इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

आचार्य ज्ञानप्रकाशजी व पं. भूपेंद्रसिंह आर्य यांचे मौलिक मार्गदर्शन लाभणार !

 मंगळवारपासून आर्य समाजात श्रावणी वेद प्रचार सप्ताह 

आचार्य ज्ञानप्रकाशजी व पं. भूपेंद्रसिंह आर्य यांचे मौलिक मार्गदर्शन लाभणार !

  

परळी वैजनाथ दि.११-

            

         श्रावण महिन्यात शास्त्रश्रवणाचे औचित्य साधून विशुद्ध वैदिक ज्ञानाच्या माध्यमाने मानवी जीवनाला धार्मिक ,आध्यात्मिक, बौद्धिक व सामाजिक कल्याणाची सुयोग्य दिशा प्राप्त व्हावी,  या उद्देशाने येथील आर्य समाजाच्या वतीने येत्या मंगळवार (दि.१३) पासून श्रावणी वेद प्रचार सप्ताहाला सुरुवात होत आहे. यासाठी मार्गदर्शक व्याख्याते म्हणून बलिया (उ. प्र.) येथील वैदिक शास्त्रांचे प्रकांड विद्वान आचार्य श्री ज्ञानप्रकाश शास्त्री तर भजनगायक म्हणून अलिगढ (उ.प्र.) येथून प्रसिद्ध अभ्यासक पं. भूपेंद्रसिंह आर्य यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

             महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेतर्फे परळी आर्य समाजासाठी हा कार्यक्रम देण्यात आला आहे. यासंदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच नियोजन बैठक संपन्न झाली. त्यात सर्व कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार वेद प्रचार सप्ताहादरम्यान दररोज सकाळी ७.३० वा. वेद पारायण यज्ञ, ८.३० वा. भजनसंगीत, ९.३० वा. धार्मिक व आध्यात्मिक विषयावर प्रवचने पार पडतील. त्यानंतर ११.०० वा. विविध शाळां- महाविद्यालयांत व्याख्याने,  दुपारी ३ ते ४ वा.  जिज्ञासू नागरिकांच्या अध्यात्मविषयक शंकांचे समाधान असे विविध कार्यक्रम संपन्न होतील. तर रात्री ८.०० वा. भजन संगीत व ९.०० वाजता पारिवारिक, सामाजिक, राष्ट्रीय व अन्य प्रासंगिक विषयावर मौलिक व्याख्याने पार पडतील. 

           तरी या कार्यक्रमांचा शहर व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आर्य समाजाचे प्रधान श्री जुगलकिशोर लोहिया, मंत्री उग्रसेन राठौर , कोषाध्यक्ष श्री देविदासराव कावरे , उपप्रधान लक्ष्मण आर्य गुरुजी, डॉ मधुसूदन काळे, उपमंत्री पं. प्रशांतकुमार शास्त्री, जयपाल लाहोटी व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या