्रशिक्षक श्रीमती स्नेहलता तागडे( मुंबई) ,श्रीमती खुशबू कुमारी (बिहार), चंदन कुमार ( दिल्ली), सलीम हुसेन मुल्ला (कोल्हापूर), तसेच सोशल मीडियावर नाट्यतंत्रासाठी सुप्रसिद्ध प्रशिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या शिखर पहाडिया थिअटरवाले, दूरदर्शन व चित्रपट क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री नांदेडची भूमिकन्या  नुपूर चितळे या व्याख्यात्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हे शिबिर रंग शारदा दालन, कै. शंकरराव चव्हाण नाट्यगृह नांदेड येथे पार पडणार आहे. तरी मराठवाड्यातील जास्तीत जास्त युवा नाट्यकर्मी, तसेच या क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या युवक व युवतींनी

अवघ्या दीड वर्षात सरपंचांनी केली शब्दाची पूर्तता*

इमेज
  ना. धनंजय मुंडे यांच्या सहकार्यातून इंजेगाव स्मशानभूमीचा झाला कायापालट ! सरपंच सौ. विद्या अमोल कराड यांच्या संकल्पनेतून आले उद्यानाचे स्वरूप अवघ्या दीड वर्षात सरपंचांनी केली शब्दाची पूर्तता परळी वैजनाथ, प्रतिनिधी...   मरणानंतर होणारे इंजेगावकरांचे हाल पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सहकार्यातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाल्मीक अण्णा कराड व युवक नेते अजय मुंडे यांच्या सहकार्याने थांबले आहेत. सरपंच सौ विद्या अमोल कराड यांच्या संकल्पनेतून स्मशानभूमीचा आमुलाग्र कायापालट झाला असून आता उद्यानाचे स्वरूप आले आहे. स्मशानभूमी आहे का रम्य असे उद्यान असा प्रश्न पडावा एवढा आकर्षक आणि लेखन स्वरूप या स्मशानभूमीला आल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.        इंजेगावमध्ये एखाद्याच्या अंत्यसंस्काराला जाणे म्हणजे दिव्य होते. ना रस्ता व्यवस्थित होता ना चालणे सोपे होते. मरणारा पेक्षा अंत्यसंस्कारला जाणारा ची बेजारी जास्त होत होती. ग्रामस्थांची ही अडचण लक्षात घेऊन सौ. विद्या अमोल कराड यांच्या संकल्पनेतून या अतिशय नेत्रदीपक असा विकास करण्यात आला आहे. स्मशानभूमीला आता उद्यानाचे

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

इमेज
  आता नगराध्यक्षांचा कालावधी अडिच ऐवजी पाच वर्ष       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.  मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.* 👉  मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) : ✅ विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार. १४९ कोटीस मान्यता ✅  मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय. लाखो नागरिकांना लाभ ✅  डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र  विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना  ✅ यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च २०२५ पर्यंत शिथील  ✅ शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन ✅ सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण. सुधारित ३७ हजार कोटी खर्चास मान्यता ✅ नगराध्यक्षांचा कालावधी अडीच

सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.रमाकांत महारूद्रअप्पा बुरांडे यांच्या वतीने महाप्रसाद

इमेज
  अखंड शिवनाम कीर्तन आणि श्रावणमास तपोनुष्ठान :तपोनुष्ठानद्वारे सर्वांना आध्यात्मिक शांती आणि समृद्धी लाभते-शि.भ.प. विश्वनाथ स्वामी परळी वैजनाथ/प्रतिनिधी शि.भ.प. विश्वनाथ स्वामी वडवळकर यांचे अखंड शिवनाम कीर्तन रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी अत्यंत उत्साहात पार पडले. याच अनुषंगाने ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या श्रावणमास तपोनुष्ठानाचा कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने सुरू आहे.या तपोनुष्ठानाच्या अंतर्गत पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री शनि मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वीरशैव लिंगायत समाज आणि श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळीच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे. शि.भ.प. विश्वनाथ स्वामी वडवळकर महाराजांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सांगितले, “आम्ही या पवित्र श्रावणमासात भक्तिपंथाने पुढे जाण्याचा आणि धार्मिक कार्यात अधिक रुचि वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. भाविक भक्तांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम अधिक उजळला आहे. आशा आहे की, ह्या तपोनुष्ठानाद्वारे सर्वांना अध्यात्मिक शांती आणि समृद्धी लाभेल.”या धार्मिक कार्यक्रमात दररोज

समाजाच्या सुखदुःखात कायम पाठीशी राहणारं महाराष्ट्रातील एकमेव नेतृत्व सावंत सर - अमित घाडगे

इमेज
  कर्तव्याच्या भावनेने ना.तानाजीराव सावंत यांच्या वतीने १२ कुटुंबाना प्रत्येकी २ लाखाचे आर्थिक सहकार्य समाजाच्या सुखदुःखात कायम पाठीशी राहणारं महाराष्ट्रातील एकमेव नेतृत्व सावंत सर - अमित घाडगे परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  मराठा आराक्षणासाठी आत्महत्या केलेल्या १२ कुटुंबाला महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मराठा भूषण तानाजीराव सावंत यांच्या वतीने प्रत्येकी दोन लाखाचे सहकार्य. परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित भैया घाडगे यांच्या हस्ते चेक सुपूर्द करण्यात आले.  कसल्याही प्रकारचा गाजावाजा न करता कर्तव्याच्या भावनेने मराठा भूषण ना.तानाजीराव सावंत सर यांच्या वतीने  आजतागायात मराठा समाजाच्या जवळ पास ९० ते १०० कुटुंबांना आर्थिक सहकार्य करत अनेक मुलांना दत्तक घेऊन त्यांच पालकत्व स्वीकारण्यात आलेले आहे. रविवार दिनांक ११ ऑगष्ट २०२४ रोजी परळी वैजनाथ येथे श्रद्धा मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित भैय्या घाडगे यांच्या हस्ते चेक सुपूर्द करण्यात आले.            यामध्ये चंद्रकांत लक्ष्मण चाळक किनगाव ता. गेवराई, चंद्रकांत अजबर

एसटी बसमधील चक्रावून टाकणारा प्रकार

इमेज
  एसटी बसमधील चक्रावून टाकणारा प्रकार :गुंगीचे औषध देऊन साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने महिलेच्या अंगावरून काढून घेतले परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा:- गुंगीचे औषध देऊन एका महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेतल्याची चक्रावून टाकणारी घटना एसटी प्रवासात घडली आहे. परळी नांदेड बस मध्ये एका अज्ञात इसमाने बिस्किट व पाण्याच्या माध्यमातून गुंगी येण्याचे औषध देऊन तीन लाख 60 हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला आहे. या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात एका महिलेच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याकडून प्राप्त माहिती अशी की, कमलबाई ज्ञानोबा सुरवसे रा. बसवेश्वर कॉलनी, परळी वैजनाथ ह्या  बसस्थानक परळी येथुन नांदेडकडे जाणाऱ्या बसमध्ये बसुन नांदेडला जात होत्या. दगडवाडी फाट्याच्या जवळ  शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांना बिस्कीट व पाणी खाण्या पिण्यासाठी दिले. कमलबाई कदम यांनी  हे बिस्किट व पाणी पिल्याने त्यांना गुंगी आली. याच दरम्यान अनोळखी इसमाने त्यांच्या हातातील 5 तोळे वजणाच्या सोन्याच्या 2 पाटल्या व एक तोळा वजनाची सोन्याची अंगठी असा

आचार्य ज्ञानप्रकाशजी व पं. भूपेंद्रसिंह आर्य यांचे मौलिक मार्गदर्शन लाभणार !

इमेज
  मंगळवारपासून आर्य समाजात श्रावणी वेद प्रचार सप्ताह  आचार्य ज्ञानप्रकाशजी व पं. भूपेंद्रसिंह आर्य यांचे मौलिक मार्गदर्शन लाभणार !    परळी वैजनाथ दि.११-                       श्रावण महिन्यात शास्त्रश्रवणाचे औचित्य साधून विशुद्ध वैदिक ज्ञानाच्या माध्यमाने मानवी जीवनाला धार्मिक ,आध्यात्मिक, बौद्धिक व सामाजिक कल्याणाची सुयोग्य दिशा प्राप्त व्हावी,  या उद्देशाने येथील आर्य समाजाच्या वतीने येत्या मंगळवार (दि.१३) पासून श्रावणी वेद प्रचार सप्ताहाला सुरुवात होत आहे. यासाठी मार्गदर्शक व्याख्याते म्हणून बलिया (उ. प्र.) येथील वैदिक शास्त्रांचे प्रकांड विद्वान आचार्य श्री ज्ञानप्रकाश शास्त्री तर भजनगायक म्हणून अलिगढ (उ.प्र.) येथून प्रसिद्ध अभ्यासक पं. भूपेंद्रसिंह आर्य यांना आमंत्रित करण्यात आले आहे.              महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेतर्फे परळी आर्य समाजासाठी हा कार्यक्रम देण्यात आला आहे. यासंदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच नियोजन बैठक संपन्न झाली. त्यात सर्व कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार वेद प्रचार सप्ताहादरम्यान दररोज सकाळी ७.३० वा. वेद पारायण यज्ञ, ८.३० वा. भजनसं

रक्तदात्यांचा हिरिरीने सहभाग; अनेेकांनी स्वयंस्फूर्त केलं रक्तदान

इमेज
माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल १०३ दात्यांचे रक्तदान ! 🕳️ रक्तदात्यांचा हिरिरीने सहभाग; अनेेकांनी स्वयंस्फूर्त केलं रक्तदान परळी वैजनाथ/ प्रतिनिधी......     कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे परळी शहरातील कर्तृत्ववान उमदे युवा नेतृत्व व परळीच्या सर्वांगीण विकासाचा मुख्यदुवा म्हणून यशस्वी कारकीर्द निर्माण केलेले माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त आज (दि.११) रोजी आयोजित रक्तदान शिबिराला  दरवर्षी प्रमाणेच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या  शिबिरात तब्बल १०३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.        राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेने बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया  धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 11 ऑगस्ट रोजी स्व. श्री. मणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह, आंबेवेस, परळी वैजनाथ येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सकाळी या शिबिराचा शुभारंभ डाॅ.जे.जे.देश

बारा ज्योतिर्लिंगांची सायकलवारी:पुण्याच्या हौशी मंडळींची सायकलस्वारी-पोहचली ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या दारी !

इमेज
 ■ बारा ज्योतिर्लिंगांची सायकलवारी: पुण्याच्या हौशी मंडळींची सायकलस्वारी-पोहचली ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या दारी !   परळी वैजनाथ,महादेव शिंदे......         पुण्याच्या हौशी सायकलपटूंनी या श्रावण महिन्यात बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन सायकलवारीने करण्याचा संकल्प केला असुन या सायकलपटूंनी या प्रवासाची सुरुवात पुणे -परळी वैजनाथ या सायकल प्रवासाने केली.बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथे ही सायकलवारी पोहचली.      पुणे येथील हाडपसर ॲथेलेटिक्स क्लबच्या सात सायकलपटूंनी यावर्षीच्या श्रावण महिन्यात १२ ज्योतिर्लिंग ठिकाणी सायकलवारी करण्याचे ठरविलेले आहे. सायकलिंगचे अनोखे वेड असलेली ही मंडळी असुन ते सातत्याने विविध धार्मिक स्थळे ,पर्यटनस्थळांना सायकलवारी करत असतात.विशेष म्हणजे या सायकल वारीमध्ये पोलीस अधिकारी, इंजिनियर, व्यावसायिक,आदी विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती सहभागी झाल्या आहेत.       पुणे -परळी वैजनाथ असा या उपक्रमातील सुरुवातीचा सायकल प्रवास या सात जणांच्या टीमने केला व बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवी ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील प्रभू वैजनाथ त्याच्य