शिवस्वराज्य यात्रेत सहभागी व्हा-सौ.सुदामती गुट्टे
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी वैद्यनाथाच्या परळी नगरीत
जनजागृतीच्या उद्देशाने निघालेल्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी व्हा-सौ.सुदामती गुट्टे
परळी प्रतिनिधीः महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था, रोजगार, महागाई, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच पातळीवर सध्या घसरण झाली आहे. यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा 16ऑगस्ट रोजी परळी येथे येणार आहे तरी परळी मतदारसंघातील सर्व नागरिकांनी या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जेष्ठनेत्या सौ.सुदामतीताई गुट्टे यांनी पत्रकरांना माहिती दिली.
9 ऑगस्टला शिवनेरी किल्ल्यावरून यात्रेला सुरुवात झाली असुन ही शिवस्वराज्य यात्रा बीड जिल्ह्यातील परळी शहरात शुक्रवार दि.16 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता दाखल होणार आहे.या यात्रेचे परळी नगरीत जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर या यात्रेचे श्रद्धा मंगल कार्यालय येथे आयोजित सभेत होणार आहे.
शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल साहेब,खा.अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, खा.बजरंग बप्पा सोनवणे,युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,जिल्हाध्यक्ष तथा आ.संदिप क्षिरसागर, पक्ष निरिक्षक जिवनराव गोरे,प्रदेश उपाध्यक्ष डॉ नरेंद्र काळे,किसान सेल प्रदेशाध्यक्षा पुजाताई मोरे अदी मान्यवर नेते सहभागी होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जेष्ठनेत्या सौ.सुदामतीताई गुट्टे पुढे माहिती देत असताना सांगितले कि,राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. बेरोजगारी वाढली आहे. अनेक ठिकाणी भ्रष्टाचार ,गुंडगिरीने अक्षरशः थैमान घातले आहे. आपले परळी तालुका देखील या गोष्टीला अपवाद राहिलेले नाही यासह अनेक विषय जनजागृतीच्या उद्देशाने निघालेल्या शिवस्वराज्य यात्रेत असणार आहेत अशी माहिती देत या शिवस्वराज्य यात्रेत परळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जेष्ठनेत्या सौ.सुदामतीताई गुट्टे यांनी दिली
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा