श्रेयस व प्रेयस याची जाणीव पालकांनी मुलांना करून द्यावी-पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे
श्रेयस व प्रेयस याची जाणीव पालकांनी मुलांना करून द्यावी-पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे
परळी, दि. 17/08/2024 (प्रतिनिधी)....
आपल्या हितासाठी व उज्ज्वल भवितव्यासाठी योग्य, उचित काय म्हणजे श्रेयस व आपल्याला प्रिय वाटणारे,आवडीचे म्हणजे प्रेयस या दोन्हीचीही जाणीव पालकांनी मुलांना करून द्यावी तरच त्यांची जडणघडण व जीवनातील वाटचाल योग्य होईल असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी केले. येथील कै .लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आयोजित नुकताच पालक मेळाव्यात ते बोलत होते.
या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत असताना परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मा.योगेश शिंदे साहेब यांनी "श्रेयस व प्रेयस यांची जाणीव करून देण्याची मुख्य जबाबदारी पालकांची असल्याचे "मत या प्रसंगी व्यक्त केले.यावेळी सखोल मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांसाठी अनेक क्षेत्र खुली आहेत त्या क्षेत्रातील संधीचा वापर करून घ्यावा व पालकांनी आपल्या पाल्याला त्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष जबाबदारी पार पाडावी अशी भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पालक मेळाव्यात सौ. सातपुते ,लालाखान पठाण ,श्री काबराजी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात पालकांचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सन्माननीय सचिव रवींद्रजी देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख यांची विशेष उपस्थिती होती .
महाविद्यालयाची भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात उच्च दर्जाचा संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सतत तत्पर आहोत असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा संचालिका डॉ . विद्या देशपांडे यांनी केले. अध्यक्षीय समारोप करतंना संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख यांनी "पालकांनी मुलींना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करू द्यावे . " अशी भूमिका व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रवीण नवाडे ,सूत्रसंचालन प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड तर आभारप्रकटन प्रा.वीणा पारेकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पालक मेळावा समितीतील प्रा डॉ विलास देशपांडे, प्रा.डॉ.गुळभिले विद्या ,प्रा.डॉ. रंजना शहाणे , प्रा.डॉ. विलास देशपांडे ,प्रा. प्रवीण नवाडे , प्रा.वीणा पारेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग यांच्यासह पालक वृंद व विद्यार्थिनी समूह मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा