अवघ्या दीड वर्षात सरपंचांनी केली शब्दाची पूर्तता*
ना. धनंजय मुंडे यांच्या सहकार्यातून इंजेगाव स्मशानभूमीचा झाला कायापालट !
सरपंच सौ. विद्या अमोल कराड यांच्या संकल्पनेतून आले उद्यानाचे स्वरूप
अवघ्या दीड वर्षात सरपंचांनी केली शब्दाची पूर्तता
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
मरणानंतर होणारे इंजेगावकरांचे हाल पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सहकार्यातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाल्मीक अण्णा कराड व युवक नेते अजय मुंडे यांच्या सहकार्याने थांबले आहेत. सरपंच सौ विद्या अमोल कराड यांच्या संकल्पनेतून स्मशानभूमीचा आमुलाग्र कायापालट झाला असून आता उद्यानाचे स्वरूप आले आहे. स्मशानभूमी आहे का रम्य असे उद्यान असा प्रश्न पडावा एवढा आकर्षक आणि लेखन स्वरूप या स्मशानभूमीला आल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
इंजेगावमध्ये एखाद्याच्या अंत्यसंस्काराला जाणे म्हणजे दिव्य होते. ना रस्ता व्यवस्थित होता ना चालणे सोपे होते. मरणारा पेक्षा अंत्यसंस्कारला जाणारा ची बेजारी जास्त होत होती. ग्रामस्थांची ही अडचण लक्षात घेऊन सौ. विद्या अमोल कराड यांच्या संकल्पनेतून या अतिशय नेत्रदीपक असा विकास करण्यात आला आहे. स्मशानभूमीला आता उद्यानाचे स्वरूप आले आहे. इंजेगाव येथील स्मशानभूमी अतिशय अडचणीची होती. विशेष म्हणजे नदीकाठी असलेल्या या स्मशानभूमीमध्ये मृतदेह घेऊन जाण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागायची. त्यातही पावसाळ्यामध्ये तर अक्षरशः नाकी नऊ यायचे ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन सरपंच सौ विद्या अमोल कराड यांनी स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. इंजेगाव हे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या आत्याचे गाव असल्याने निधीला कमी पडणार नाही याची त्यांना खात्री होती पण सर्वात महत्त्वाची अडचण ही होती की स्मशानभूमीच्या विकासासाठी जागाही नव्हती. ही अडचण दूर करणे अतिशय महत्त्वाचे होते. यासाठी सरपंचपती अमोल कराड यांनी पुढाकार घेऊन मधुकर कराड यांची जमीन स्वखर्चाने विकत घेण्याचा निर्णय घेतला. जमीन घेतल्यानंतर स्मशानभूमीची विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाल्मीक अण्णा कराड, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते अजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंचपती अमोल कराड यांनी कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला आणि त्यांच्या या पाठपुरावाला यशही आले.
स्मशानभूमीचे झाले उद्यान
अपेक्षाप्रमाणे ना. धनंजय मुंडे यांनी स्मशानभूमीच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असा शब्द दिला. ना. धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने स्मशानभूमी मध्ये विविध विकास योजना कारवानीत झाल्या. अगोदर स्मशानभूमीमध्ये उभा राहण्याची सुद्धा अडचण होती. मात्र अमोल कराड यांच्या पुढाकाराने स्मशानभूमीला उद्यानाचे स्वरूप आले. स्मशानभूमी मध्ये गट्टू आणि सिमेंट टाकून जमीन व्यवस्थित केली. मयताच्या नातेवाईकांना बसण्यासाठी बाकड्यांची सोय केली. नुकतेच विविध वृक्षांचे रोपण करून स्मशानभूमीला उद्यानाचे स्वरूप दिले. यामुळे दुःखामध्ये येणाऱ्या नातेवाईकांना बसण्यासाठी सोय झाली. स्मशानभूमीला संरक्षक भिंत उभारले असून चांगले कठडेही उभे केले आहेत. या सर्वांना रंगरंगोटी करून सुशोभित करण्यात आले आहे.
अंत्यसंस्कारानंतर हातपाय धुण्यासाठी एक चांगला हौद बांधला असून स्मशानभूमीत जाण्यासाठी अतिशय खराब असलेला रस्ता चांगला करून घेण्यात आला आहे. या स्मशानभूमीमध्ये झालेल्या सुधारणामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
स्वखर्चाने घेतली जमीन.....
स्मशानभूमीत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन स्मशानभूमीत सुधारणा करण्याचा निर्णय सरपंच सौ विद्या अमोल कराड यांनी घेतला. मात्र विकासासाठी जमीन नव्हती त्यामुळे तेथील शेतकरी मधुकर कराड यांची जमीन सरपंचपती अमोल कराड यांनी स्वखर्चाने विकत घेतली आणि ती स्मशानभूमीसाठी दान दिली. येथील जमिनीला भाव असल्याने शेतकरी जमीन देण्यासाठी तयार नव्हते. मात्र गावातील माजी शिक्षणाधिकारी हिरालाल कराड, माजी सरपंच सुखदेव कराड यांच्यासह प्रतिष्ठित नागरिकांनी मधुकर कराड यांची जमीन उपलब्ध करून दिली. त्यामुळे स्मशानभूमीचा विकास करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
- अमोल कराड
सरपंचपती, इंजेगाव
सरपंचांनी केली शब्दाची पूर्तता
इंजेगावच्या सरपंच सौ. विद्या अमोल कराड यांनी सरपंच झाल्यानंतर काही दिवसातच स्मशानभूमीचा कायापालट करणार असा शब्द गावकऱ्यांना दिला होता. अखेर सरपंचांनी आपल्या शब्दाची पूर्तता करत स्मशानभूमीचा कायापालट केला आहे. निवडणुकीनंतर अवघ्या दीड वर्षाच्या आत त्यांनी गावांमध्ये विकासाची भरीव काम केले असून स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाने या विकासामध्ये भर पडली आहे. दिलेला शब्द सरपंचांनी पाळल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान ग्रामस्थांना दिलेला शब्द आपण पूर्ण करू शकलो याचा आपल्याला आनंद असल्याची प्रतिक्रिया सरपंच सौ. विद्या अमोल कराड यांनी व्यक्त केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा