इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

भव्य स्वरूपात संस्कृत श्लोकपाठांतर व भाषण स्पर्धांचे आयोजन

भव्य स्वरूपात संस्कृत श्लोकपाठांतर  व भाषण स्पर्धांचे आयोजन


    परळी वैजनाथ,दि.१५ -

            अमृतवाणी संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी येथील संस्कृत भाषा प्रचार केंद्राच्या वतीने दरवर्षाप्रमाणे याही वर्षी येथे येत्या १७ व १८ ऑगस्ट २०२४ रोजी संस्कृत श्लोकपाठांतर व भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धा विविध गटात विभागण्यात आले आहेत. 

                  या स्पर्धा शहरातील आर्य समाज मंदिरात पार पडणार आहेत. त्यानुसार दि.१७ ऑगस्ट रोजी दुपारी २.०० वाजता बालवाडी (शिशुगट), पहिली ते चौथी (बालगट), पाचवी ते सातवी (प्राथमिक गट) या विभागांच्या श्लोक व भाषणस्पर्धा संपन्न होतील, तर दि.१८ ऑगस्ट रोजी दुपारी १.०० वाजता आठवी ते दहावी (माध्यमिक गट) व अकरावी ते पदवी अंतिम वर्ष (महाविद्यालयीन गट) या विभागाच्या श्लोक गायन व भाषण स्पर्धा पार पडतील. या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण दि.१९ ऑगस्ट रोजी ४.०० वाजता आयोजित सामूहिक संस्कृत दिन समारंभात करण्यात येईल. 

               विविध विभागांच्या श्लोक पाठांतर स्पर्धेसाठी  वेगवेगळी सुभाषिते  व भाषणांसाठी वेगवेगळे विषय निश्चित करण्यात आले आहेत. तशा प्रकारची परिपत्रके सर्व शाळा व महाविद्यालयांना पाठवण्यात आली असून  स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृत शिक्षक व प्राध्यापकांशी संपर्क साधावा व मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन संस्कृत भाषा प्रचार केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सर्वश्री प्रा.डा. अरुण चव्हाण (९८९०३५५३४९), प्रा. डॉ. वीरेंद्र शास्त्री (९७६४३३२११७), तानाजी शास्त्री(९०७५२५७७६६), नितीन व्हावळे (९५९५७७९७८०), अतुल नरवाडकर (९४०३८८३११४),माणिक गडदे(९८९०५४२६०४) सौ. पल्लवी फुलारी (८३२९४४४८४९) किशोर पवार (९५६१०९६२९२) यांच्याशी संपर्क करावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या