इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

विधानसभेच्या तोंडावर परळीच्या महाविकास आघाडीत बिघाडी ?

 विधानसभेच्या तोंडावर परळीच्या महाविकास आघाडीत बिघाडी ? : काँग्रेस शहराध्यक्षांनी खासदार बजरंग सोनवणेंवर व्यक्त केली जाहीर नाराजी


परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा...

         लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म इमानदारीने पालन करून अतिशय कठीण परिस्थितीत खासदार बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या घटक पक्षांचा निवडून आल्यानंतर मात्र त्यांना विसर पडला असल्याचा आरोप करत परळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ यांनी खा. बजरंग सोनवणे यांच्यावरील नाराजी जाहीरपणाने व्यक्त केली आहे. त्यामुळे परळीतील एक दिलाने काम करणाऱ्या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये हळूहळू बिघाडी होतेय का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

        या संदर्भाने परळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सय्यद हनीफ उर्फ बहादुर भाई यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढले असून त्यामध्ये जाहीरपणाने खा. बजरंग सोनवणे यांना निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा विसर पडल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर बजरंग सोनवणे हे बीडचे खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर काल दि.१६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा परळीत आली होती. या निमित्ताने खा.बजरंग सोनवणे लोकसभेनंतर पहिल्यांदाच परळीत आले. मात्र खासदार झाल्यानंतर त्यांनी ना परळी येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संपर्क ठेवला ना आभाराचा साधा मेसेज केला. शिवस्वराज्य यात्रेनिमित्त पहिल्यांदाच परळीत आल्यानंतरही भेटघेणे किंवा संपर्क करणे खासदारांनी टाळले. त्यामुळे नाराज परळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सय्यद हनीफ उर्फ बहादुर भाई यांनी जाहीर प्रसिध्दीपत्रक काढून जाहीर नाराजी व्यक्त केली.त्यामुळे परळीतील एक दिलाने काम करणाऱ्या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये हळूहळू बिघाडी होतेय का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

@@@ 

खासदारांना जाण राहिली नाही......

      बीड लोकसभेत बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाने आघाडीचा धर्म पाळत मोठा विजय मिळवून दिला.आज तीन महिने झाले पण बजरंग सोनवणेनी कधी साधा संपर्कही केलेला नाही. शिवस्वराज्य यात्रे निमित्ताने परळी शहरात आले पण आघाडीच्या कुठल्याही नेते पदाधिकारी, कार्यकर्त्यांना साधा संपर्कही केला नाही.काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करुन न डगमगता  बजरंग सोनवणेंना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले. पण खासदारांना याचे काहीच देणेघेणे राहिले नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांत त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी सूर आहे.

      - सय्यद हनीफ उर्फ बहादुरभाई, शहराध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस, परळी वैजनाथ.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या