बारा ज्योतिर्लिंगांची सायकलवारी:पुण्याच्या हौशी मंडळींची सायकलस्वारी-पोहचली ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या दारी !
■ बारा ज्योतिर्लिंगांची सायकलवारी: पुण्याच्या हौशी मंडळींची सायकलस्वारी-पोहचली ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या दारी !
परळी वैजनाथ,महादेव शिंदे......
पुण्याच्या हौशी सायकलपटूंनी या श्रावण महिन्यात बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन सायकलवारीने करण्याचा संकल्प केला असुन या सायकलपटूंनी या प्रवासाची सुरुवात पुणे -परळी वैजनाथ या सायकल प्रवासाने केली.बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथे ही सायकलवारी पोहचली.
पुणे येथील हाडपसर ॲथेलेटिक्स क्लबच्या सात सायकलपटूंनी यावर्षीच्या श्रावण महिन्यात १२ ज्योतिर्लिंग ठिकाणी सायकलवारी करण्याचे ठरविलेले आहे. सायकलिंगचे अनोखे वेड असलेली ही मंडळी असुन ते सातत्याने विविध धार्मिक स्थळे ,पर्यटनस्थळांना सायकलवारी करत असतात.विशेष म्हणजे या सायकल वारीमध्ये पोलीस अधिकारी, इंजिनियर, व्यावसायिक,आदी विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती सहभागी झाल्या आहेत.
पुणे -परळी वैजनाथ असा या उपक्रमातील सुरुवातीचा सायकल प्रवास या सात जणांच्या टीमने केला व बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवी ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील प्रभू वैजनाथ त्याच्या दर्शनासाठी ही सायकलवारी पोहोचली यावेळी परळीकरांनी या सायकलपटूंचा उत्साह वाढविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे स्वागत केले या उपक्रमाची सुरुवात आम्ही मुद्दामून आरोग्य प्रदान करणारी देवता अशी मान्यता असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाने करत असुन परळी वैजनाथ येथून हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील दर्शनासाठी आम्ही जाणार असल्याचे या सायकलपटूंनी सांगितले. या श्रावण महिन्यात बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन आम्ही सायकलवर प्रवास करूनच करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवभक्त राजेंद्र सोनी यांनी केलं स्वागत.....
दरम्यान पुणे येथून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या हौशी मंडळींनी परळी वैजनाथ येथे येऊन रघु वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले व समाधान व्यक्त केले सायकलवारी करणाऱ्या या सायकलपटूंचे परळीत शिवभक्तांच्या वतीने माजी नगरसेवक तथा शिवभक्त राजेंद्र सोनी यांनी वैद्यनाथ मंदिरात त्यांचे स्वागत केले त्याचप्रमाणे या सायकलपटूंना पुढील प्रवासाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
220कि.मी.चा सायकल प्रवास केला वैद्यनाथ दर्शनानंतर शीण गेला...
हडपसर ॲथलेटिक्स क्लबच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी विविध उपक्रम करतो यामध्ये सायकलींग ट्रेकिंग स्विमिंग रनिंग असे उपक्रम राबवले जातात. आमच्या क्लब मध्ये जवळपास 600 सदस्य आहेत. मात्र यावर्षीच्या श्रावण महिन्यातील बारा ज्योतिर्लिंग सायकलवारीसाठी आम्ही सात जण निघालेलो आहोत. पुणे इथून पहाटे प्रवास सुरू करून बार्शी येथे आम्ही मुक्काम केला. जवळपास 220 किलोमीटरचा प्रवास सायकल द्वारे करून आम्ही परळी वैजनाथ येथे पोहोचलो आहोत. मात्र एवढा प्रवास झाल्यानंतर प्रभु वैद्यनाथाच्या स्पर्श दर्शनाने आमचा सगळा शीन दूर झाला आहे. सुरुवात आम्ही परळीतून केली असली तरी टप्प्याटप्प्याने आम्ही बारा ज्योतिर्लिंगाची परिक्रमा सायकलनेच करणार आहोत.
-पृथ्वीराज शिंदे ,
सायकलपटू व पोलीस उपनिरीक्षक पुणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा